
Music Program: कलाविषयक शिक्षण देणाऱ्या गोव्यातील संस्थांपैकी अवघ्याच संस्था आहेत ज्या आपल्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम इतर राज्यांमध्ये आयोजित करून आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यापक व्यासपिठ देण्याचा तसेच सस्थेला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतात.
गोव्यातील स्वस्तिक संस्थेच्या संजीवन संगीत अकादमीतर्फे 9 सप्टेंबरला बेळगाव येथील लोकरंग मंदिर- रविवार पेठ येथे तर 10 सप्टेंबरला कोल्हापुर येथील गायन समाज, देवल क्लब, भांडारकर हॉल येथे शास्त्रीय व सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
लोकप्रिय पार्श्वगायक पंडित सुरेश वाडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पणजी येथील संजीवन संगीत अकादमीत शास्त्रीय गायन, सारंगी वादन, संवादिनी वादन, सितार वादन, बासरी वादन, व्हायोलिन वादन व तबला वादनाचे शिक्षण दिले जाते.
या अकादमीतून बरेच कलाकार तयार होत असून ते स्वतंत्र गायन व वादनाचे कार्यक्रम करत असतात. विशेष म्हणजे या अकादमीत सारंगी या दुर्मीळ वाद्याचे खास वर्ग सुरू केले आहेत, ज्यासाठी ग्वाल्हेर येथून पूर्ण वेळ सारंगी शिक्षक नेमले गेले आहेत.
सारंगी या वाद्याचे शिक्षण देणारी संजीवन ही कदाचित गोव्यातील तसेच राज्याच्या आसपास परिसरातील एकमेव संस्था असेल.
बेळगाव व कोल्हापुर येथील कार्यक्रमात संगीत शिक्षक डॉ. प्रवीण गांवकर यांच्या शास्त्रीय गायनाबरोबर वसीम खाँ यांचे सारंगी वादन, पल्लवी पाटील, उर्वी फडके, सिया पै व अश्विनी अभ्यंकर या विद्यार्थ्यांचे भक्तीगीत व नाट्यगीत सादर होणार आहे.
त्यांना तबल्यावर रोहिदास परब, संवादिनीवर सुभाष फातर्पेकर व पखावजवर किशोर तेली साथ करतील.
या कार्यक्रमाद्वारे अभिजात संगीत व संजीवन संगीत अकादमीच्या कार्याचा प्रसार करण्याचा उद्देश आहे. हे दोन्ही कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुले असून, संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.