ग्रीष्मातला राजा गुलमोहर: तरल मनाशी मुक्त संवाद साधतो

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

निसर्गाने सौदर्यांचे भरभरुन वरदान दिलेले गुलमोहोराचे झाड तसे निरुपयोगी आणि कमकुवत झाड. मात्र, ज्यावेळी गुलमोहोर रसरसून फुलतोय. डिचोली- साखळी रस्त्यावर गुलमोहराची फुले फुलली आहेत.

निसर्गाने सौदर्यांचे भरभरुन वरदान दिलेले गुलमोहोराचे झाड तसे निरुपयोगी आणि कमकुवत झाड. मात्र, ज्यावेळी गुलमोहोर रसरसून फुलतोय. डिचोली- साखळी रस्त्यावर गुलमोहराची फुले फुलली आहेत. एरव्ही दुर्लक्षित असणारे गुलमोहोराचे झाड मात्र, ज्यावेळी पूर्णपणे लाल-केशरी फुलांनी बहरुन येते, त्यावेळी या झाडाचे सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित केल्यावाचून राहत नाही.  

 

प्रत्येकाला गुलमोहोराच्या फुलांची भुरळ पडतानाच, मनमोहक फुलांविषयी साहजिकच कुतूहलही निर्माण होत असते. काहीजण तर या फुलांच्या प्रेमातही पडतात. या नैसर्गिक किमयेचा अनुभव सध्या डिचोली-साखळी रस्त्यावर येत आहे. या हमरस्त्यावरील गुलमोहोराची झाडे सध्या लाल-केशरी फुलांनी बहरलेली असून, या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांचे ही झाडे लक्ष वेधून घेत आहेत.

निसर्गचक्राच्या नियमाप्रमाणे वसंत ऋतुत प्रत्येक झाडांना पालवी फुटण्यास प्रारंभ होत होत असते. मात्र, या काळात गुलमोहोर आपले खरे अस्तित्व दाखवायला सुरवात करतात. वसंत ऋतूत साधारण एप्रिल महिन्यात गुलमोहोर फुलण्यास सुरवात होते. मे महिन्यात तर गुलमोहोर रसरसून फुलत असतात.

May be an image of flower, nature and tree

वास्तविक मे महिना म्हणजे रखरखत्या उन्हाचे दिवस. मात्र, रखरखत्या उन्हातही फुलांनी बहरत असल्यामुळे गुलमोहोराच्या सौंदर्यात भर पडत असते. गुलमोहोर ज्यावेळी पूर्णपणे फुलांनी बहरुन येतात, या झाडांचा आकार आणि विस्तार पाहता, त्यावेळी ही झाडांवर फुलांची छत्री धारण झाल्याची अनुभूती मिळत असते. गुलमोहोराची फूले अन्य फुलांप्रमाणे सुंगंधीत नसली, तरी निसर्गाने दिलेल्या या देणगीमुळे गुलमोहोराची फूले केवळ निसर्गप्रेमींनाच नव्हे, तर प्रत्येकाला आपल्या सौदर्यांचे वेड लावतात.

May be an image of cloud, nature and tree

मुस्लिमवाडा-डिचोली ते कारापूर-तिस्कपर्यंतच्या साधारण सहा किलोमीटर अंतरावर लहानमोठी मिळून जवळपास 40 ते 45  गुलमोहोराची झाडे अजूनही दिमाखात उभी आहेत. मागील काही वर्षांत वादळीवाऱ्यात काही झाडे उन्मळून पणली आहेत. सध्या जी झाडे रस्त्याच्या बाजूने डौलदारपणे उभी आहेत, त्यातील बहुतेक झाडे सध्या लालभडक फुलांनी पूर्ण बहरलेली असून, ही झाडे मुक्‍तपणे जमिनीवर फुलांची उधळण करीत असतात.

May be an image of flower, nature and tree

त्यामुळे गुलमोहोराच्या प्रत्येक झाडाखाली रोज लाल-केशरी फुलांचा सडा पसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला ही झाडे आकर्षित करीत आहेत. निसर्गाचे वरदान असलेली आणि पूर्ण फुलांनी बहरलेली ही झाडे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. आणखी काही दिवस तरी या झाडांचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी मिळणार आहे. 
 

May be an image of nature, road and tree

 

 

संबंधित बातम्या