Goa Tourism : आपण पर्यटकांना गोवा कसा दाखवतोय? याचा परिणाम इथल्या संस्कृतीवर तर होत नाही? वाचा सविस्तर

पर्यटक गोव्याला का भेट देतात यापेक्षाही आपण त्यांना गोवा कसा दाखवू इच्छितो हे महत्त्वाचे आहे. गोव्याची प्रतिमा विकृत झाल्यास स्थानिक लोकांबरोबरच संस्कृतीवरही अशा विकृतीचे घातक परिणाम होऊ शकतात.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

सुशीला सावंत मेंडीस

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक लहान राज्य असलेला गोवा हा प्रदेश इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. येथील लोकांचा संघर्ष आणि योगदान यांची छटा इथल्या इतिहासात आणि संस्कृतीत उमटली आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य ही या भूमिला निसर्गाने दिलेली अमूल्य भेट आहे.

येथे माड-पोफळी यांनी डवरलेली कुळागरे आहेत, भव्य समुद्रकिनारे आहेत, मंदिर, चर्च आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गोमंतकीय आदरातिथ्य आहे. पण, दुर्दैवाने पर्यटनाच्या नावाखाली या सर्वांचे शोषण करण्यात आले आहे.

त्यामुळे, जगभरातील लोकांनी या राज्याकडे केवळ समुद्र किनारे असलेले सुट्टीचे ठिकाण म्हणून पाहिले आहे. बीच टूरिझमने तारांकित हॉटेल्स, कॅसिनो आणि इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक असलेले सनबर्न आणि व्हीएच १सारख्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. ड्रग्ज, वेश्याव्यवसाय आणि मसाज पार्लर - हे सर्व गोव्यातील पर्यटनाच्या प्रचाराचे परिणाम आहेत.

Goa Tourism
Goa Education: शिक्षण व्यवस्थेला छडी कोण लावणार?

केवळ समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनाला चालना देण्याऐवजी, ‘सांस्कृतिक पर्यटना’ला प्रोत्साहन दिल्यास पर्यटन व्यवसाय वृद्धी होईल व निसर्गासह संस्कृतीचे जतनही होईल. भोगलोलुपतेतून पैसा या पेक्षाही कितीतरी मौल्यवान असलेली गोव्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा पुरेशा प्रमाणात जगासमोर आणता येईल.

इतिहासाचा आणि संस्कृती जतन करणाऱ्या समाजासाठी ‘वारसा’ हा फारच महत्त्वाचा शब्द आहे. समाजातील कला, परंपरा आणि विश्वास यांनी इतिहास आणि संस्कृती समृद्ध होते. इतिहास, कला आणि संस्कृती यांचे प्रामाणिकपणे केलेल्या जतन पाहण्यासाठी त्या ठिकाणी केलेला प्रवास, अशी ‘सांस्कृतिक पर्यटना’ची व्याख्या अमेरिकेतील ‘नॅशनल ट्रस्ट फॉर हिस्टोरिक प्रिझर्वेशन’ने केली आहे.

सांस्कृतिक वारशात भौतिक वास्तू, ऐतिहासिक स्थळे यांच्या जतनासह समाजाच्या अमूर्त गुणधर्मांच्या जतनाचाही समावेश होतो. कला प्रकार, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांतून हा गोव्याच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचा वारसा झिरपत आपल्यापर्यंत पोहोचला आहे. सातवाहन, भोज, शिल्हार, कोकण मौर्य आणि कदंब यांसारख्या वेगवेगळ्या राजवंशांनी राज्य केले.

जेव्हा पोर्तुगीजांनी गोवा जिंकला तेव्हा पूर्वीपासूनच मिसळलेल्या सांस्कृतिक अभिव्यक्तींमध्ये पाश्चात्य संस्कृतीही एकजीव झाली. म्हणूनच पोर्तुगाल स्वतः एक सुंदर देश आहे आणि उर्वरित युरोपमध्ये सुट्टीसाठी प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याकडे पाहिले जात असले तरीही पोर्तुगीजमध्ये अनेकदा असे म्हटले जाते की, ‘गोवा पाहिला तर लिस्बोआ पाहण्याची गरज नाही!’ आपल्या भूमीवर दोन वसाहतवादी शक्ती राज्य करत होत्या तेव्हा गोव्यातील लोकांनाही गोव्यात येण्यासाठी परवानगीची आवश्यक होती.

Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

गोव्याबाहेरील लोक गोव्यापासून दूर राहिले, पोर्तुगिजांनी तसे प्रोत्साहन दिले नाही. वसाहत असली तरी पर्यटनाला उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय करण्याचा विचार पोर्तुगिजांनी कधी केला नाही.

पर्यटक गोव्याला का भेट देतात? ते फक्त समुद्रकिनारे, मंदिरे, चर्च, मशिदी, गोव्याच्या संस्कृतीचे वेगळेपण पाहण्यासाठी येतात की, आणखी काही? ही प्रतिमा विकृत झाल्यास स्थानिक लोकांबरोबरच संस्कृतीवरही अशा विकृतीचे घातक परिणाम होऊ शकतात. पर्यटन हे इतर उद्योगांपेक्षा वेगळे आहे कारण ते पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी लोकांना त्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन करण्यास भाग पाडते.

काहीवेळा आपली लोकनृत्येदेखील पर्यटकांच्या सोयीनुसार, त्यांना आकर्षित करेल अशा पद्धतीने तयार केली जातात. लोकनृत्यांतून गोव्याची संस्कृती ज्या पद्धतीने दाखवली जाते, ती पाहता हा श्रीमंत परदेशी पर्यटकांच्या वासनापूर्तीचा प्रयत्न वाटतो. गोव्याबाहेर लोकांना गोवा हे आळशी लोकांचे नंदनवन वाटते.

काहीवेळा, ‘सुशेगाद’ या शब्दाचा अर्थ धीमे, आळशी आणि अतिशय आत्मसंतुष्ट आणि गतिहीन असा चुकीचा लावला जातो. भारताच्या किंवा जगाच्या इतर कोणत्याही भागाप्रमाणेच गोव्याचे लोकही उदरनिर्वाहासाठी कठोर परिश्रम करतात हे इतरांना पटवणे त्यामुळेच कठीण जाते. किंबहुना परदेशातून आम्हाला भेट देणाऱ्या आमच्या नातेवाईकांसोबत आम्ही समुद्रकिनाऱ्याला भेट देतो, तेव्हा त्यांच्या बोलण्यातून येणारा हा नेहमीचा अनुभव आहे!

सुमारे 50 वर्षांपूर्वी बाली हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले. तेथील आकर्षणाचे केंद्रबिंदू संस्कृती न राहता इतर गोष्टी झाल्या. हे खेदजनक असले तरी खरे आहे की कॅसिनो संस्कृतीचा मालकांनी संस्था आणि कार्यक्रम प्रायोजित केल्याशिवाय सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही.

कॅसिनो मालकांनी गोव्यातील एकामागोमाग सरकारला निधी दिला आहे आणि ते कॅसिनो मांडवी नदीतून बाहेर काढू शकत नाहीत, हे उघड गुपित आहे. बालीमध्ये पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लढलेल्या एनजीओला ज्याप्रमाणेच पराभव पत्करावा लागला होता, त्याप्रमाणेच ‘जागृत गोएंकराची फौज’ला (गोव्याचे सजग सैन्य) नव्वदच्या दशकातील त्यांच्या लढाईत पराभव पत्करावा लागला.

Goa Tourism
Goa Lake: आभिमानास्पद ! काकोड्याचा नंदा तलाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पाणथळांच्या यादीत

बालीची कथा गोव्यापेक्षा वेगळी नाही. असंख्य हॉटेल्स हजारो क्यूबिक मीटर कचरा तयार करतात ज्याचा पुनर्वापर करण्याची क्षमता राज्याजवळ नाही. गोव्यात दरवर्षी ख्रिसमसच्या आठवड्यात होणारी वाहतूक कोंडी आणि बालीच्या मुख्य रस्त्यांवरील कूर्मगतीने होणारी वाहतूक कमी-अधिक प्रमाणात तशीच आहे.

गुन्हेगारी, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थांचा व्यापार आणि जमिनीच्या वाढत्या किमती हे पर्यटन उद्योगाचे संपार्श्विक नुकसान आहे. ऐंशीच्या दशकात आणि त्यानंतरही गोव्याचे चित्र, मदिरा आणि मदालसा मुक्तपणे मिळण्याचे ठिकाण असे जगभरात दाखवले गेले.

सरकारी माहितीपत्रकातही बिकिनी घातलेल्या महिलांना दाखवले होते. ‘नाचगाण्यापेक्षाही तुमच्याशी लगेच मैत्री करणाऱ्या लोकांची भूमी...’ असा वेगळाच अर्थ निघणारे शब्द जाहिरातींत योजले गेले होते. या जाहिराती गोवा आणि गोमंतकीयांची अत्यंत विकृत प्रतिमा निर्माण करतात.

गोवा समृद्ध आहे. आजही आदिवासींनी खोल जंगलात पुजलेल्या देवतांचा खोबऱ्याचा प्रसाद येथे आहे. प्रस्तरचित्रे किंवा खडकावर खोदकाम, किल्ले, चर्च, बॅसिलिका, पोर्तुगीजपूर्व काळातील मंदिरे, मशिदी, इंडो-पोर्तुगीज वास्तुशिल्प असलेली प्रासादिक घरे जसे की मेनेझिसेस ब्रागांझा (युनेस्को वारसा स्थळ), रिवोणा आणि हरवळे येथील लेणी, तसेच पत्रादेवी, आग्वादचा तुरुंग अशी इतिहास घडवणारी ठिकाणे आहेत. गोव्याची सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या या गोष्टी जगभरातील पर्यटकांसमोर ठळकपणे कधी आणल्याच जात नाहीत.

कर्नाटक आणि महाराष्ट्र या गोव्याशेजारील राज्यांनी त्यांच्या वारशाची ओळख जगभरातील पर्यटकांना जोरदारपणे करून दिली आहे. आज हंपी, अजिंठा, एलोरा आणि एलिफंटा ही ऐतिहासिक स्थळे जगाच्या नकाशावर आहेत. हैदराबादमध्ये, पर्यटक स्मशानभूमी पाहण्यासाठी पैसे देतात - जसे की कुतुबशाही घराण्याच्या सात भव्य थडगे ज्याने सरोजिनी नायडू यांना कविता लिहिण्याची प्रेरणा दिली.

पोर्तुगालसारखे युरोपातील देश देखील अजुलेजोस (रंगीत डिझाइनसह सिरेमिक टाइल्स), पोशाख, गाड्या, सागरी क्रियाकलाप, जुन्या कलाकृती आणि अगदी लिस्बन शहराच्या इतिहासासाठी संग्रहालये बांधून त्यांची संस्कृती प्रदर्शित करतात, जपतात. ब्रिटिश टॉवरमधील ‘ब्लॅक स्टोन’ हा आठ पौंडांचा दगड, अनेक ब्रिटिश सम्राटांच्या शिरच्छेदाचा साक्षीदार म्हणून पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र बनवण्यात आला आहे.

तथापि, आज गोव्यात, पर्यटकांना प्रस्तरचित्रे किंवा खडकावर खोदकाम पाहण्यासाठी विनामूल्य परवानगी आहे. पर्यटकांना वाट्टेल त्या कपड्यांत मंदिरे, चर्च आणि मशिदींमध्ये प्रवेश करण्यास आणि मुक्तपणे फिरण्याची परवानगी आहे. प्रवेश करताना पोशाख कुठला असावा, याच्या सूचना बाहेर लावलेल्या असताना त्याकडे ढुंकूनही न पाहता, त्या स्थळाचे पावित्र्य लक्षांत न घेता, अशोभनीय, असुंस्कृत कपडे परिधान करून सर्रास प्रवेश केला जातो.

बुद्धाच्या काळात गोव्याला पलीकडची (अपरान्त) भूमी असे संबोधले जात असे. पोर्तुगीज मुकुटातील एक दागिना (सुनापरान्त) असावा, त्याप्रमाणे सोन्याच्या जमीन असलेला प्रदेश असा उल्लेख आहे. इतर प्रशंसनीय नावांमध्ये गोल्डन गोवा आणि पूर्वेकडील रोम यांचा समावेश होतो. ही लेबले फक्त पर्यटनाशी संबंधित नौटंकी आहेत की त्यात काही तथ्य आहे?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com