आयपीएलचा घोडेबाजार! घोड्यांप्रमाणे 'खेळाडूंचा' लिलाव

आयपीएल हा आधुनिक घोडेबाजार झाला आहे. यात प्रत्येक संघाचा एक मालक असतो. त्याला फ्रँचायजी म्हणतात. तो एकरकमी पैसे गुंतवतो आणि संघमालक होतो.
IPL 2022
IPL 2022 Dainik Gomantak

सुदेश मळकर्णेकर

सध्या आयपीएलचा शेवटचा टप्पा जोरात चालू आहे. आयपीएल कोरोना काळातही खेळवला गेला. कारण तो एक व्यवसाय आहे. त्यात अर्थशास्त्र आहे. शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुटी लागण्यास आणि आयपीएल हंगाम सुरू होण्यास एकच गाठ पडते.

इतर मोसमात ही स्पर्धा खेळवली, तर प्रतिसाद मिळणार नाही. भारतातील उन्हाळी सुट्या प्रेक्षकवर्ग खेचण्यास मदत करतात. आयपीएलची सारी गणिते ही अर्थशास्त्रावर आधारित आहेत आणि नफ्याच्या दृष्टिकोनातून स्पर्धेकडे बघितले जाते.

एखादा व्यवसाय कुणी व्यावसायीक पद्धतीने करत असेल, तर त्याला काहीही हरकत नसावी, पण आयपीएलमध्ये केवळ पैसाच बोलतो आहे. यापूर्वी आयपीएलमधले सट्टेबाजी प्रकरण बाहेर आले, पण त्यात कुणाला फारसा धक्का बसला नाही.

IPL 2022
औद्योगिक विकासासाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री सावंत

आयपीएल सोडाच, क्रिकेटमध्ये सट्टेबाजीत गुंतलेल्या क्रिकेटपटूंचे कारनामे प्रकाशात येऊन त्यांच्यावर काही बर्षे किंवा अगदी आजीवन बंदीसारखे निर्णय झाल्यानंतरही या निर्णयांचा त्यांच्या आयुष्यावर काहीच फरक पडलेला दिसत नाही.

आयपीएल हा आधुनिक घोडेबाजार झाला आहे. यात प्रत्येक संघाचा एक मालक असतो. त्याला फ्रँचायजी म्हणतात. तो एकरकमी पैसे गुंतवतो आणि संघमालक होतो. इथूनच आयपीएलच्या घोडे बाजाराला सुरवात होते. पैसे गुंतवतानाच त्याला माहीत असते की आपण फायद्यात आहोत. कारण त्याला संघ खरेदी करतानाच पैसे गुंतवावे लागतात.

त्यानंतर केवळ पैसे जमाच करायचे असतात. एकदा का संघ खरेदी केला की सामन्याच्या टेलिव्हीजन प्रसारण हक्कामधूनच त्यांना बहुतेक गुंतवणुकीचा परतावा मिळतो. याशिवाय इतर स्पॉन्सरशिपमधूनही पैशाची आवक सुरू असते. स्थानिक सामन्यांचे सर्व हक्क त्यांच्याकडे असतात.

स्थानिक सामन्याचे उत्पन्नही फ्रँचायजी मालकांना मिळते. प्रसारण हक्क एखाद्या टीव्ही वाहिनीला दिल्यानंतर बीसीसीआय आपली चाळीस टक्के रक्कम काढून घेते आणि उरलेली रक्कम सर्व संघ मालकांत वाटली जाते.

फरक इतकाच की आयपीएलच्या घोडेबाजारात घोड्यांऐवजी प्रत्यक्ष माणसे म्हणजे खेळाडू पाळतात. घोड्यांप्रमाणे त्यांचाही लिलाव होतो. त्यांच्यावर बोली लावून त्यांना चक्क विकत घेतले जाते आणि सामन्यांत खेळवले जाते. घोड्यांना पळवले जाते, तर खेळाडूंना खेळवले जाते इतकाच काय तो फरक. प्रत्यक्षात खेळाडू सामनाभर पळतच असतात, हा भाग वेगळा.

त्यांनी वर्षभरात किती सामने खेळले, त्यांना विश्रांतीची किती गरज आहे यापैकी कोणत्याही गोष्टी पाहिल्या जात नाहीत. खेळाडूंनाही आयपीएल हंगाम महत्त्वाचा वाटतो. कारण त्यात सर्वाधिक पैसा मिळतो. त्याच लालसेने ते जातात. तसा हा लालसेचाच बाजार आहे.

सट्टा लावला जातो तो शर्यतीवर, जिथे पराकोटीची अनिश्चितता असते. म्हणूनच तर सट्टा खेळला जातो. फरक एवढाच की रेसकोर्सवरचा सट्टा अधिकृत किंवा कायदेशीर असतो आणि आयपीएलमधला बेकायदा.

आपण हरलो व जिंकलो यात घोड्यांना काहीच फरक पडत नाही. कारण त्यांना जिंकण्याची हाव किंवा मोह नसतो. त्यांच्यासमोर कितीही नोटा धरल्या तरी त्यांच्या लेखी तो कागदच असतो, पण आयपीएलमधील खेळाडूंच्या लेखी मात्र ते पैसे असतात आणि त्यांना मूल्य असते. येथेच बेकायदेशीर घोडेबाजाराला सुरवात होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com