Goa: विश्वाचे हे सगे-सोयरे

किनारी भागांत साचणारा प्लास्टिकचा कचरा गावकरी आग लावून नष्ट करीत असल्याने पॉवेल यांना चिंता वाटते.
Goa: विश्वाचे हे सगे-सोयरे
Powell himself collects plastic waste from the side of the road in the village.Dainik Gomantak

गोव्यात दीर्घ मुदतीचे वास्तव्य करून असलेल्या काही विदेशी पर्यटकांना (Foreign Tourists) भारतीय संस्कृती व समाजाची छान ओळख झालेली असावी असे त्यांच्या काही कृतीवरून नक्कीच वाटते. भारतीय संस्कृतीत गायीला देव संबोधले जाते. 33 कोटी देवता त्याच्या उदरात असल्याचे मानण्यात येते. मात्र गायींना अन्नासाठी भटकंती करावी लागते व त्या उकिरड्यावर ठाण मांडून असतात. अशा आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या दृश्‍यामुळे व्यथित झालेले परदेशी ह्या गायींना करुणापूर्वक खाणे घालतात. या गायींना लोकांकडूनही मदत व्हावी म्हणून खास बालद्यांची व्यवस्थाही त्यांनी करून ठेवली आहे. रस्त्यावरील (Road) अस्ताव्यस्त पडलेल्या अन्नाचे भक्षण करीत फिरणाऱ्या गायींना किमान खाण्यासाठी आवश्यक खुराड्याची सोय व्हायला हवी असे त्याना वाटते. दोन वर्षे हरमल भागांत वास्तव्यास असलेले पॉवेल बोलोयांगोवं गायींच्या अशा अवस्थेमागचे कारणच समजून घ्यायला असमर्थ आहेत.

Powell himself collects plastic waste from the side of the road in the village.
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींची तपासणीच नाही

किनारी भागांत साचणारा प्लास्टिकचा कचरा गावकरी आग लावून नष्ट करीत असल्यानेही त्याना चिंता वाटते. पॉवेल स्वत: गावात रस्त्याच्या कडेला साचणारा प्लास्टिकचा कचरा गोळा करतात. प्लास्टिक जाळणे गुन्हा असून तो कचऱ्यातून पाठवून द्यावा, जाळून नष्ट करणे आरोग्यास हानिकारक असून त्याचा गंभीर परिणाम श्वसनावर होतो हे मत पर्यटक पॉवेल पुन:पुन्हा मांडत असतात. आरोग्य खाते त्याबाबत अनेकदा जागृतीचा उपक्रम राबवित असल्याचे समाधान असले तरी त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही असेही त्यांचे निरीक्ष​ण असते.

Powell himself collects plastic waste from the side of the road in the village.
Goa: एका स्त्रीचे जिंकणे

व्यावसायिक वा नागरिक प्लास्टिक कचरा (Plastic waste) जाळून नष्ट करीत असल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाईचे अधिकार पंचायतींना द्यायला हवेत, असे ठामपणे त्यांना वाटते. पर्यटक आणि तेही विदेशी म्हटल्यावर त्यांना इथल्या जागेशी काय देणंघेणं, असं आपल्याला वाटू शकतं. मात्र पॉवेलसारखे पर्यटक दुनियेच्या पाठीवर कुठेही असले तरी ही पृथ्वी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे त्यांना नक्की ठाऊक असते आणि आपण जिथे आहोत तो परिसर नितळ ठेवण्याची त्यांची तळमळही अस्सल असते.

पर्यटक आणि तेही विदेशी म्हटल्यावर त्यांना इथल्या जागेशी काय देणंघेणं, असं आपल्याला वाटू शकतं. मात्र पॉवेलसारखे पर्यटक दुनियेच्या पाठीवर कुठेही असले तरी ही पृथ्वी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे त्यांना नक्की ठाऊक असते आणि आपण जिथे आहोत तो परिसर नितळ ठेवण्याची त्यांची तळमळही अस्सल असते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com