विचारांचे व्यवस्थान

 ‘Charity’ means ‘the attitude of giving alms
‘Charity’ means ‘the attitude of giving alms

शुक्रवारचा दिवस, पावसाची रिपरिप सुरू होती. बाहेर टेरेसवर मस्त बसून निसर्गाच्या चमत्काराचा आस्वाद घेत असताना, मनाला एक विचार सहज स्पर्श करून गेला. माणूस सतत विचार का करतो ? कधी ही कुणाच्याही घरी आपण सहज आत शिरलो तर एकांतात असलेला माणूस हा नक्कीच विचारांच्या गर्तेत असलेला आपल्याला पाहायला मिळणार. हे असं का ? सहज प्रश्‍नाचा कहर डोक्‍यात थैमान घालू लागला आणि कुठेतरी वाचलेलं आठवले. एक दिवसात आपल्या डोक्‍यात किती विचार येत असतात असा तो प्रश्‍न होता. खाली म्हटलं होतं, एक दिवसात माणसाच्या डोक्‍यात दहा हजार विचार येत असतात पैकी अनेक विचार माणसाच्या विचार चक्रात परत परत येत असतात.
माणसाच्या डोक्‍यात विचारांचा कारखाना का ? चालवावा लागतो असा प्रश्‍न मग मनामध्ये डोकावू लागला. उत्तरार्ध सहज मनात विचार आला, माणसाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्याकारणाने त्यांच्या गरजा अधिक असतात. त्या पूर्ण करण्यासाठी माणसाची धडपड असते. परिणाम स्वरूप त्या कशा काय पूर्ण होईल याची आकलन शक्ती म्हणजेच मनातील विचारांचे चाललेले थैमान म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
मला वाटतं, माणसाच्या अंगी काही विशिष्ट गुण असायला हवेत. लोकांपेक्षा काहीतरी हटके विचार करण्याची प्रगल्भता माणसामध्ये असायला हवी. इतरांच्या परिस्थितीच्या भरवशावर न राहता स्वतःच्या हिमतीवर पुढे जाण्याची आश्‍वासक वृत्ती माणसामध्ये असायला हवी. ही वृत्ती माणसाच्या अंगात विशिष्ट गुण असल्यास शक्‍य आहे. दैनंदिन जीवनाच्या चौकटीत राहून केलेले व्यवहार हे नित्याचेच असतात. त्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची मनीषा माणसामध्ये असणे गरजेचे आहे. यासाठी चांगले विचार माणसांच्या डोक्‍यात असण्याची गरज आहे. शिवाय आजूबाजूच्या परिस्थितीवर माणसाचे सतत लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन गोष्टी शिकण्याची सवय आत्मसात असलेल्यांना नवीन गोष्टींना गवसणी घालणे सहज शक्‍य असतं.
मित्रांनो, ज्ञान ही एक अशा प्रकारची गोष्ट आहे, जी गोष्ट एखादा माणूस आपल्याला देतो, पण आवश्‍यक असल्यास देणारा माणूस दिलेले ज्ञान परत घेऊ शकत नाही. त्यासाठी आजच्या देवाण घेवाणीच्या युगात माणसांमध्ये सकारात्मकता असण्याची गरज आहे. एखाद्याला हव्या असलेल्या सर्वच गोष्टी मिळणे म्हणजे आनंद ठरत नाही तर ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्यामध्ये आनंद मानून अधिक आनंद शोधण्याची कल्पकता माणसामध्ये असायला हवी.
आजच्या घडीला माणसाने स्वार्थी वृत्ती सोडून निःस्वार्थी भावनेने जगण्याची खरी गरज आहे. समाजामध्ये आपण अनेक लोक पाहतो. प्रत्येक माणसाची जगण्याची पद्धत वेगळी, राहण्याची तऱ्हा वेगळी, विचारही वेगळे अशा सर्व प्रकारच्या लोकांनी आपल्या हाती असलेल्या क्षणातच जगण्याची कला आत्मसात करण्याची गरज आहे. कारण आपली भूमी गोल आहे, जगाच्या कुठल्याही भागात गेल्यास प्रत्येकाला गोल फिरून त्याच जागेवर यावे लागते. म्हणून जीवन जगताना मिळालेल्या गोष्टींचा पुरेपूर उपभोग घेऊन जगायला शिकण्याची गरज आहे.
वास्तविक आपलं जीवन हे समस्यांनी ग्रासलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनात अनंत समस्या या ठरलेल्याच वास्तविक समस्या आणि जीवन यांचा संबंध फार जवळचा आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात समस्या असतात. अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत समस्या माणसाची पाठ सोडत नाही. ज्यावेळी माणसाच्या जीवनाची समाप्ती होते त्याचवेळी समस्या माणसाची पाठ सोडते. म्हणून मला याठिकाणी नमूद करावेसे वाटते, माणसाच्या ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी
त्यांनी समस्या आपल्या पाठीमागे लागणारच असे गृहीत धरून चालले पाहिजे. समस्या या मानवी जीवनात नक्कीच व्यत्यय आणतात. समस्यांमुळे माणूस नक्कीच विचलित होतो. खरं तर ही नैसर्गिक प्रवृत्ती असते. पण त्यावर मात करण्याची कला माणसांमध्ये असल्यास त्याची परिणीती परिस्थितीवर मात करण्यात होते.
विचारांच्या देवाणघेवाण संबंधी ज्यावेळी आपण चर्चा करोत त्यावेळी माणसांच्या मनात चाललेला विचारांचा कहर लक्षात येतो, माणसाने केवळ विचार करण्याऐवजी सकारात्मक विचार केल्यास त्यातून चांगल्या गोष्टी निष्पन्न होण्यास मदत होईल. मात्र, विचारांचे व्यवस्थान योग्य प्रकारे हाताळण्याची गरज आहे. योग्य व्यवस्थानचे सूत
एखाद्याला साध्य करण्यास जमले तर त्याच्या एवढा भाग्यवान माणूस दुसरा कुणीही नसेल.
विचारांच्या व्यवस्थानाविषयी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी एक गोष्ट सहज ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही, आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते व्यवस्थानाची व्यवस्था करण्याची. जग झपाट्याने बदलत आहे. तोच वेग साधून माणसाने आपल्या उज्‍ज्वल भवितव्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन करून तंतोतंत पाळण्याची गरज असते. कारण प्रत्येक सकारात्मक विचार यश हे हमखास असते, त्यासाठी योग्य प्रकारे सर्व गोष्टी मॅनेज करण्याकडे माणसांचा कल असायला हवा.
विचारांच्या व्यवस्थापनांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणसाच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यांचे व्यवस्थापन असायला हवे. आर्थिक मिळकतीवर विचारपूर्वक मंथन करून दिशा ठरविण्याची आवश्‍यकतेबरोबरच प्रत्येकाने आपल्या जीवनाची घडी व्यवस्थित बसविण्यासाठी सकारात्मक विचारांना खतपाणी घालून सक्षम विचार प्रणाली आखणे जरुरीचे आहे.
माणसाच्या मनात ज्यावेळी विचारांचे मंथन सुरू होते त्यावेळी सकारात्मक आणि नकारात्मक विचार सुरू असतात. अशा परिस्थितीत नकारात्मक विचारांना बगल देऊन चांगल्या विचारावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चांगल्या विचारांना खतपाणी घालून त्या विचारांच्या सकारात्मक जडणघडणीवर लक्ष केंद्रित केल्यास त्याचा नक्की फायदा होईल. वायफळ गोष्टींवर वेळ खर्चीक घालण्यापेक्षा सकारात्मकतेवर भर दिल्यास चांगला निकाल येण्याची शक्‍यता असते. माणसाने आपले जीवन मौल्यवान दागिन्याप्रमाणे करण्यासाठी झटले पाहिजे.
समस्यांचा हा हिशेब प्रत्येकाने आपल्या डोक्‍यातील नोंद वहीमध्ये लिहून ठेवण्याची आवश्‍यकता असते. तसेच मनामध्ये ते कोरून ठेवण्याची गरज असते. कारण जगात फक्त मेंदू आणि मन अजिबात विश्रांती न घेता काम करत असतो, म्हणून त्यांना आनंदी ठेवण्याची गरज आहे. ते मग तुमचे असो अथवा इतरांचे.
विचारामध्ये सकारात्मकता असल्यास विचार मनुष्यांचे भाग्यही बदलू शकतं. मनात चांगल्या विचारांची रेलचेल असल्यास त्याची परिणीती शुभवार्तेने होते व अनेकदा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून येतात. त्यासाठी काम करत असताना नेहमी चांगले विचारांचे बीज मनात पेरावे, मन आनंदी ठेवावे. मनात प्रबळ इच्छाशक्ती ठेवावी कारण इच्छा शक्ती हे एक असं शस्त्र आहे. ज्यामुळे सर्व काही बदललं जाऊ शकतं.
आपले विचार हे मनुष्याच्या जीवनाला आकार देत असतात, म्हणून आपल्याला नक्की तेच दिसत जे पाहायची आपली इच्छा असते. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जीवन हे प्रत्येक क्षणी बदलत असतं, त्यानुसार माणूसही बदलत असतो. 


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com