नागपंचमी सण प्राचीन परंपरा

- सौ. राधिका कामत सातोस्कर,
शनिवार, 25 जुलै 2020

नागजातीत सामान्यतः नाग या शब्दाचा अर्थ सर्प असा समजला जातो. परंतु नाग ही मनुष्याची एक विशेष जात आहे. या जातीचे पिता महर्षी कश्‍यप आणि माता कद्रु होती. यामुळेच पौराणिक वाङ‌मयामध्ये या नागजातीला सर्प, नाग, अहि, भुजंग, उरग या शब्दांबरोबरच काद्रवेय म्हणजेच कद्रुचा मुलगा अशा शब्दातपण उल्लेख आ

 

 

संकलन -
- सौ. राधिका कामत सातोस्कर,
गुरुकृपा, मुझावरवाडा, साखळी

भारतात प्रत्येक वर्षी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. त्या दिवशी मल्लक्रीडा किंवा सर्पपूजा हे दोन कार्यक्रम प्रमुख स्वरूपात होतात. राजस्थान, हरियाणा, पंजाब, सिन्धु प्रदेश, कच्छ आणि पश्‍चिमी उत्तर प्रदेश इ. भागात श्रावण कृष्ण पंचमीपण नागपूजेसाठी प्रचलित आहे. ज्यामध्ये भिजलेले कच्चे अंकुरित अन्न नैवेद्याच्या स्वरूपात सापाच्या वारुळात टाकले जाते किंवा ते प्रसादाच्या स्वरूपात खाल्ले जाते. आजपण ही प्रथा त्या प्रदेशातील कुटुंबातील महिला जोपासत असून त्या दिवशी कच्च्या अन्नाचेच भोजन करतात. याला भातृपंचमी किंवा भैयापंचमी असेही म्हटले जाते. या दिवसाचे विशेष संबंध अग्रावाल आणि वैश्‍यांचे पूर्वज अग्रसेन महाराजांची पत्नी जी नागकन्या होती त्यांच्याशी आहे. नागजातीत सामान्यतः नाग या शब्दाचा अर्थ सर्प असा समजला जातो. परंतु नाग ही मनुष्याची एक विशेष जात आहे. या जातीचे पिता महर्षी कश्‍यप आणि माता कद्रु होती. यामुळेच पौराणिक वाङ‌मयामध्ये या नागजातीला सर्प, नाग, अहि, भुजंग, उरग या शब्दांबरोबरच काद्रवेय म्हणजेच कद्रुचा मुलगा अशा शब्दातपण उल्लेख आहे. ऋषि कश्‍यपांच्या तेरा बायका होत्या. त्यामधील कद्रु ही एक बायको होती. त्या तेरा बायकांच्याही विभिन्न प्रकारच्या मानवाच्या जाती उत्पन्न झाल्या की मानवाचे जसे दोन हात, दोन पायांच्या होत्या, पण चुकून त्यांना मानवेतर प्राणी समजले जाऊ लागले. याचे कारण म्हणजे कालचक्रामध्ये त्यांची वेगळी ओळख लुप्त होत चालली होती. आज आपण भारतात राहणाऱ्या लोकांना नृतत्व विज्ञान याचे ज्ञान नाही आणि आपण पाश्‍चात्यांकडून मिळणाऱ्या कल्पित आर्य द्रविण, सेमिटिकसारख्या जातींचा आधार विहीत पाठ्यक्रमामध्ये शाळा, कॉलेजात, विश्‍व विद्यालयात शिकू लागलो आहोत. नागजातीचा मुख्य उत्सव ज्या दिवशी साजरा केला जात होता तो दिवस कालांतराने नागपंचमीच्या स्वरूपात रूढ झाला आहे. वैदिक ग्रंथात पंचजनच्या नावावरून पाच मूळ जातींच्या नावाचे उल्लेख मिळतात. या व्यतिरिक्त देव, सुपर्ण, निषादपण होते, पण कालांतराने या जातींना मनुष्येतर समजायला लागले, पण वास्तवात पुराणात वर्णन केल्याप्रमाणे सर्व जाती मनुष्यच होते. मनुष्य जसे समूहांमध्ये रहात होते, त्याचप्रमाणे नागजातीपण समूहातच रहात होती. नागजाती ही मनुष्यतुल्य प्राणी होते. ते साप नव्हते. याचे उदाहरण म्हणजे अनेक नागकन्यांचा विवाह अनेक राजर्षी आणि ऋषींबरोबर झालेला होता. नागजातींचे मनुष्यजातीबरोबर संबंध होण्याचे पुरावे उदा. महाभारत महर्षी श्रुतश्रृवा यांचे पुत्र साेमश्रवा यांचा जन्म नागकन्येच्या गर्भातूनच झालेला होता. कुन्तीचे वडील शूरसेनचे आजोबा (आईचे वडील) आर्यनावाचे नागराज होते, जे हस्तिनापूरजवळच्या नागलोकात रहात होते. हे गाव दिल्लीतील नागलोई या नावाने ओळखले जाते. भगवान रामचंद्रांचा मुलगा कुश याचा विवाह नागकन्या कुमुदूती हिच्याबरोबर झाला होता. तसेच वासुकि नागाच्या बहिणीचा विवाह जरत्कारू मुनी यांचेबरोबर झाला होता. पांडुपुत्र अर्जुनाचा विवाह नागकन्या उलूपी हिच्याबरोबर झाला आहे. प्राचिनकाळी नागजातीच्या लोकांचे जेवण अग्नीवर न शिजवलेले अन्न तथा मांस हेाते. गुहेत राहण्याचे ठिकाण असल्याने त्यांनी कधीही अग्नीचा उपयोग केला नाही. पाण्यात शिजवलेले अंकुरीत अन्न तसेच कच्चे मासे त्यांचे अन्न होते. अशा प्रकारे नागजातीचे प्राचीन काळापासूनचे वर्णन असून सर्वप्रकारच्या पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. परंतु वर्तमानकाळात इतिहासजमा झालेल्या विस्मृतीच्या कारणाने लोक नागजातीला विसरून गेले असून, फक्त सर्पपूजाच उरली आहे. सर्पबंध भयंकर पाप असून त्यांच्या शापाने लोक या जन्मी तसेच पुढील आयुष्यात संतती विरहीत होतात. म्हणूनच नागपंचमीला आपण सापांचा सन्मान तर कराच, परंतु त्यांच्या या पूजेला किंवा सणाचे प्रारंभ करणारे नागजातीच्या लोकांना विसरू नका आणि आपला प्राचीन काळाचा इतिहास लक्षात ठेवा.

संबंधित बातम्या