Theater: मराठी हौशी रंगभूमी आणि गोमंतकीय रंगकर्मी

तांत्रिक अंगाने जरी नाटके बरीच पुढारलेली असली तरी आशयाच्या बाबतीत मात्र आजचे नाटक बरेच खालावलेले आहे
Theater
TheaterDainik Gomantak

रवींद्र आमोणकर, ज्येष्ठ नाट्य कलाकार

महाराष्ट्र राज्य हौशी राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत परीक्षक म्हणून काम करण्याची यंदा मला संधी मिळाली आणि आजच्या हौशी नाटकासंबंधाने खूप काही नवीन समजून घेता आले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून प्रथमच गोव्याच्या एका प्रतिनिधीची निवड झाली होती या गोष्टीचा मला अभिमान आणि आनंद होताच.

यंदा, नाशिक केंद्रावर स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित झाली होती. महाराष्ट्र राज्यभरातील तसेच गोवा केंद्रामधून आलेली एकंदर 40 नाटके या अंतिम फेरीत होती.

नाशिकमधील दोन थिएटरमध्ये मिळून ही सारी नाटके सादर झाली. काही वेळा दिवसाला दोन नाटके पाहवी लागत असे. 28 दिवसांत एकंदर 40 नाटकांचे परीक्षण परीक्षक मंडळाने केले.

Theater
Theater: धाडिला राम तिने का वनी...

आजच्या काळात, मराठी हौशी रंगभूमीचा दर्जा फार खालावलेला आहे अशी टिका महाराष्ट्रात सारीकडे होत असते. या स्पर्धेच्या निमित्ताने मला जाणवले की त्या टिकेत नक्कीच तथ्य आहे.

तांत्रिक अंगाने जरी नाटके बरीच पुढारलेली असली तरी आशयाच्या बाबतीत मात्र आजचे नाटक बरेच खालावलेले आहे असेच म्हणावे लागेल.

या स्पर्धेमधली काही चांगली नाटके वगळल्यास, इतर नाटके इतक्या वाईट दर्जाची होती की ती अंतिम फेरीत दाखल कशी होऊ शकली हा प्रश्‍न पडावा. त्यापैकी एका नाटकात तर अशी दृश्‍ये होती की ते नाटक, ‘फक्त प्रौढांसाठी’ अशी अनाऊन्समेंट करून स्पर्धेत सादर झाले होते.

सर्व लोकांना खुला प्रवेश असणाऱ्या एखाद्या स्पर्धेत हे असे होणे कसे शक्य आहे हा प्रश्न त्यावेळी सर्वांना पडला होता.

Theater
Water Color: पेंटिंग ऑफ द वीक

गोव्यातील स्पर्धक संस्थेचे नाटक, जे या स्पर्धेत प्रथम आले, त्यात कोरियोग्राफी, प्रकाशयोजना, नेपथ्य या तांत्रिक बाजू खूपच उजव्या होत्या, परंतू आशयाच्या दृष्टीने हे नाटक फार कमीच होते. कथा दुबळी परंतु तंत्र भक्कम असेच काहीसे या नाटकाबाबत झाले होते.

आशयाच्या दृष्टीने उच्च दर्जाची नाटके या स्पर्धेत फार कमीच सादर झाली. आशयाच्या आणि अभिनयाच्या पातळीवर आजच्या नाटकावर काम होणे खूप गरजेचे आहे- विशेषत: नाट्य लेखनासंबंधात! प्रेक्षकांसमोर चांगल्या विषयाची, चांगल्या आशयाची नाटके सादर करण्याकडे गोमंतकीय रंगकर्मींनी लक्ष पुरवायला हवे.

नजीकच्या काळात गोवादेखील, कदाचित हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे केंद्र बनू शकते. त्यावेळी गोमंतकीय रंगकर्मींनी त्यातील नाटके पाहण्याची संधी सोडू नये. हौशी रंगभूमीसंबंधाने जाणून घेण्याची ती एक चांगली संधी असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com