गोव्यात पहिल्यांदाच मोडी मराठी अभ्यासक्रम

गजानन घांटकर हे 20 व्या शतकातील मोजक्या तज्ज्ञांपैकी एक होते ज्यांना ही लिपी लिहिता-वाचता येत होती.
गोव्यात पहिल्यांदाच मोडी मराठी अभ्यासक्रम
गोव्यात पहिल्यांदाच मोडी मराठी अभ्यासक्रमDainik Gomantak

गोवा (Goa) या छोट्याशा राज्याने भोजांपासून पोर्तुगीजांपर्यंत अनेक राज्यकर्ते आणि राजे पाहिले आहेत. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्याची स्वतःची विशिष्ट वैशिष्ट्ये होती. सर्व राज्यकर्त्यांचे स्वतःचे प्रशासन होते ज्यात त्यांची स्वतःची प्रशासकीय भाषा आणि लिपींचा समावेश होता. त्यामुळे गोव्यात ब्राह्मी, नागरी, गोय कानडी आणि मोडी मराठी लिपीत नोंदी आढळतात. वरीलपैकी काही लिपी नष्टही होण्याच्या मार्गावर आहेत कारण त्यांचे वाचन आणि उलगडा करण्यासाठी कोणीही तज्ज्ञ उपलब्ध नाहीत. उदाहरणार्थ गोय कानडी लिपीचा उगम कन्नड लिपीतून झाला आहे. हे कन्नड लिपीचे विकृत रूप मानले जात असे. त्यामुळे याला हळे कन्नड असेही म्हटले जात होते परंतु दुर्दैवाने आज गोव्यात ही लिपी वाचण्यासाठी कोणीही तज्ज्ञ नाहीत. जरी ही लिपी कन्नड गटाची असली तरी त्यावर प्रादेशिक प्रभाव होता. गजानन घांटकर हे 20 व्या शतकातील मोजक्या तज्ज्ञांपैकी एक होते ज्यांना ही लिपी लिहिता-वाचता येत होती. त्यांच्या मृत्यूनंतर ही लिपी समजून घेणारा कोणीही गोव्यात नाही.

गोव्याच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मोडी मराठी ही एक अतिशय महत्त्वाची लिपी आहे. 17 व्या शतकात गोव्यात तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता.17 व्या शतकात मोडी मराठी अधिकृतपणे वापरली जात होती. जमिनीच्या नोंदी, मंदिराच्या नोंदी, मराठ्यांनी पोर्तुगीजांना लिहिलेली पत्रे किंवा इतर पत्रव्यवहार अशी अनेक कागदपत्रे या लिपीत लिहिलेली आहेत.17 व्या-18 व्या शतकातील मृत्यू आणि जन्म प्रमाणपत्रही या लिपीत आहेत. कालावधीनुसार मोडी मराठी लिपी बदलली. या लिपीतले अनेक दस्तऐवज गोवा पुरभिलेख खात्यातील नोंदीत आहेत. गोव्यातील काही मोडी मराठी दस्तऐवज 1964 मध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागाराकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्यात आंग्रेनी पोर्तुगीजांना लिहिलेली काही महत्त्वाची पत्रेही होती.

गोव्यात पहिल्यांदाच मोडी मराठी अभ्यासक्रम
गोमंतकीयांच्या जीवननाचा आधार; म्हादई

या सगळ्या दस्तऐवजांची भाषा मराठी आहे, पण लिपी मोडी मराठी आहे. या लिपीचा उगम शोधणे कठीण आहे. परंतु काहींच्या मतानुसार ती गुजरातमधील महाजनी लिपीतून उद्भवली आहे. विविध सिद्धांत आहेत. त्या काळात ती शॉर्टहॅण्ड लिपीसारखी वापरली जायची असेदेखील म्हणतात. या लिपीचा प्रसार त्या काळात कसा झाला तेदेखील समजत नाही. कारण ही लिपी शिकविण्यासाठी औपचारिक शाळादेखील नव्हत्या20 व्या शतकात मात्र ही लिपी गोव्यातील मराठी शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर शिकविली जायची.

या लिपीमध्ये अक्षरे, वळलेल्या व वक्राकार स्वरूपात असतात आणि शब्दांमध्ये जागा सोडली जात नाही. त्यामुळे ही लिपी वाचायला खूप अवघड जाते. या लिपीतील दस्तऐवज वाचणे अधिक कठीण होते कारण प्रत्येक लेखकाची स्वतःची लिहिण्याची पद्धत व शैली होती. त्या वेळी कोणतीही प्रकारची टाईप सेटिंग नव्हती. त्यामुळे या लिपीला औपचारिक शैली नाही.गोव्यात सध्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढे तज्ज्ञ आहेत ज्यांना ही लिपी वाचता येते. पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने मराठी विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी मोडी मराठी लिपीचा परिचय करून देणारा एक महिन्याचा मूलभूत अभ्यासक्रम सुरू करण्याचा पुढाकार घेतलेला आहे.

गोव्यात पहिल्यांदाच मोडी मराठी अभ्यासक्रम
बोरीतील पवित्र नवदुर्गा जागृत देवस्थान..

इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक झेवियर मार्टिन्स यांच्या मते हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मोडी-मराठी अनुवादक म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकेल आणि त्यांचे करिअर घडवण्यासाठी मदत करेल. मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. नीता तोरणे यांनी नमूद केले आहे की, या लिपीमध्ये असलेल्या मराठी साहित्यावर विद्यार्थी संशोधन करू शकतील. अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रोहित फळगावकर म्हणतात की, गोव्याच्या इतिहासात शैक्षणिक स्तरावर हा अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले महाविद्यालय आहे. डॉ. फळगावकर यांनी नाशिक येथील प्रा.रामनाथ रावल यांच्याकडून मोडी मराठीचे प्रशिक्षण घेतले आहे. या अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास महाविद्यालय असा अभ्यासक्रम सर्वसामान्यांसाठीसुध्दा सुरू करण्याचा विचार करू शकते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com