'कांतार’ म्हटले की गोव्याचा वारसा

कांतारे फक्त ख्रिश्चन लिहितात असा एक गैरसमज फैलावून आहे.
'कांतार’ म्हटले की गोव्याचा वारसा
KantarDainik Gomantak

तोमाझिन कार्दोझ

गोवा: 'कांतार’ म्हटले की आम्हाला लोर्ना आठवते, क्रिस पेरी आठवतो, अाल्फ्रेड रोझ आठवतो, तियात्र आठवते, आकाशवाणीवरील ‘मनजोगती गीता’ हा कार्यक्रम आठवतो. मराठीत जसे भावगीतांना स्थान आहे तसेच कोकणीत, कांतारांना आहे. कांतारे फक्त ख्रिश्चन लिहितात असा एक गैरसमज फैलावून आहे. मनोहरराय सरदेसाय यांच्यासारख्या कोंकणी कवीनेदेखील सुंदर कांतारे रचली आहेत. ‘आंग मुझे चोय पुण हात लाव नका’ किंवा ‘आपोय म्हाका हाव येता धावोन’ ही त्यांची कांतारे कित्येक वर्षे आकाशवाणीवरून गाजत होती. सी. अाल्वारिस, जासिंत वाझ, शालिनी, रॉबिन वाझ, जॅरी ब्रागांझा या गायकांची नावे तर मागच्या पिढीतील लोक अजूनही विसरले नसतील. ओलाव हा अलीकडच्या काळातील नवा सेन्सेशन आहे.

Kantar
नाट्यशिबिर केवळ नाटकासंबंधी नसते तर...

सोलो (एकल गायन), ड्युएट (द्वंद्व गीत), ड्युओस (दोघे गाणारे), त्रिओस (तिघे गाणारे), कॉर्टेट्स (चौघे गाणारे) असे असे कांतारात वेगवेगळे प्रकार असतात. कांताराला विषयाचे वावडे नसते. राजकारण्यांवर रचलेल्या कांतारांनी गोव्यात मध्यंतरी हल्लकल्लोळ माजवला होता. खरं तर अलीकडच्या काळात राजकारणावर, भ्रष्टाचारावर भाष्य करण्यासाठी ‘कांतार’ प्रभावीपणे वापरले जाते. पण दुर्दैवाने तियात्र किंवा कांतारांची लिखित संहिता उपलब्ध असणे ही एक दुर्मिळ गोष्ट असते.

Kantar
इतिहासजमा झालेली पुरण शेती....

या पार्श्वभूमीवर गोव्याचे नामवंत तियात्र दिग्दर्शक, तोमाझिन कार्दोझ आपण लिहिलेली कांतारे पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. तोमाझिन कार्दोझ हे गोव्याचे एक नामवंत तियात्र लेखक व कलाकार. त्यांनी आपल्या तियात्रासाठी लिहिलेल्या १०० कांतारांचा संग्रह, आज 14 मे रोजी, ‘कांतारा: गोंयचे दायज’ या नावाने प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील साऱ्या कांतारांचे संगीत नोटेशनही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय कोकणी भाषेतल्या या कांतारांचा इंग्रजी अनुवादही पुस्तकात छापलेला आहे. ‘गोव्याच्या तियात्र साहित्याचे जतन’ या योजनेखाली या पुस्तकाला तियात्र अकादमीचे अनुदान लाभले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज सायंकाळी 4.30 वाजता पाटो-प्लाझा येथील संस्कृती भवनच्या ‘मल्टीपर्पज हॉल’मध्ये पार पडेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.