World Health Day Special : निरोगी आयुष्य म्हणजे सुखी जिवन

दैनिक गोमन्तक
बुधवार, 7 एप्रिल 2021

आजच्या काळात फिटनेस हा फार महत्त्वाचा विषय झाला आहे. खराब जीवनशैलीने आपले संपूर्ण जीवन उध्वस्त केले आहे.

आजच्या काळात फिटनेस हा फार महत्त्वाचा विषय झाला आहे. खराब जीवनशैलीने आपले संपूर्ण जीवन उध्वस्त केले आहे. आणि याच कारणामुळे 50 आणि 60 व्या वयात होणारे आजार आता तरुण मुलांना होत आहेत. या आजारांचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या चुकीच्या सवयी, खाण्याची पद्धत, पुरेशी झोप न मिळणं. त्यामुळे आपले वजन वाढते आणि वजन वाढल्याने अनेक त्रास होतात. वजन कमी करण्यासाठी लोक जिम करतात,कमी जेवन करतात, परंतु त्यांना यश मिळत नाही कारण त्यांच्या काही सवयी सुधारत नाहीत. 7 एप्रिल  रोजी  जागतिक आरोग्य दिन (World Health Day) साजरा केला जातो, याचा मुळ उद्देश हा  लोकांना त्यांच्या चांगल्या आरोग्याविषयी जागरूक करणे हा आहे. 2021 च्या  जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना "एक सुसंस्कृत आणि निरोगी जग बनविणे" ही आहे. जगात 21 जून रोजी दरवर्षी जागतिक योगा दिन साजरा केला जातो. जर तुम्हाला खरच स्वत: ला फिट अॅड फाईन ठेवायचं असेल तर लवकरात लवकर चांगल्या सवयी लावा.

सागराच्या गर्भात मानवी हस्तक्षेप वाढल्यास...

8 तास झोप घ्या -

प्रत्येकाला झोपण्याची आणि विश्रांती घेण्याची खूप गरज आहे, कारण पुरेशी  झोप नाही मिळाली तर अनेक आजारांना सामोरं जाव लागतं. 8 तास झोप ही निरोगी राहण्यासाठी पुरेषी मानली जाते. जर तुम्हाला दिवसा विश्रांती घ्यायची असेल तर एक तास झोप घेणे पुरेसे आहे. पण काही लोक झोप पूर्ण झाल्यानंतरही  अंथरुणात तसेच पडून राहतात. ही सवय निरोगी आयुष्यासाठी धोकादायक आहे. या सवयी मुळे लठ्ठपणा अनेकदा हृदयविकार आणि मधुमेहासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

Health Tips: उन्हाळ्यात आरोग्यासाठी उपयुक्त; पपई खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

रोज 1 तास व्यायाम - 

निरोगी राहण्यासाठी  रोज 1 तास व्यायाम करणं फार गरजेचं आहे. त्याने आपले स्नायू मजबूत होतात, आपलं मानसिक संतुलन चांगलं राहत, झोप शांत लागते आणि दिवसभर आपण उत्साही राहतो. व्यायाममध्ये मग ते जिम, योगा यासारख्या अनेक गोष्टी करू शकतो.आळशीपणा माणसाला अजून स्थूल बनवतो. त्यामुळे रोज व्यायाम करण क्रमप्राप्त आहे. आणि काही लोक रात्री पोटभर खातात आणि तसेच झोपतात,पण ही सवय चुकिची आहे. रात्री जेवना नंतर थोडा वेळ तरी चालले पाहिजे.

जंक फुड खाणं टाळा आणि रात्री उशिरापर्यंत जागू नका -

जर आपण जंक फुड खाणं  आणि रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय सोडली सोडली पाहिजे नाही तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपले शरीर पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकत नाही. बाहेरच्या अन्नात खराब तेल, घातक मसाले असतात ज्यामुळे छातीत जळजळ होणे, झोप न येणे  या समस्या उद्भवतात. त्याचबरोबर  रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने ऍसिडिटी होते. झोप न लागल्याने थकवा, डोकेदुखी, आळस येणं आणि इतर बर्‍याच प्रकारच्या समस्या सुरू होतात. 

...म्हणून तुमची दुचाकी उन्हाळ्यात कमी मायलेज देते

निरोगी आयुष्यासाठी सध्या लोकांचा कल हा आयुर्वेदिक गोष्टी वापरण्याकडे जास्त दिसत आहे. सध्या जगात 22 टक्के लोक हे फिट आहेत बाकी राहिलेल्या लोकांना काही ना काही आजार आहे. तुम्हाला जर निरागी आयुष्य जगायचे असेल तर वरील गोष्टींचा विचार नक्की करा.

संबंधित बातम्या