
अनिल पाटील
कालचक्राच्या राहाटात, नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी जीवन सुसह्य होताना प्रगतीची चक्रे वेगाने धावत आहेत. पण यात निसर्गाची अपरिमित हानीही होताना दिसत आहे. जल, वायू यांचे पराकोटीचे प्रदूषण होऊन अनेक नैसर्गिक घटकांची अपरिमित हानी होत आहे. हा कालचक्राचा महिमा असला तरी याला मूलतः मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. अन्न, वस्त्र, निवाऱ्यामध्ये अन्नाला प्राथमिकता आहे. मात्र अलीकडच्या 40 वर्षात नैसर्गिक अन्नधान्याच्या लाखो जाती, वाण नष्ट झाले आहेत.
गेल्या वीस वर्षात केवळ तांदळाच्या 17 हजार जाती नष्ट झाल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक भरड धान्ये, तृणधान्ये, कडधान्ये ,फळे, भाजीपाला, दुर्मिळ वनस्पती, औषधी वनस्पती, प्राणी, पक्षी यांचा ऱ्हास सुरूच आहे. याचा परिणाम तात्काळ दिसत नसला तरी त्याचे दूरगामी परिणाम मानवी अस्तित्वाला धोकादायक ठरणार आहे. यासाठी देशातील काही लोक आपल्या परीने प्रयत्न करूत इतरांनाही प्रेरीत करत आहेत हे आशादायी चित्र आहे.
निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची अपरिमित हानी सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका अन्नधान्यांना बसत आहे. भरडधान्य, तृणधान्य, भाजीपाला, फळे यांच्या अनेक जाती झपाट्याने नष्ट होत चालल्या आहेत. यासाठीच, त्यांच्या नैसर्गिक संवर्धनाची गरज ओळखून, पर्यावरणीय आणि पारंपारिकदृष्ट्या या धान्यांच्या जातींचे संरक्षण करण्याचे काम सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यातील कोंभळणे गावच्या राहीबाई सोमा पोपेरे या नैसर्गिक धान्य, भाजीपाला यांचे बीज बँक तयार करून परिसरातील लोकांना देत आल्या आहेत. त्यांच्याकडे आता शेकडो प्रकारचे बी-बियाणे उपलब्ध आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहेत. त्यांच्या कामापासून प्रेरणा घेऊन ठिकठिकाणी बीज बँकेची संकल्पना रुजत आहे.
राहीबाई पोपेरे आज गोव्यात दाखल झाल्या असून उद्या सोमवारी 22 मे रोजी, तिसवाडी तालुक्यातील नेवरा येथे गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या नागरिकांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आज गोव्यात बोलताना त्या म्हणाल्या, 'धनधान्यांच्या प्रजातींची नैसर्गिकरित्या जोपासना करणे महत्वाचे आहे. महिलांनी यासाठी पुढाकार घेतल्यास भावी पिढ्यांसाठी अनेक बी बियाण्यांचे जतन निश्चित होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.