गोव्यातील नारळ उत्पादनाचे विदारक चित्र

उत्पादकता वाढविण्याबरोबरच नारळ उद्योगाला चालना मिळावी केंद्रीय किनारी कृषी संशोधन केंद्राच्या संचालकांची अपेक्षा
गोव्यातील नारळ उत्पादनाचे विदारक चित्र
गोव्यातील नारळ उत्पादनाचे विदारक चित्रDainik Gomantak

केंद्र सरकारने (Central Government) संसदेमध्ये नारळ विकास बोर्ड संशोधन विधेयक 2021 (Coconut Development Board Research Bill) संमत केले आहे. अत्यंत गदारोळात मंजूर केलेल्या या महत्वपूर्ण विधेयकाचा राज्यातील नारळ उद्योगाच्या विकासासाठी मदत होईल अशी अपेक्षा केंद्रीय किनारी कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ प्रवीण कुमार यांनी व्यक्त केली आहे. ही अपेक्षा व्यक्त करताना राज्यातील (Goa) नारळ उत्पादनाचे विदारक चित्र ही त्यांनी मांडले असून राज्याची नारळ उत्पादकता ही देशाच्या नारळ उत्पादकतेपेक्षा निम्मी असल्याचा असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. (Goa's coconut productivity is half of country's average)

डॉ प्रवीण कुमार
डॉ प्रवीण कुमारDainik Gomantak

केंद्र सरकारने अगोदर राज्यसभेमध्ये आणि नंतर लोकसभेमध्ये अत्यंत गदारोळामध्ये नारळ विकास बोर्ड संशोधन विधेयक 2021 मंजूर केले आहे. या महत्त्वपूर्ण विधेयकावर चर्चा अपेक्षित होती मात्र त्यावेळेला संसदेमध्ये गदारोळ सुरू असल्याने या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही. मात्र या विधेयकाचा राज्याला काय फायदा होणार ? ही बाब जास्त महत्त्वाची आहे. राज्याच्या नागरिकांच्या आहारामध्ये नारळाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने नारळ उत्पादकतेवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

अशा वेळेला हे अत्यंत महत्वपूर्ण विधेयक संसदेने मंजूर केला आहे. देशात केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक मध्ये नारळाचे सर्वाधिक उत्पादन उत्पादन होत असून यामध्ये गोवा मात्र खूप मागे असल्याचे चित्र आहे. देशाची सरासरी उत्पादकता प्रति हेक्‍टरी 12 हजार नग असताना राज्यात मात्र हे प्रमाण 5000 च्या सुमारास आहे. त्यामुळे ही उत्पादकता वाढविण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण नारळ उत्पादन करणे, त्याचे पूरक व्यवसाय उभारणे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचे आहे. त्यासाठी कृषी संशोधन संस्था, कृषी मंत्रालय यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

नारळ आणि राजकारण

नारळाला ‘कल्पवृक्ष’ म्‍हटले जाते. नारळाला विविध धर्मांमध्ये शुभ मानले जाते. शुभ गोष्टींची सुरुवात करताना नारळ म्हणजेच श्रीफळ वाढवले जाते. राज्यातील एका राजकीय पक्षाचे, गोवा फॉरवर्डचे निवडणूक चिन्ह नारळ आहे. तसेच काही काळापूर्वी नारळाला गवतवर्गीय संबोधल्यावरून राज्‍यात बरेच राजकारण तापले होते.

Coconut Tree
Coconut TreeDainik Gomantak

नारळ उत्पादकतेत सासष्‍टी आघाडीवर

राज्यात कृषी क्षेत्रातील अनेक पिकांच्या उत्पादकतेबाबत उदासीनता दिसून येते. हीच अवस्था नारळाच्या बाबतीतही आहे. राज्यातील सर्वच किनारी तालुक्यांमध्ये नारळाचे उत्पादन घेतले जाते. उत्पादनाचा विचार केला असता, सासष्‍टी तालुका त्‍यात आघाडीवर आहे. एकट्या या तालुक्यामध्ये एक चतुर्थांश नारळाचे उत्पादन होते. त्याखालोखाल काणकोण, सांगे, मुरगाव, तिसवाडी, बार्देश आणि पेडणे यांचा नंबर लागतो. देशात सर्वाधिक नारळाचे उत्पादन केरळ राज्यात होते आणि त्यानंतर तामिळनाडू आणि कर्नाटकचा नंबर लागतो.

गोव्यातील नारळ उत्पादनाचे विदारक चित्र
Goa: दिल्लीच्‍या शैक्षणिक प्रगतीने महादेव नाईक भारावले
डॉ अरुणाचलम
डॉ अरुणाचलमDainik Gomantak

बाणावली, कळंगुट उत्तम दर्जाच्या जाती

राज्यात बाणावली आणि कळंगुट या नारळाच्‍या प्रमुख स्थानिक जाती असून, त्या गुणवत्तेच्या दृष्टीने अत्यंत चांगल्‍या आहेत. त्यांचा इतर जातींशी संकरही यशस्वी होत असल्याची माहिती कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्ही. अरुणाचलम यांनी दिली. या जातींचा मलेशियातील जातींबरोबरचा संकर यशस्वी ठरला. त्‍यातून उत्पादकता आणि गुणवत्ताही वाढल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे ते म्‍हणाले.

गोव्यातील नारळ उत्पादनाचे विदारक चित्र
Restaurants in Goa: 'जिला बेकरी'; बेकरी उत्पादन निर्मीतीतले महत्वाचे नाव

गोवा आणि नारळ

गोवा आणि नारळाचे नाते प्राचीन आहे. इथे सहाव्या शतकामध्येही नारळ होता, असा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. राज्यात नारळ प्राचीन काळापासून आहे त्याचे अनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत. मराठी आणि कोकणीमध्ये नारळाच्या प्रत्येक भागास आणि कृतीस स्वतंत्र असे शब्द आहेत. प्रामुख्याने किनारपट्टी भागांतील लोकांच्‍या आहारात नारळाचा तसेच नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. गोमंतकीयांच्‍या प्रत्‍येक आमटीत (कढी) नारळाचा वापर हमखास होतोच.

नारळ हिरवे, पिवळे, नारंगीसुद्धा 

राज्यात नारळाच्या उंचीवरून म्हणजे उंच, मध्यम आणि कमी उंचीवरून सहा जाती अस्तित्वात आहेत. याशिवाय रंगावरून हायब्रीड जातीही अनेक आहेत. त्यात हिरवे, पिवळे, नारंगी अगदी तांबडेसुद्धा नारळ राज्यात आहेत. याशिवाय नारळ पाणी, खोबऱ्याची जाडी यावरूनही नारळाचे विविध प्रकार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com