Music Album: युती म्हणतेय, ''पावसा पावसा खेळया आमी...''

युती सावर्डेकर हिचा नवीन अल्बम नुकताच प्रदर्शित झालाय.
Yuti Sawardekar
Yuti SawardekarDainik Gomantak

Music Album यापूर्वी ‘कोंब्या कोंब्या साद घाल’ या आपल्या ‘पारजाताची फुलां’ या ऑडियो अल्बममधील गीताने रसिकांची मने जिंकणाऱ्या युती सावर्डेकर हिचा ‘पावसा पावसा खेळया आमी’ हा नवीन व्हिडिओ अल्बम नुकताच प्रदर्शित झाला. त्यामुळे पुन्हा तिचे नाव सर्वमुखी झाले आहे. युतीचा हा पहिलाच सोलो अल्बम आहे.

सावर्डे भागातील पत्रकार प्रहर सावर्डेकर यांची कन्या असलेल्या युतीने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून नामवंत गायिका आश्र्विनीताई जांबावलीकर यांच्याकडून गाणे शिकण्यास सुरूवात केली.

आज सावर्डे येथील शारदा इंग्लिश हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकणाऱ्या युतीच्या नावावर दोन अल्बमची नोंद आहे. आपण आजवर जे यश मिळविले आहे, त्यामागे आपले वडील प्रहर, आई दीपाली आणि भाऊ ध्रुव यांनी दिलेले प्रोत्साहन फायदेशीर ठरले असे ती अभिमानाने सांगते.

Yuti Sawardekar
Panjim Market: पणजीत अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा..

युती ही फक्त गायनातच पारंगत आहे असे नव्हे तर हार्मोनिअम आणि सतारवादनाचीही तिला आवड आहे. नृत्यकलेतही ती रस घेत असून वक्‍तृत्‍व, अभिनय, चित्रकला अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत मौलिक कामगिरी करणाऱ्या युतीने आत्तापर्यंत १००हून अधिक बक्षिसे मिळविली आहेत.

आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धांतही सुवर्णमय कामगिरी

युती ही एक चांगली चित्रकारही आहे. तिने काढलेली स्केचेस लोकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली असून नेपाळ येथे आयोजित केलेल्या ‘माऊंट एव्हरेस्ट’ संगीत समारोह या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक पटकावले आहे.

आता येत्‍या नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेत भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याची तिला संधी मिळाली आहे. त्यासाठी तिची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com