गोव्यात 'नाटक' एक कमाईचे साधन

‘नाटक’ या माध्यमाकडे जी व्यावसायिक बांधिलकी असणे गरजेचे आहे
गोव्यात 'नाटक' एक कमाईचे साधन
In Goa, drama is considered a source of incomeDainik Gomantak

मागच्या वेळेस ग्रोटोव्स्कीच्या ‘पुअर थिएटर’वर लिहिलं गेलं होतं. ‘पुअर थिएटर’ची संकल्पना वापरून नाटक सादर करण्यासाठी पारंपरिक रंगमंचाची आवश्यकता नसते. सादरीकरणासाठी व प्रेक्षकांना बसण्यासाठी लहानशी मोकळी जागा मिळाली तरी बस्स असते. ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना, पडदे, नेपथ्य याचीही गरज नसते. रंगमंचावर जो अभिनेता वा सादरकर्ता असतो तो आपल्या अभिनयाच्या बळावर सादरीकरणाचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. अर्थात आपल्या लोकनाट्यातून आपण हे अशा प्रकारचे रंगमंचविरहित सादरीकरण नित्य पहात असलो तरी आज आधुनिक नाटकही अशा प्रकारच्या मोकळ्या रंगमंचीय अवकाशाची कास धरताना आपल्याला दिसून येते.

गोव्यात (Goa) अजूनही हौशी किंवा स्पर्धात्मक नाटकांना फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. कला आणि संस्कृती खाते चालवत असलेला ‘प्रयोग सांज’ हा उपक्रम हा एक स्तुत्य अपवाद आहे. पण त्यातही प्रकाशयोजना, ध्वनी, पोशाख, वेशभूषा, नेपथ्य इत्यादी रंगमंचीय घटक आपला आब राखून असल्याचे दिसते. ‘मिळेल त्या जागेत आणि आहे त्या साधनांनी’ सादरीकरण होऊ शकतं या सत्याची पूर्ण कल्पना असूनसुद्धा गोव्यातील नाट्यकर्मी अशा जागांवर नाटक सादर करायला धजावत नाहीत. अर्थात या साऱ्यासाठी ‘नाटक’ या माध्यमाकडे जी व्यावसायिक बांधिलकी असणे गरजेचे आहे तिचा अभाव एक-दोन अपवाद सोडल्यास, गोव्यात साऱ्याच नाट्यकर्मीकडे दिसतो. गोव्यात कला अकादमीच्या नाट्यशाळेतून (अथवा आता चालू असलेल्या नाट्य महाविद्यालयातून) शिकणारे नाट्यशास्त्राचे बहुतेक विद्यार्थी, ‘नाटका’कडे व्यवसायाचे माध्यम म्हणून पाहण्याऐवजी नोकरीचे (Job) करण्याचे माध्यम म्हणूनच अधिक पाहतात. शाळेतून शिकवण्यात येणाऱ्या ‘नाट्यशास्त्र’ या विषयाचे शिक्षक बनण्यात अधिक स्वारस्य असते. अर्थात अशाने नाटकात वेगवेगळे प्रयोग करू पाहणाऱ्यांची संख्यादेखील मर्यादित राहते.

In Goa, drama is considered a source of income
चिखलीतील 'ही' कालवे, त्यामुळे विंडोपेन ऑयस्टर म्हणून नावारूपाला आली

या पार्श्वभूमीवर सत्तरी (Sattari) येथील शाबलो गावकर हा युवा रंगकर्मी आपल्या परिसरातील कलाकारांना घेऊन करत असलेला प्रयोग स्वागतार्ह आहे. कला अकादमीच्या ‘स्कूल ऑफ ड्रामा’चा (School Of Drama) हा विद्यार्थी, कला अकादमीत नाट्यशास्त्राचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात कडून सादरीकरण कलेची पदवी मिळवली. त्यानंतर आपल्या भागात त्याने ‘श्री सातेरी कलामंच सत्तरी’ ही संस्था स्थापन केली व या संस्थेतर्फे ‘रंगमांड’ हा उपक्रम 2019 सालच्या जानेवारी महिन्यात सुरू केला. या उपक्रमाची सुरूवात कुठल्याही प्रस्थापित रंगमंचावर न करता ती आपल्याच घरच्या अंगणात संस्थेने केली परंतु सुरुवातीच्या काही सादरीकरणानंतर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) त्यांना इतरत्र सादरीकरण करता आले नाही. परंतु आता नवीन वर्षाचे निमित्त साधून आणि कलेप्रती प्रेम व सादरीकरणाची आवड असणाऱ्यांना मंच मिळावा म्हणून ‘रंगमांड’ पुन्हा घरच्याच अंगणात कार्यान्वित करण्यात आला आहे. ‘रंगमांड’मध्ये नृत्य ते नाटक (Drama) अशा साऱ्याच कलांचा वेळ आहे व त्याचे स्वरूप तत्कालस्फूर्ततेने बदलतही राहते.

शाबलो गावकर गोव्यात नाटकासंबंधाने गंभीर उपक्रम चालवणाऱ्या ‘थिएटर फ्लेमिंगो’ या संस्थेचाही सदस्य आहे. स्वतःचा शाबलोने अनेक कोकणी व मराठी भाषेतील नाटकांमधून कामे केली आहेत. बालनाट्याशी संबंधित असलेल्या ‘थिएटर फ्लेमिंगो’च्या ‘घुमचेकटर्र’ या उपक्रमाशी शाबलो जुळलेला आहे. आतापर्यंत पाच हजार शालेय विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी या उपक्रमाद्वारे काम केले आहे व हा उपक्रम अजूनही चालू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com