मांद्रेचे भारत माता मंदिर

पेडणे तालुक्यात अनेक अशी गावे आहेत ज्यात प्राचीन मंदिरे आहेत.
मांद्रेचे भारत माता मंदिर
Mandrem's Bharat Mata TempleDainik Gomantak

पेडणे तालुक्यात अनेक अशी गावे आहेत ज्यात प्राचीन मंदिरे आहेत. त्यातला एक गाव म्हणजे मांद्रे. मांद्रे गाव पर्यटकांसाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. गावचा समुद्रकिनारा हीच गावची जागतिक ओळख आहे. श्री भगवती, श्री सप्तेश्वर, श्री रवळनाथ, श्री म्हाळसा, श्री भूमिका, श्री महालक्ष्मी, श्री सातेरी, श्री सिध्दारुढ ही मांद्रेतील प्रमुख मंदिरे अहेत आणि अवर लेडी ऑफ रोजरी हे एक चर्च आहे. या जुन्या मंदिरांबरोबरच मांद्रे - आस्कावाडा मठाजवळ भारत मातेचे मंदिर आहे जे अलिकडेच बांधले गेले आहे. या मंदिर परिसरात विशाल वटवृक्ष व स्वामीचा मठ आहे. या ठिकाणी दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. २८ वर्षापूर्वी बांधलेले भारत मातेचे हे मंदिर एका भव्यदिव्य वटवृक्षाखाली असल्याने हा परिसर प्रेक्षणीय वाटतो .

या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वार्षिक शिबीर व्हायचे. दररोज भारतमातेचा फोटो समोर ठेवून शाखेच्या शिबिराचा प्रारंभ होत असे. एक दिवशी कल्याण स्वामी महाराजांनी या ठिकाणी भारतमातेचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. केरी - पेडणे येथील अनिरुद्ध तळकर यांनी भारत मातेची सुबक मूर्ती बनवली. काणकोणापासुन ते केरीपर्यंतच्या कल्याणस्वामी सांप्रदायाच्या शिष्यांनी या मंदिराच्या निर्मितीस हात लावला. या मंदिरात दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमा उत्सव, संक्रान्ति, सदगुरु कल्याण स्वामी पुण्यतिथी निमीत्ताने दशमी,रामनवमी इत्यादी उत्सव साजरे केले जातात.

Mandrem's Bharat Mata Temple
Dengue: गुनगुना रहे हैं डास, डर लगे हमे गली-गली

भारत मातेचे मंदिर पूर्ण झाल्यानंतर जो मंदिरावर तांब्याचा कळस चढवला गेला त्यासाठी पूर्ण गोव्यातून देणगी गोळा केली गेली. भारत मातेच्या मंदिरात मुख्य गर्भकुडीत भारतमातेची भव्यदिव्य मूर्ती आहे. बाहेर उजव्या बाजूला कल्याण स्वामी महाराजांची समाधी आहे.

मंदिरा समोर  जे भव्य वटवृक्षाचे झाड आहे त्याविषयी इंदुमती म्हामल यांनी दिलेल्या माहितीनुसार या वडाच्या झाडाच्या समीप तुलसी वृन्दावन होते . वटवृक्ष वाढताना त्यात आंब्याचे व फणसाचे झाड एकत्रितपणे रुजले. एका अख्यायिकेप्रमाणेया परिसरात पूर्वी गाईची वासरे अकालीच मरत होती. यावर उपाय म्हणून म्हामल यांनी आपल्या लग्नाच्या आठव्या दिवशी वडाची पूजा केली. त्यानंतर वासरे मरायची बंद झाली. मंदिराच्या ठिकाणी एका मेलेल्या गाईची समाधी बांधण्यात आली आहे व त्यावर एका वासराची मूर्ती बसविण्यात आली आहे.

शिवा नावाचे ओळखला जाणारा एक कुत्रा होता. नामसंकिर्तन आदी देवकार्ये करते वेळी तो हजर असायचा. देवाच्या पालखीसोबत प्रदक्षिणा घालायचा. जेवणासाठी पंगती वाढून ठेवलेल्या ठिकाणी तो राखण करत बसायचा. त्याला फटाक्याचा आवाज वर्ज्य होता म्हणून नामस्मरणाच्या वेळी शिवा कुत्रा हजर असताना फटाके लावले जात नसत. तो कुत्रा मरण पावल्यानंतर मंदिरासमोर त्याची हुबेहूब मूर्ती करून बसवली आहे.

Related Stories

No stories found.