स्त्रीवाद आणि पोर्तुगीजकालीन चर्चसंस्था या विषयावर ऑनलाईन सादरीकरण

या विषयाच्या संदर्भात ज्या घडामोडी त्या काळात घडल्या आणि स्त्रीला तिचे हक्क लाभले त्यांचा परामर्ष या सादरीकरणात घेतला जाईल.
स्त्रीवाद आणि पोर्तुगीजकालीन चर्चसंस्था या विषयावर ऑनलाईन सादरीकरण
डॉक्टर सुशीला सामंत मेंडीस Dainik Gomantak

गोव्यात पोर्तुगीजपूर्व काळात त्या काळच्या सामाजिक बंधनांमुळे स्त्रीचा आवाज दबला गेला होता. बालविवाह, हुंडा, सती, बहुपत्नीत्व इत्यादी प्रथा तेव्हा प्रचलित होत्या. विधवांसाठी फार कठोर असा आचार पाळला जात असे. शिक्षण, मालमत्तेची मालकी, घटस्फोट यासारख्या तिच्या हाक्कांकडे पद्धतशीरपणे कानाडोळा केला जात असे. स्त्रीला या दुर्दैवी परिस्थितीतून सोडवण्यासाठी त्या काळच्या पोर्तुगीज प्रशासनाने आणि चर्चसंस्थेने विशेष प्रयत्न केले आणि स्त्रीच्या आवाजाला एक प्रकारे पाठबळ दिले.

या विषयाला अनुसरून ‘झेवियर सेंटर ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ या संस्थेने डॉक्टर सुशीला सामंत मेंडीस यांच्या ‘रिझोनंस ऑफ द फीमेल व्हॉईज: वुमनिझम अ‍ॅण्ड चर्च इन पोर्तुगीज गोवा’ या विषयावर ऑनलाईन सादरीकरण आयोजित केले आहे. या विषयाच्या संदर्भात ज्या घडामोडी त्या काळात घडल्या आणि स्त्रीला तिचे हक्क लाभले त्यांचा परामर्ष या सादरीकरणात घेतला जाईल.

पोर्तुगीज शासनाच्या हस्तक्षेपानंतर बहुपत्नीत्वाची आणि सती जाण्याची प्रथा गोव्यातून संपुष्टात आली. समकक्ष हिंदू स्त्रियांच्या विपरीत, समाजात स्त्रीला मुक्त स्थान मिळाले. समाजातल्या असहाय्य स्त्रियांनी चर्चची संबंधित सेवाभावी संस्थात आश्रय शोधला. स्त्रियांना वारसा हक्कात आपला वाटा मिळाला. गोव्यात कॅथलिक स्त्रीचे आयुष्य त्यामानाने अधिक मानवी होते. आज देखील चर्च, ख्रिश्चन समुदायाला आवाहन करत सहजपणे त्यांचे कुटुंब आणि सामाजिक परिघात प्रवेश करते. डॉक्टर सुशीला सावंत मेंडीसचा अभ्यास, पोर्तुगीज वसाहतवाद आणि गोमंतकीय समाजाच्या बाबतीत चर्चने घेतलेल्या सक्रिय भूमिकेचे विश्‍लेषण करतो.

डॉक्टर सुशीला सामंत मेंडीस
गोव्यात खाजेकरांची खास मिठाई

डॉक्टर सुशीला या ‘लुईस दी मिनेझिस ब्रागांझा: पोर्तुगीज राजवटीतला गोव्यातला राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि मुक्त विचार’ या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांनी इतिहास या विषयावर गोव्यातील महाविद्यालयातून अनेक वर्षे अध्यापन केले आहे. त्या आपले संशोधन राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर होणाऱ्या परिसंवादातून सातत्याने मांडत असतात. त्यांचे संशोधन गोव्याच्या इतिहासाशी संबंधित असलेल्या अनेक पुस्तकात समाविष्ट आहे. त्यांना 2020-21 साली उच्च शिक्षणात उत्कृष्टतेसाठी असलेला राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘झूम’वर डॉक्टर सुशीला यांच्या सादरीकरणाला आरंभ होईल.झूम मिटिंगचा आयडी क्रमांक आहे 413207 60 संकेत स्थळ आहे: https://bit.ly/3H6hnc

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com