भारतासोबत सहनिर्मिती करायला मला आवडेल: मिर्टा रेन

मिर्टा रेन या स्वत: अभिनेत्री आणि नृत्यांगना आहेत.
भारतासोबत सहनिर्मिती करायला मला आवडेल: मिर्टा रेन
भारतासोबत सहनिर्मिती करायला मला आवडेल: मिर्टा रेनDainik Gomantak

इफ्फीच्या उद्घाटन समारंभानंतर आयनॉक्सच्या सर्व स्क्रीन्सवर, शुभारंभी चित्रपट, ‘द किंग ऑल द वर्ल्ड’ चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते युसेबिओ पाचा आणि त्यांच्या सहकारी आणि दुभाष्या मिर्टा रेन यांच्याशी सतेंदर मोहन यांनी संवाद साधला. मिर्टा रेन या स्वत: अभिनेत्री आणि नृत्यांगना आहेत.

* हा चित्रपट बनवण्यासाठी तुम्ही का प्रवृत्त झालात?

‘एके दिवशी मी कार्लोस सॉरासोबत जेवत होतो. तेव्हा मी सॉराला मेक्सिकोमधल्या संगीताबद्दल काहीतरी बनवण्याचा प्रस्ताव दिला. चर्चेनंतर आम्ही एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मेक्सिको सर्व कला आणि चित्रपट उद्योगासाठी, विशेषत: नृत्य आणि संगीतासाठी, एक मजबूत व्यासपीठ प्रदान करते. नृत्य, संगीत, लोकनृत्य आणि रंगीबेरंगी दिवे यांच्या बाबतीत मेक्सिको, लॅटिन अमेरिकेच्या संदर्भात, बरेचसे भारतासारखे आहे.

* या चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून स्टोरारो व्हिटोरियोची निवड का केली?

‘हलक्या छ्टांच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये व्यक्त होणारे त्यच्या इतके अन्य कोणी नाही. त्यला चारदा ऑस्कर नामांकन मिळाले आहे आणि त्यापैकी त्याने तीनदा ऑस्कर जिंकले आहे. आणि तो एक अत्यंत नावाजलेला सिनेमॅटोग्राफर आहे. गोव्यातल्या. गेल्या इफ्फीत त्याना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

* तुम्ही या चित्रपटाचे नाव ‘द किंग ऑल द वर्ल्ड’ असे का ठेवले?

‘हे लोकप्रिय पौराणिक गाण्याचे नाव आहे, जे कार्लोस सौराला तो लहान असताना ऐकायला आवडायचे.’

* हा चित्रपट इतर कोणत्याही देशात दाखवला गेला आहे का?

‘हा चित्रपट मात्र 4 ऑक्टो 2021 रोजी मेक्सिकोतील ‘फेस्टिव्हल इंटरनॅशनल डी सिने एन ग्वाडारलाजा’मध्ये दाखल झाला होता. योगायोगाने हा चित्रपट त्याच ठिकाणी तयार झाला होता.’

भारतासोबत सहनिर्मिती करायला मला आवडेल: मिर्टा रेन
इफ्फीचा बट्ट्याबोळ

* ही तुमची पहिली भारत भेट आहे का?

‘होय, आम्ही येथे 20 नोव्हेंबर 2021 ला पोहोचलो आणि 23 नोव्हेंबर 2021 ला परत जात आहोत.

* तुमचा पुढील प्रकल्प कोणता असेल?

‘मला ‘द किंग ऑल द वर्ल्ड’च्या टीमसोबत स्पॅनिश भाषेत “पिसाको डोरा मार वाय एल गुरेनिका” नावाचा आणखी एक चित्रपट बनवायचा आहे. मी कास्टिंगचा एक भाग म्हणून मिर्ता रेनेला घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. ती एक अभिनेत्री, टीव्ही होस्ट आणि नृत्यांगना आहे. सध्या ती माझ्यासोबत दुभाषी म्हणून आली आहे.’

* भारतातील तुमचे हे वास्तव्य तुम्हाला कसा वाटले?

‘उत्कृष्ट. येथील लोक अतिशय दयाळू, प्रेमळ आणि सभ्य आहेत. अन्न खूप स्वादिष्ट आहे. मला इथे पुन्हा यायला आवडेल, मला भारतासोबत सह-निर्मिती करायलादेखील आवडेल.

Related Stories

No stories found.