कष्टांना मिळावी बाजारपेठ

राज्यात फुलशेती चांगली तग धरून आहे पण तिला चांगली बाजारपेठ मिळून फुलांना चांगली किंमतही मिळायला हवी.
कष्टांना मिळावी बाजारपेठ
कष्टांना मिळावी बाजारपेठDainik Gomantak

शंभर आत्मनिर्भर, स्वावलंबन ही संकल्पना राबविली जात आहे. त्यातून आता अनेकांनी शेती, बागायतीत नवनवीन प्रयोग करुन आत्मनिर्भरतेचा पाया रचला आहे. आत्मनिर्भरता प्रत्यक्षात आत्मसात करताना अनेक गोष्टींचे पाठबळ लागते. नवीन प्रयोगाव्दारे शेती, बागायतीचा माल तयार झाल्यानंतर त्यांना चांगली किंमत मिळणे जरुरीचे असते. राज्यात फुलशेती चांगली तग धरून आहे, पण तिला चांगली बाजारपेठ मिळून फुलांना चांगली किंमतही मिळायला हवी. सत्तरी तालुक्यात भुईपाल येथील धनगर बांधवांतल्या काही कुटुंबानी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक वातावरणात जाईची लागवड केली आहे पण या जाई फुलांना चांगली बाजारपेठ मिळत नाही.

मुख्य मार्गावर, दिवसभर उभे राहून त्यांना जाईंच्या वेण्यांची विक्री करावी लागते. साधारण जुलै महिन्यात जाईची फुले मिळण्यात सुरुवात होते व तिथून जाईंची फुले विकण्यास प्रारंभ होतो. तो ऑक्टाेबर महिन्यात, दस-याच्या सणापर्यंत चालू राहतो. भुईपाल येथे मुख्य मार्गावर हे जाई विक्रेते ऊन-पावसात उघड्यावर थांबून एखादा वाहतुकधारक जाई फुलांच्या वेण्या घेईल या प्रतिक्षेत थांबून असतात. यामध्ये अगदी वयस्क मंडळी देखील छत्रीच्या आधारावर हातात गुंफवलेली फुले घेऊन उभी दिसतात.

कष्टांना मिळावी बाजारपेठ
अंबाडा,गजरा, वेणी आणि बरंच काही

सौ. गंगी सया पावणे माहिती देताना म्हणाल्या, सकाळी लवकर उठून जाईच्या कळ्या खुडल्या जातात. नंतर त्या दोऱ्यामध्ये गुंफल्या जातात. वेण्या गुंफणे वेळखाऊ असते. त्यानंतर विक्रीसाठी रस्त्यावर जाऊन थांबावे लागते. साधारण वीस रुपये प्रति वेण्या या दराने फुलांची विक्री होते. काही ग्राहक घासाघिसही करतात. दसऱ्यापर्यंत हा व्यवसाय चालतो. वेलवर्गीय कुळात समावेश होणाऱ्या जाईच्या फुलांना जातिका, चंबेली, चंबाली, चमेली, प्रियंवदा, सुरभिगंधा असे वेगवेगळ्या भाषाधून संबोधले जाते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते देखील.

शुभ्र आणि नाजूक असणारी जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद मंद सुगंधामुळे ही फुले सर्वांनाच प्रिय वाटतात. मात्र फुले अल्पायुषी असतात. अंगातील उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे. जाईच्या फुलांपासून तयार केलेल्या सुगंधी तेलाला खुप मागणी असते. जाईच्या वेलीला हस्त नक्षत्राचा आराध्यवृक्ष मानले गेले आहे. गोव्याचे अप्रुपाचे फुल मानल्या जाणाऱ्या जाई फुलांच्या व्यवसायाला सरकारने चांगला दर देणारी बाजारपेठ उपलब्ध केली पाहिजे जेणेकरुन जाई फुलवणाऱ्या लोकांच्या कष्टांना देखील सुगंध येईल.

Related Stories

No stories found.