कोकण फळ महोत्सवाचे झाले 'पुनरागमन'

इएसजीच्या इमारतीसमोर भरणारा हा ‘फल महोत्सव’
कोकण फळ महोत्सवाचे झाले 'पुनरागमन'
Konkan Fruit FestivalDainik Gomantak

मे महिन्यात फळांचे ग्रह उच्च स्थानी असतात. निरनिराळ्या फळांनी बाजार विविधारंगी बनलेला असतो. फळांचा मोसम बहरात असतो. अशा वेळी आयोजित होणारा ‘कोकण फळ महोत्सव’ हा त्या साऱ्या फळांचे मोसमातले एक प्रकारचे बहारदार संमेलनच असते. येत्या 13, 14 आणि 15 मे रोजी हे संमेलन मांडवी किनारी भरणार आहे. ‘इएसजी’च्या इमारतीसमोर भरणारा हा ‘फल महोत्सव’ पार लाईटहाऊसपर्यंत पसरलेला असेल. कोविडकाळानंतर तीन वर्षांनी होणारा हा फळमहोत्सव आयोजित करण्यासाठी ‘बॉटेनिकल सोसायटी ऑफ गोवा’ आणि पणजी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. गोवा शेती संचालनालय, शेती महाविद्यालय, स्वयंसेवी संघटना आणि इतर सरकारी संस्था या महोत्सवाचे भागीदार असतील.

Konkan Fruit Festival
मारहाण करून लुटायचे मोबाईल; पणजी पोलिसांनी केले अटक

गोवा आणि कोकणमधल्या फळांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि लोकांमध्ये फ्ळांचा प्रसार करण्यासाठी हा महोत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवात कुंडीतील फळझाडे आणि ताजी फळे प्रदर्शनात असतील. त्याशिवाय रोपवाटिका, प्रक्रिया केलेली फळ उत्पादने, खते तसेच इतर कृषीविषयक साहित्याचाही या प्रदर्शनात समावेश असेल. वैयक्तिक विक्रेते आणि खाजगी कंपन्याचेही स्टॉल प्रदर्शनात असतील. या महोत्सवाच्या निमित्ताने फळे आणि फळ उत्पादनांच्या संबंधित स्पर्धांचेही आयोजन होणार आहे.

गुरुवारी 12 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ताज्या फळांच्या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारल्या जातील. प्रत्येक फळांचे चार-पाच नग (आंबा,चिकू, काजू इत्यादी) अननस, पपईचा एक नग प्रवेशिकेसोबत अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या विभागीय शेती अधिकाऱ्यांकडे संपर्क साधू शकता.

Konkan Fruit Festival
देशाचे वास्तविक जीवन खेड्यात: पी.एस.श्रीधरन पिल्लई

दि. 13 मे रोजी प्रक्रिया केलेल्या फळ उत्पादनांच्या प्रवेशिका (रस, वाईन, जॅम, लोणची, चटणी, केक, जेली स्कॅश आदी) 10 ते ३ यावेळात स्वीकारल्या जातील. फळ-भाज्यांवरचे कोरीव काम, फुलांची मांडणी आणि इतर उपक्रम सकाळच्या सत्रात पार पडतील. सायंकाळच्या वेळेस बक्षीस वितरण आणि संगीताच्या कार्यक्रमांची धूम असेल.

14 मे रोजी - ‘कुंडीतील फळझाडांची स्पर्धा’ यावर्षी प्रथमच घेतली जाईल. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सकाळी दहा वाजता या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारल्या जातील. फळांचे, रोपट्याचे आरोग्य आणि त्याची एकंदर मांडणी या निकषावर त्याचे परीक्षण केले जाईल. ही रोपटी १४ आणि 15 मे असे दोन दिवस प्रदर्शनात असतील. या दिवशी संध्याकाळी वेशभूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. विजेत्यांना त्याच दिवशी बक्षीसे प्रदान करण्यात येतील.

15 मे रोजी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा व अन्य उपक्रम - जसे ‘फळांचे वजन पारखा’ इत्यादी आयोजित होतील. संध्याकाळी 5 वाजता या महोत्सवाची सांगता होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.