Goa Influencers Meet: आशयात दर्जा राखा, भविष्य उज्ज्वल आहे

‘गोमन्तक डिजिटल’ने आयोजित केलेल्या संमेलनात गोव्यातीस इन्फ्लुएन्सर्स जमले होते
Goa Influencers Meet
Goa Influencers MeetDainik Gomantak

जयश्री देसाई

आशय जर दर्जेदार असेल आणि त्यात सातत्य असेल तर ‘इन्फ्लुएन्सर’ म्हणून तुमचे भविष्य उज्ज्वल आहे, असे मत गोव्यातील इन्फ्लुएन्सर्सनी व्यक्त केले. ‘गोमन्तक डिजिटल’ने आयोजित केलेल्या इन्फ्लुएन्सर्स संमेलनात ते सारे जमले होते.

रूबेन रॉड्रिग्ज (@Mr Kurkurit), सिया शिरवईकर (@That Cheesy Goan), सनिशा फळदेसाई, अभिदीप देसाई (Yugaantar Goa), करीशा शिरोडकर (@KuKu Shirodkar), मिथिल लिगुडकर (mister.mithil), मुफीज खान (desi.goan), अमित नाईक (wakinggrant) हे गोव्यातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स या संमेलनात सहभागी होते.

Goa Influencers Meet
Plastic Free Goa: मासे खरेदीसाठी दिली स्टील भांडी; चांदेल पंचायतीचा उपक्रम

गोव्यात इन्फ्लुएन्सर्ससाठी अद्याप मार्केट तयार झालेले नाही असे फुड ब्लॉगर सिया शिरवईकर यांना वाटते.

आपापल्या पातळीवर काम करणारे सर्व जण एकत्र आले व समन्वय साधला तर नक्कीच सर्वाना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

पण त्यासाठी सातत्याने भेटत राहणे, विविध विषयांवर चर्चा करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

‘इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून प्रमोशन ही संकल्पना अद्याप गोव्यात रुजलेली नाही. राज्यातील ब्रॅण्ड्सनी स्थानिक इन्फ्लुएन्सर्सना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघता येऊ शकते, भरपूर पैसेही कमावता येऊ शकतात पण त्यासाठी सातत्य, संयम आणि दर्जा याकडे लक्ष दिले पाहिजे. या क्षेत्रात १० टक्के कष्ट लागतात तर ९० टक्के संयम लागतो त्यामुळे एखादा बॅकअप ठेवून या क्षेत्रात या’ असा सल्लाही त्यांनी दिला.

'समाजातील प्रश्न मांडत असताना अनेकदा मला धमक्यांनाही सामोरे जावे लागते. आता मी घाबरणे सोडून दिले आहे. जे वाटते ते मी व्यक्त करतो.'

- रॅपर अमित नाईक

'गोमंतकीय खाद्यसंस्कृती टिकली पाहिजे. ती पुढच्या पिढ्यांपर्यंत गेली पाहिजे म्हणून विशेषतः त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.'

- रूबेन रॉड्रिग्ज, फुड ब्लॉगर

‘मी प्रत्येक गोष्ट कला म्हणून बघते व त्यातून विकसित झालेली माझी कला लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करते.’

- करीशा शिरोडकर, फॅशन ब्लॉगर

‘मी करिअर म्हणूनच या क्षेत्रात आलो आहे. खूप कष्ट घेतले आहेत आणि यापुढेही त्यात काम करत आणि लोकांना हसवत राहीन.’

- मुफीज खान

‘व्हिडीओ बनवत आहोत, हळूहळू लोक ओळखायला लागले आहेत. असेच काम करत राहू.’

- मिथिल लिंगुडकर

‘आपल्याला समृद्ध वारसा आहे. गोव्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. मात्र गोव्यातील लोकांनाच याबाबत माहिती नाही याचा खेद आहे. म्हणूनच आम्ही पूर्ण अभ्यास करून त्यावर व्हिडीओ बनवीत आहोत.’

- सनिशा फळदेसाई, अभिदीप देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com