अंत्यसंस्कारासाठी निस्वार्थपणाने मदत करणारा पेडण्याचा 'देवमाणूस'

प्रकाश तळवणेकर 
रविवार, 23 मे 2021

कुठल्याच मानधनाची अपेक्षा न करता हा माणूस दिवस-रात्र त्याला कळवल्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारी सर्व व्यवस्था करतो.

पेडणे: खरं तर मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मानवी जीवनाचं आणि मृत्यूचं (Death) जसं नातं आहेत तसंच मृत्यू आणि स्मशानभूमीचंही एक नातं आहे. स्मशानभूमीत येऊन माणसाच्या आयुष्याचा प्रवास संपतो. पण स्मशानभूमीत अशी एक व्यक्ती राबत असते, जी माणसाच्या या अखेरच्या प्रवासात त्याच्या सर्वात जवळ असते. मृत व्यक्तीला या जगातून निरोप देतानाची सारी व्यवस्था करणारी ही व्यक्ती मात्र कायमच उपेक्षित राहिलेली आहे. ती व्यक्ती असते मृत व्यक्तीला दहन करण्यास  लागणारी लाकडे उपलब्ध करून देणारी.(Kashinath Parab helping people for funeral)

कडसरे - वारखंड पेडणे येथील काशिनाथ महादेव परब हे त्यांचे नाव असले तरी  ''नाऊ''  या नावानेच गावात परिचित. पेडणे (Pedne) तालुक्यातच नव्हे तर शेजारच्या सिंधुदुर्गमध्येही (Sindhudrug) अंत्यसंस्कारावेळी (Funeral) लाकडाची सोय करून स्मशानातील सर्व तयारी हा माणूस कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणाने करतो. कुठल्याच मानधनाची अपेक्षा न करता हा माणूस दिवस-रात्र त्याला कळवल्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारी सर्व व्यवस्था करतो. हल्लीच कोरोनाचे संकट सुरू असतानाच चक्रीवादळ झाले व  सर्व जनजीवन विस्कळीत झाले. पेडणे तालुक्यातील गावामध्ये खूप झाडे रस्त्यावर पडली होती. वारखंड भागातील जी  झाडे रस्त्यावर पडली होती ती कापून वीज खात्याला त्याने सहकार्य केले आणि खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याने आपला हातभार लावला.

Goa: आपत्तीकाळात ‘कातनेर’ गेले कोठे?    

बारावीपर्यंत शिक्षण झालेले काशिनाथ परब आपला संपूर्ण वेळ याच कामासाठी देत आहेत.गावात अंत्यसंस्कार आणि "नाउ" हे तसे समिकरणच झालेले आहे.एखादी व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी जेव्हा तयारी होते तेव्हा ''अरे नाउ पावलो  मरे?'' अशी पहिली आठवण येते ती या नाउची. कोविड  पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्काराला लाकडे करण्यास कुणी येत नव्हते. तिथे नाउ धीर  नाउ उभा.अंत्यसंस्कार असो कि रस्त्यावर पडलेली  झाडे  असोत अशा वेळी हाकेला पावणारा नाऊ सर्वांसाठी आधारच बनलेला आहे.शेती,काजू बागायती,मिरची पीक घेऊन तो उदरनिर्वाह करतो.हे करून त्याला आराम करता आला असता किंवा नोकरीही करता आली असती.पण या युवकाला जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मरणकळांतून मुक्ती देणाऱ्या अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्तीची चांगल्याप्रकारे इहलोकीची यात्रा संपावी  म्हणून कदाचित असेल नाउला ही स्मशानाची जागा अधिक जवळची वाटते.

Goa: वन्यजीवांनाही वादळाचा फटका; कासवांची 335 अंडी नष्ट

आपल्या जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र या अशा सेवेतच नाउ घालवतो.अशी माणसं खूप गरजेची असतात पण यांची कुणीही दखल घेत नसल्याने उपेक्षित  रहातात. समाजाने अशा लोकांना त्यांचा मानसन्मान राखायला हवा. कारण कठीण, दुःखी प्रसंगावेळी त्यांचा धीर फार मोठा असतो हे सुद्धा तितकच खरं आहे.

संबंधित बातम्या