International Nurses Day 2021: परिचारिकांच्या हितार्थ मागण्या!

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

घरांमध्ये तसेच नर्सिग होम्समध्ये पुरवली जाणारी परिचारिकांची सेवा समाधानकारक नाही, अशा तक्रारी लोकांकडून येत असतात. एखादी परिचारिका प्रशिक्षित नसते अथवा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने परिचारिकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवेवर परिणाम होत 
असतो.

गोवा(Goa) राज्यातील परिचारिकांना(Nurses) उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची(Task Force) स्थापना करावी, अशी मागणी गोवा महिला मंचाने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त(International Nurses Day) केली आहे. हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो.(International Nurses Day 2021 Demands for the welfare of nurses)

गोव्यातील नर्सेसच्या हितार्थ राज्य सरकारने सध्याच्या स्थितीत ‘टास्क फोर्स’च्या मागण्या पूर्ण करणे अत्यावश्यकच आहे, असे मंचाच्या निमंत्रक लॉर्ना फर्नांडीस यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्य सेवा संचालनालयाला लेखी दिवेदन सादर केले आहे. त्या खात्याचे संचालक डॉ. जोस डिसा यांना मंचाने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे, की ‘मेडिकल ट्युरिझम’च्या दृष्टिकोनातून गोव्यात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या राज्यातील विविध भागांत नवनवीन इस्पितळे आणि वैद्यकीय सेवा कार्यान्वित केल्या आहेत. 

COVID-19 Goa: एका दिवसात 75 तर मे महिन्यात 636 जणांचा मृत्यू 

सध्या कोविड महामारी दुसऱ्या टप्प्यात असून, त्या भयावह परिस्थितीतही स्वत:चा जीव धोक्यात घालून परिचारिका काम करीत आहेत व अशा धोकादायक परिस्थितीत हा परिचारिका दिवस साजरा करण्यात येत आहे. अशा या वैद्यकीय कार्यात परिकारांचे योगदान अद्वितीय स्वरूपाचे आहे. सध्या गोव्यातील बहुतांश सरकारी व खासगी इस्पितळांत प्रशिक्षित परिचारिकांचा तुटवडा भासत आहे. कोविड सुविधा केंद्रांत व कोविडच्या संदर्भात नव्याने कार्यान्वित केलेल्या इस्पितळातही अशा परिचारिकांची संख्या खूपच कमी आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. घरांमध्ये तसेच नर्सिग होम्समध्ये पुरवली जाणारी परिचारिकांची सेवा समाधानकारक नाही, अशा तक्रारी लोकांकडून येत असतात. एखादी परिचारिका प्रशिक्षित नसते अथवा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने परिचारिकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवेवर परिणाम होत असतो.

COVID-19 Goa: या केंद्रांवर सर्वाधिक कोविड रूग्णांची नोंद 

कित्येकदा काही परिचारिकांना अतिरिक्त काम करावे लागते व कायद्यानुसार आवश्यक असलेल्या त्यासंदर्भातील सुविधा व मोबदला यांचा लाभही त्यांना मिळत नाही, अशा समस्याही त्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.

परिचारिकांच्या हितार्थ मागण्या!
शारीरिक मारहाण, लैंगिक अत्याचार इत्यादी विषयांच्या अनुषंगाने खासगी व सरकारी परिचारिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा पातळीवर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे; कामगारवर्गाशी निगडित असलेल्या यथायोग्य वेतन, अतिरिक्त कामाबाबत पुरेसा मोबदला, मुलांच्या संगोपनासाठी रजा, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी, विमा आणि अन्य सुविधांबाबत कामगार आणि रोजगार आयुक्तांशी समन्वय साधणे; विविध सेवा यंत्रणांच्या माध्यमातून नर्सिग सुविधा पुरवणाऱ्यांच्या कामकाजाबाबत तसेच दर्जाबाबत परीक्षण करणे; गोवा परिचारिका मंडळ आणि भारतीय प्रशिक्षित परिचारिका संघटनेच्या गोवा राज्य शाखेच्या सहकार्याने परिचारिका सेवेबाबत ‘सिटिझन्स चार्टर’ तयार करून तो दस्तऐवज गोव्यातील सर्व इस्पितळे व परिचारिकागृहांना उपलब्ध करणे, अशा विविध मागण्या गोवा महिला मंचाने आरोग्य संचालनालयासमोर मांडल्या आहेत.

संबंधित बातम्या