International Nurses Day 2021: 'परिचारिका' नेतृत्व करणारा एक आवाज

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बाधित होण्याचा धोका असून आतापर्यंत अनेक परिचारिकांना सेवा देताना कोरोनाची लागण झालेली आहे.

सध्या कोरोना(Corona Virus) महामारीची दुसरी लाट तीव्र बनलेली असून मोठ्या संख्येने रुग्ण तसेच बळीही नोंदले जाऊ लागले आहेत. या परिस्थितीत वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण पडलेला आहे. हा ताण सोसत डॉक्टरांच्या(Doctors) जोडीला परिचारिकाही(Nurses) आपल्या जिवाची बाजी लावून कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. आज बुधवारी जगभरात परिचारिकादिन(International Nurses Day 2021) साजरा केला जाणार असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे योगदान आणि महत्त्व यांना त्यानिमित्त पुन्हा उजाळा मिळणार आहे. (International Nurses Day 2021 Nurses are backbone of hospital)

आंतरराष्ट्रीय परिचारिकादिन हा दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. जगातील सर्वांत विख्यात परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल या 1820 सालामध्ये या दिवशी जमल्या होत्या. त्यांच्या स्मृत्यर्थ हा दिन साजरा केला जातो.‌ आंतरराष्ट्रीय परिचारिका मंडळाकडून 1965 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा करण्यात आला आणि या दिवसाला आंतरराष्ट्रीय परिचारिकादिन हे नाव 1974 मध्ये मिळाले. यंदा या दिवसाची संकल्पना ''परिचारिका : नेतृत्व करणारा एक आवाज'' अशी ठेवण्यात आलेली आहे. 

International Nurses Day 2021: परिचारिकांच्या हितार्थ मागण्या! 

सध्या कोरोना महामारीने उग्र रूप धारण केलेले असल्याने या दिवसाला अधिकच महत्त्व प्राप्त झालेले आहे. कोविडच्या रुग्णांवर गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून उपचार करणाऱ्या इस्पितळांच्या परिचारिका या मुख्य आधारस्तंभांपैकी एक आहेत. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बाधित होण्याचा धोका असून आतापर्यंत अनेक परिचारिकांना सेवा देताना कोरोनाची लागण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर, 2020 पर्यंत 34 देशांतील 16 लाख आरोग्य कर्मचारी हे कोरोनाबाधित झाले होते.

COVID-19 Goa: या केंद्रांवर सर्वाधिक कोविड रूग्णांची नोंद 

युवा रुग्णांचे वाढते बळी
हळूहळू परिस्थिती सुधारून रुग्ण कमी संख्येने येऊ लागल्यानंतर दिलासा मिळाला होता आणि पुढच्या वर्षी स्थिती अधिक चांगली असेल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात गेल्या वर्षीपेक्षा वाईट स्थिती आलेली आहे आणि मोठ्या संख्येने रूग्ण येताना आणि बळी पडताना पाहून मनाला धक्का बसत आहे. खास करून युवा रूग्णांचे वाढत्या प्रमाणात बळी जाणे अधिकच धक्का देऊन जात आहे, असे अन्य एका परिचारिकेने सांगितले. ''पीपीई किट'' परिधान करून सतत वावरणे हे सोपे नसते. त्यात डोक्यावर कोरोनाबाधित होण्याचा धोका सतत लटकत असतो. त्यामुळे मनावर नाही म्हटला, तरी खूप ताण असतो. त्यात सध्या कोरोनाच्या ज्या नव्या रूपाने थैमान घातले आहे तो खूपच संसर्गजन्य आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

-अंकिता गोसावी

संबंधित बातम्या