'स्त्री'चे आत्मसन्मानाने जगणे..

संजनालाही वाटते की जोपर्यंत ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या (Financially) स्वावलंबी होणार नाहीत तोपर्यंत त्या आत्मसन्मानाने जगू शकणार नाहीत.
 'स्त्री'चे आत्मसन्मानाने जगणे..
'स्त्री'चे आत्मसन्मानाने जगणे.. Dainik Gomantak

कितीही संकटे समोर आले तरी स्वतःला सावरणे हे संजनाच्या अंगवळणी पडले आहे. निराश होऊन चालणार नाही हे ती स्वतःला सतत सांगत असते. संजनाला दोन मुले आहेत. त्यांना मोठे करायचे आहे, येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत तिला पुढे जायचे आहे. संजना अशीच एकदा पीसफूल सोसायटीच्या मीटिंगला (Meeting ) गेली होती. तिथेच तिची ओळख प्रशिला कपिलेश्वरकर हिच्याशी झाली. तिच्याकडून जे मार्गदर्शन (Guidance) संजनाला मिळालं तेव्हापासून तिचे जीवन बदलायला सुरुवात झाली. सुतळीच्या बॅगा, आकाश कंदील, लॅम्प शेड, वॉल हैंगिंग, शोल्डर बॅग ईत्यादी हस्तकलाकृती (Handicrafts) ती बनवू लागली. स्वतः संजना कष्टाळू वृत्तीची होतीच. प्रशिलाची साथ तिला मिळाली आणि संजनाच्या आयुष्यात आयुष्याला एक वेगळे वळण लाभले.

संजना दुसरीत शिकत असतानाच तिचे वडील वारले होते. घर भाड्याचे होतं. आई निराश झाली होती. एक दिवस ती आपल्या मुलांना घेऊन माहेरी आली. आईने खूप कष्ट केले. ती नेहमी आपल्या मुलांना सांगायची, शिक्षण घ्या, मोठे व्हा, मन लावून अभ्यास करा, कष्ट करायला लाजू नका वगैरे. एक दिवस आई पण तिला सोडून गेली.

 'स्त्री'चे आत्मसन्मानाने जगणे..
गोव्यात कुणालाही दोतोर का म्हणतात?

संजनाने ठरवलं, कष्ट करीन पण शिक्षण (Education) सोडणार सोडणार नाही. ती लोकांच्या घरी काम करी आणि मग शाळेत जाई. तिच्याकडे स्वतःचे पुस्तक घ्यायला पैसे नव्हते. शाळेतल्या वाचनालयातील पुस्तके आणून ती अभ्यास करायची. त्यानंतर रात्री एका कंपनीमध्ये पॅकिंगचे (Packing) काम करायला जायची. गणवेश शिवायला देखील तिच्याकडे पैसे नव्हते. शाळेतल्या बाईने आपल्या मुलीचा गणवेश संजनाला दिला. तो गणवेश संजनाने सातवी ते दहावीपर्यंत वापरला. इयत्ता दहावी ती चांगल्या मार्काने पास झाली. तिला पुढे शिकायचे होते पण शिकणार कशी? ज्या कंपनीमध्ये ती काम करायची, त्या कंपनीच्या मालकाला समजले की संजनाला पुढे शिकायचे आहे. मालकाने तिला विचारले तेव्हा संजनाने त्याना आपली अडचण सांगितली. मालकाने तिला त्यावेळी सातशे रुपये दिले व काम करुन फेड असे सांगितले. दुसऱ्या दिवशी संजनाने हायर सेकंडरीत जाऊन आपले नाव नोंदवले. फी भरली. उरलेल्या पैशांची गणवेश व पुस्तके विकत घेतली. त्या कंपनीतच काम करत तिने बारावीपर्यंत आपले शिक्षण (Education) पूर्ण केले. जे कर्ज घेतले होते तेदेखील फेडले.

संजना आता व्यवस्थित लिहू शकत होती, बोलू शकत होती. तिचा आत्मविश्वास वाढला होता. तिने एका दुसऱ्या चांगल्या कंपनीमध्ये अर्ज केला. तिथे तिला काम मिळाले. परंतु हे काम फक्त तीन महिन्यासाठी असायचं. दर तीन महिन्यांनी त्यांना ब्रेक मिळत होता. वेगवेगळ्या कंपनी बदलत 2004 ते 2008 पर्यंत ती काम करत राहिली. 2009 मध्ये तिने एका सरकारी कार्यालयात अर्ज केला तिथे तिला काम मिळालं. रंजना सांगते की त्या कार्यालयात तिला खूप शिकायला मिळालं. संजना आधी पॅकिंग (Packing) सेक्शनमध्ये काम करायची पण या सरकारी कार्यालयातले (Government Office) काम वेगळे होते. चांगले अनुभवी सहकारी, त्यांचं चांगलं मार्गदर्शन यामुळे संजनाच्या ज्ञानात भर पडत राहिली. तिच्या जीवनात खूप बदल झाला ती खूप खुश होती. त्या दरम्यान तिचं लग्न ठरलं व तिला नोकरी (Job) सोडावी लागली.

पुन्हा अशी नोकरी मिळणे कठीण आहे याची तिला कल्पना होती परंतु तिला पर्याय नव्हता. त्यानंतर मात्र तिच्या वाट्याला जे दुःख आले ते फार असहनीय अशा प्रकारचे होते. परंतु संजना नेहमीच सकारात्मक विचार करून हे सारे त्रास सहन करायची. आणि योगायोगाने पीसफूल सोसायटीच्या (Society) एका मार्गदर्शनावेळी तिला जे मार्गदर्शन मिळाले, ज्या नव्या मार्गदर्शिका मिळाल्या त्यामुळे तिला तिच्या जीवनात पुन्हा आशेचे किरण दिसू लागले. प्रशिलाने तिला एका वेगळ्या कलेची ओळख करून दिली आणि त्याप्रमाणे संजना त्या कलेला संजनाने वाहून घेतले. गणेशोत्सव (Ganesh Festival) , दिवाळी (Diwali) , जत्रा अशा काळात ती स्टॉल घालायची व आपण तयार केलेले सामान विकायची. तिची कष्टाळू वृत्ती पाहून प्रशिला कपिलेश्वर यानी तिला कपडे शिवण्याचे नवीन मशीन घेऊन दिले. आता संजना संजना स्वतः कपडे शिवू लागली. लोकांच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. संजना पुढे स्वयं-सहाय्यक गटातही सामील झाली. पुढे तिने स्वतः तीन स्वयंसहाय्य गट तयार केले व त्यांना ती वेगवेगळे प्रशिक्षण देऊ लागली. तिला वाटायचं, प्रत्येक हाताला काम मिळाले पाहिजे. महिलांना (Women) जर आर्थिक स्वातंत्र्य मिळालं तर ती अधिक स्वतंत्र होईल आणि घरही सांभाळेल याची कल्पना तिला होती. आत्मसन्मान (self-Respect) हा माणसांच्या जगण्यातला एक सर्वात महत्त्वाचा भाग असतो. संजनालाही वाटते की जोपर्यंत ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या (Financially) स्वावलंबी होणार नाहीत तोपर्यंत त्या आत्मसन्मानाने जगू शकणार नाहीत.

-भारती बांदोडकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com