गोमंतकीयांच्या जीवननाचा आधार; म्हादई

दोन मराठी आणि दोन कोंकणी काळीज; हाक म्हादईची या शीर्षकाखाली श्रवणीय झालेली आहे.
गोमंतकीयांच्या जीवननाचा आधार; म्हादई
Goa जलसिंचनाबरोबर पेयजलची पूर्तता करणारी म्हादई इथल्या कष्टकऱ्यांची महान आई आहे.Dainik Gomantak

म्हादईची काळीजहाक

म्हादई नदी (Mhadei river) ही गोमंतकीयांच्या (Goa) जीवन आधार आहे. शेजारच्या महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकाच्या तुलनेत ही नदी भौगोलिक क्षेत्रफळ आणि लांबी- रुंदीच्या (Length-width) दृष्टीने अगदी नगण्य असली तरी जगातल्या वैविध्यपूर्ण जैविक संपदेची ती भरण-पोषण करते.

Goa जलसिंचनाबरोबर पेयजलची पूर्तता करणारी म्हादई इथल्या कष्टकऱ्यांची महान आई आहे.
शत्रू अवतरला आहे

जलसिंचनाबरोबर पेयजलची पूर्तता करणारी म्हादई इथल्या कष्टकऱ्यांची महान आई आहे. याच म्हादईच्या उपनदी असणाऱ्या कल्टी नाल्याच्या काठावरती ज्याचे बालपण आणि तरुणपण गेलेले आहे, त्या नारायण हरिचंद्र गावस याला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या प्रस्थावीत धरणाच्या साखळीमुळे अस्वस्थपणा आला नसेल तर नवलच.

विद्यार्थी दशेपासून विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेशी निगडित असणाऱ्या नारायणचे बालपण सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या सावलीत आणि बेळेवंश कुळकाराच्या कुशीत वसलेल्या हळीत वाड्यावरती व्यतीत झालेले आहे. लहानपणापासून वडील हरीचंद्र यांच्याकडून तबला वादनाची प्रेरणा मिळाली.

Goa जलसिंचनाबरोबर पेयजलची पूर्तता करणारी म्हादई इथल्या कष्टकऱ्यांची महान आई आहे.
शोध, समाजातील वाढत्या उथळपणाचा!

बालभवन, कला अकादमी आणि सरकारी माध्यमिक विद्यालय केरी यांच्या व्यसपीठाद्वारे तबला, हार्मोनियम वादन आणि गायन या तिन्ही कलांची आवड विकसित झाली. म्हापसा येथील श्री गणेश हायर सेकंडरी येथे समाजशास्त्र मराठी या विषयाचे अध्यापन करत असताना त्याने कला संस्कृतीशी असलेले अनुबंध विकसित केले. आकाशवाणी, गोवा दूरदर्शन येथे त्याचप्रमाणे राज्यभरातील भजन स्पर्धेत गायन, वादनात उल्लेखनीय कामगिरी वेळोवेळी बजावली.

लोककला, भारतीय संगीत, नाटक, आदी क्षेत्रातील त्याच्या योगदानाची दखल घेऊन पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांनी 2013 साली युवा प्रतिभा पुरस्काराने त्याचा गौरव केलेला आहे. प्रा. राजेंद्र केरकर, प्रा. चंद्रकांत शिंदे, प्राचार्य गजानन मांद्रेकर यांच्याकडून लाभलेले मार्गदर्शन या बद्दलची कृतज्ञता त्याच्या नसानसात भिनलेली आहे.

आपल्या जगण्याला आणि जीवनाला आधार देणाऱ्या म्हादई मातेचे ऋण फेडण्यासाठी नारायणने स्वरचित दोन कोंकणी आणि प्रा. राजेंद्र केरकर यांच्या दोन मराठी गीतांना स्वरसाज चढवून म्हादईचे नैसर्गिक वैभव आणि तिला भोगाव्या लागणाऱ्या वेदना सुरळीतरीत्या समूर्त केलेल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com