गोव्यातील आयकोनिक 11 ई-फॅशन कॅलेंडर प्रकाशित

2011 साली त्यांनी सुरू केलेल्या एक वर्षाच्या ‘फॅशन फोटोग्राफी डिप्लोमा कोर्स’मधून आतापर्यंत शेकडो फॅशन फोटोग्राफर (Photographer) तयार झालेले आहेत.
गोव्यातील आयकोनिक 11 ई-फॅशन कॅलेंडर प्रकाशित

गोव्यातील आयकोनिक 11 ई-फॅशन कॅलेंडर प्रकाशित

Dainik Gomantak

प्रसाद पानकर यांच्या ‘सीएमवायके ॲकॅडमी ऑफ फोटोग्राफी’ने फोटोग्राफीच्या प्रांतात आपल्या उच्च दर्जाच्या कामामुळे स्वतःला पूर्णपणे प्रस्थापित केले आहे. 2011 साली त्यांनी सुरू केलेल्या एक वर्षाच्या ‘फॅशन फोटोग्राफी डिप्लोमा कोर्स’मधून आतापर्यंत शेकडो फॅशन फोटोग्राफर (Photographer) तयार झालेले आहेत. पण फॅशन मॉडेल, फॅशन डिझायनर, मेकअप कलाकार, फॅशन स्टायलिस्ट यांना देखील स्थान प्राप्त करून दिले आहे.

2016 - 17 च्या दरम्यान प्रसाद पानकर यांना ही ई-फॅशन कॅलेंडरची कल्पना सुचली जी, त्यांच्या विद्यार्थ्यांनी लगेच उचलून धरली. प्रसादने या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवरच टाकली. विद्यार्थ्यांनी त्या वर्षी निवडलेला विषय होता ‘गाऊन शूट’- गोव्यातील (Goa) आकर्षक वारसा घरांसमोर गाऊन परिधान केलेली मॉडेल शूट करणे. त्यांचा एक विद्यार्थी सावियो बार्को याला हा विषय सुचला होता. बस्स. लगेच कामाला सुरुवातही झाली.

<div class="paragraphs"><p>गोव्यातील आयकोनिक 11 ई-फॅशन कॅलेंडर प्रकाशित</p></div>
गोव्याची आत्मग्लानी कधी सरणार?

गोव्यातल्या वारसा घरांचा आणि फॅशन डिझायनरांचा शोध घ्यायला सुरुवात झाली. पूर्ण बॅच या कामात गुंतली होती. मॉडल्ससाठी चाचणी होती त्याला सहा मॉडेल्सनी हजेरी लावली. त्या वर्षाची कॅलेंडरची 12 पाने त्या सहाजणीत वाटली गेली. डेसीमो डि’कॉस्टा ही एक उत्कृष्ट आणि प्रतिभावंत मेकअप कलाकार आहे. तिने मॉडेलवर काम केले आणि ती तेव्हापासून आयकोनिक 11 चा भाग बनली आहे. अशातऱ्हेने आयकोनिक 11: ई-फॅशन कॅलेंडर 2017 मध्ये जन्माला आले.

अर्थात या कॅलेंडरच्या नावाबद्दलही बरीच चर्चा झाली. शेवटी प्रसाद पानकर यांनीच ‘आयकोनिक’ हे नाव सुचवले जे, सर्वांना आवडले. त्या बॅचमध्ये अकरा विद्यार्थी होते त्यामुळे ‘आयकोनिक’ला 11 ही संख्या जोडली गेली. त्या वर्षापासून हे कॅलेंडर (Calendar) आता दरवर्षी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला समाजमाध्यमांवर प्रकाशित होत असते. अपवाद 2021 चा. कोरोनाच्या (Corona) उद्रेकामुळे त्यावर्षी कॅलेंडरसाठी शूट करणे शक्य झाले नाही. यंदापासून ‘दैनिक गोमन्तक’ या फॅशन कॅलेंडरचा मीडिया पार्टनर असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com