पूर्वी वर्ण कशावरून ठरवलं जायचं? ग्रंथांमध्ये काय संदर्भ आहेत वाचा

हा क्षत्रिय आणि जैन समाज विंध्य पर्वताच्या दक्षिणेपर्यंत पसरला होता का, या प्रश्नातच कदाचित आपल्या, ‘चाड्डी कोण आहेत?’ या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.
History |
History |Dainik Gomantak

तेनसिंग रोद्गीगिश

हा क्षत्रिय आणि जैन समाज विंध्य पर्वताच्या दक्षिणेपर्यंत पसरला होता का, या प्रश्नातच कदाचित आपल्या, ‘चाड्डी कोण आहेत?’ या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.

भांडायन - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मांस देऊन करावा, असा उल्लेख करणाऱ्या धर्मग्रंथांना मान देऊन, धार्मिक गृहस्थ विद्वान ब्राह्मण आल्यावर त्याला गाय किंवा बैल किंवा बकरी अर्पण करतात. हेच आचरण धर्मसूत्रांचे लेखकही सांगतात.

सौधातकी- आता तिथे, मी तुला पकडले आहे!

भांडायन - कसे, ते कृपा करून सांग

सौधातकी- कारण, वसिष्ठ आल्यावर गाय मारली जाते आणि जनकाचे स्वागत फक्त दही आणि मध देऊन करतात.

(संदर्भ : लानमन, 1915 : भवभूतीज उत्तर-राम-चरित, 60)

या उताऱ्यात वसिष्ठ हा ब्राम्हण आहे तर जनक क्षत्रिय आहे. ब्राम्हणाचे मांसाहारी असणे व क्षत्रियाचे शाकाहारी असणे याचा विचार जर आपण चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या चौकटीत केला तर हे थोडे विचार वाटते.

परंतु जर आपण हे मान्य केले की त्यावेळी वर्ण हा व्यावसायिक विभागणीपेक्षा त्वचेच्या रंगावरून ठरवला जात होता, तर हा विरोधाभास भासणार नाही. वर्ण म्हणजे रंग. गोऱ्या कातडीचे आर्य त्यांच्यापेक्षा कमी गोरे असलेले लोक भेटले की, त्यांच्याशी वेगळे वागत. ऋग्वेदात अगदी सुरुवातीपासूनच वर्ण हा शब्द ’काळसर किंवा गोरा रंग असलेल्या लोकांच्या समूहाशी’ संबंधित आहे.

History |
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याशी असलेले ऋणानुबंध

(संदर्भ : केन, 1941 : हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, खंड 2, भाग 1, 25) उदाहरणार्थ, इंद्र, ज्याने दशवर्ण गुहेत खाली ठेवले (ऋग्वेद 2.12.4), इंद्राने दास्यूस मारून आर्यवर्णाचे रक्षण केले (ऋग्वेद 1.130.8).

आर्य-अनार्य चकमकींनी स्वतःच नवीन समुदाय तयार केले, ज्यांना चारही वर्णांत सामावून घ्यावे लागले. आदिपर्वाच्या 104व्या अध्यायाच्या शेवटच्या परिच्छेदात असे म्हटले आहे, ‘आणि अशा प्रकारे ब्राह्मणांच्या वंशातून क्षत्रिय वंशात अनेक पराक्रमी धनुर्धारी आणि महान सारथींचे लग्न झाले. (संदर्भ : रॉय, 1884 : महाभारत, 317)

आर्य स्वत:ला ब्राम्हण म्हणत; समाजाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे अग्नि आणि सोम विधी. तेव्हा आर्याला ज्ञात असलेल्या प्रदेशातील इतर क्षत्रिय होते. याला पुष्टी देणारे अनेक संदर्भ वैदिक ग्रंथांमध्ये सापडतात. काणे यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रारंभिक काळात फक्त दोनच वर्ण होते, आर्य आणि त्यांचे विरोधक दास्यू किंवा दास.

रंग आणि संस्कृती यावरून दोघांत असलेले भेद कमी-अधिक प्रमाणात वांशिक आणि सांस्कृतिक होते. (संदर्भ : काणे, 1941 : 48) ब्राम्हणांच्या यज्ञपद्धती आणि क्षत्रियांनी चालवलेला अहिंसा सिद्धांत यांच्यातील तफावत फार प्राचीन असल्याचे दिसते. मनुस्मृतीप्रमाणे अखेरीस आर्यावर्त ‘समुद्रापासून समुद्रापर्यंत’ पसरला.

कुरु-पांचालाची ब्राम्हण संस्कृती व विदेह आणि मगधची क्षत्रिय संस्कृती यांच्यात कमालीचा विरोधाभास निर्माण झाला. कुरु-पांचाल ब्राम्हणांनी प्राच्य देशांत जाऊ नये, असा सल्ला शतपथ ब्राह्मणात देण्यात आला आहे.

कारण तेथील आर्य ग्रंथांमध्ये सांगितलेला त्यांचा त्यागाचा धर्म विसरले आहेत आणि त्यांनी त्यागाच्या विरोधात नवी पद्धत स्वीकारली आहे. (संदर्भ : चक्रवर्ती, 1974 : जैन लिटरेचर इन तमिळ, 4) उपनिषदांच्या कालखंडात या दोन विचारसरणींतले भिन्नत्व स्पष्टपणे दिसते;

ब्राह्मणांच्या आधिपत्याखाली बळी दिला जाणारे यज्ञ करणारे कुरु-पांचाल आर्य व प्राचार्यांच्या आधिपत्याखाली आत्मविद्या ग्रहण करणारे क्षत्रिय, यात राजा जनक आणि याज्ञवल्क्य यांच्या समावेश होता. (संदर्भ : चक्रवर्ती, 1974 : जैन लिटरेचर इन तमिळ, 6)

History |
Sambhaji Maharaj: समरांगणावर शत्रुला धडकी भरवणारे छत्रपती संभाजी महाराज

तरीही, जेव्हा अलेक्झांडरचा धोका जाणवू लागला, तेव्हा चाणक्य आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी देशाला एकत्र करून लढा देण्याच्या ध्येयाने अहिंसक असलेल्या मगधकडे धावला; त्याने तक्षशिला आणि मगध यांच्यामध्ये असलेल्या संपूर्ण कुरु-पंचालला वगळले.

कुरू-पांचाल वगळून मगधाकडे केलेले प्रयाण भारतीय इतिहासातील सर्वांत चिरस्थायी रहस्यांपैकी एक आहे. यात क्षत्रियांची एक वेगळीच ओळख आपल्यासमोर येते.

चाणक्याने आपले ध्येय तरुण चंद्रगुप्त मौर्य या व्यक्तीकडून पूर्ण करून घेतले. तक्षशिला येथील आपल्या गुरूकडून प्रेरित, प्रशिक्षित झालेल्या या तरुणाने भाडोत्री सैन्य उभे केले आणि मगधच्या नंद राजाचा पाडाव केला; आणि जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंड व्यापणारे साम्राज्य निर्माण केले.

मग, त्याच्या वैभवाच्या शिखरावर असताना आणि अजूनही राज्य करण्यास योग्य वयाचे (वय 56 वर्षे - संदर्भ : भार्गव 1935 : चंद्रगुप्त मौर्य, 31) असताना आपल्या मुलाला सिंहासनावर बस्वून जैन भिक्षू म्हणून भद्रबाहुमुनींची दीक्षा घेतली. आपले ध्येय साध्य झाल्यानंतर क्षत्रिय आपल्या मूळ धर्माकडे म्हणजे अहिंसेकडे वळले.

History |
Goa Accident: रस्ते अपघातांची मालिका मती गुंग करणारी

या टप्प्यावर; ब्राम्हण असलेल्या चाणक्याने, क्षत्रिय असलेल्या चंद्रगुप्ताला त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी का निवडले? एका ब्राम्हणाच्या मार्गदर्शनाखाली एक बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारा क्षत्रिय चंद्रगुप्त, नंतर जैन भिक्षू का झाला? चंद्रगुप्त सुरुवातीपासूनच जैन होता की नंतर त्याचा विचार बदलला? असे अनेक प्रश्न उभे राहतात.

हे प्रश्न क्षत्रिय आणि जैन या शब्दांच्या चुकीच्या अर्थावर प्रकाश टाकतात. आपण आधी पाहिल्याप्रमाणे, कुरु-पांचाल आर्य स्वत:ला ब्राम्हण मानत होते आणि प्रयागाच्या पूर्वेकडील आर्य हे क्षत्रिय मानत होते. त्यामुळे चंद्रगुप्त हा क्षत्रिय होता असे समजणे उचित आहे.

पुन्हा, आपण आधी म्हटल्याप्रमाणे, या वेळी, जैन हा एक भौगोलिक आणि सांस्कृतिक संप्रदाय होता असे दिसते. जैन समारंभात ब्राम्हणपुरोहित कार्य करत असल्याची उदाहरणे आढळतात; (संदर्भ : बर्गेस, 1874 : द इंडियन अँटिक्वेरी, खंड तिसरा, 154) हे खूप साहजिक आहे, कारण जैनांनी तोपर्यंत कोणतेही विस्तृत विधी आणि त्यांच्या व्यावहारिक गरजा भागवण्यासाठी एक ’प्रभावी’ देवस्थान विकसित केले नव्हते.

History |
Sambhaji Maharaj: अखंड शौर्याचे प्रतिक ! छत्रपती संभाजी महाराज

तसेच ‘ब्राम्हणजैन’ हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो. (संदर्भ : सायक्स, 1841 : जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी, खंड 6, 301) त्या अर्थाने चंद्रगुप्त जैन असण्याची शक्यता आहे. जर आपण क्षत्रिय आणि जैन या शब्दांचा पुनर्व्याख्या केला तर अहिंसक योद्ध्यांचा विरोधाभास नाहीसा होईल.

जैन हा एक असा समुदाय आहे, ज्याने पूर्वेकडील भारत व्यापला आहे. आत्मविद्या आणि अहिसा हे जैन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. भारतातील काही महान राजे तसेच काही महान आध्यात्मिक गुरू जैन आहेत.

हा क्षत्रिय आणि जैन समाज विंध्य पर्वताच्या दक्षिणेपर्यंत पसरला होता का, या प्रश्नातच कदाचित आपल्या, ‘चाड्डी कोण आहेत?’ या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com