चित्रकार नावेलकर यांच्या जयंती निमित्ताने गोव्यात चित्रकला स्पर्धेचे आयोजन

याप्रसंगी नावेलकर यांची निवडक चित्रेही स्पर्धेच्या ठिकाणी मांडण्यात येतील.
चित्रकार नावेलकर यांच्या जयंती निमित्ताने गोव्यात चित्रकला स्पर्धेचे आयोजन
GoaDainik Gomantak

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वामोना नावेलकर यांची आज 93 वी जयंती. गोव्यात जन्मलेल्या या चित्रकाराने पोर्तुगालमधील ‘इस्कोला सुपीरियर दे बेलास आर्टेस’मधून चित्रकारितेची उच्च पदवी प्राप्त केली. चित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. विसाव्या शतकातील पोर्तुगीज चित्रकार म्हणून ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ आर्टिस्ट लिस्बन’मध्ये त्यांचे नाव सन्मानाने नोंदवण्यात आले आहे. ‘इंडियन आर्ट अ‍ॅण्ड आर्टिस्ट’मध्ये प्रतिमा सेठ यांनी त्यांना स्थान दिले आहे. त्यांच्या चित्रांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनातून मांडली गेली आहेत. गोवा (Goa) सरकारकडून मात्र त्यांना अजूनही सन्मानापासून वंचित ठेवले गेले आहे.

रवींद्रनाथ टागोर, पेसो यांच्या कवितांवर तसेच रामायणासारख्या महाकाव्यावर आधारून त्यांनी अनेक चित्रे रेखाटली आहेत. बांगलादेशाची मुक्ती, मोझंबिकच्या जनतेचा स्वातंत्र्यसंग्राम हेदेखील त्यांच्या चित्रांचे विषय राहिले आहेत.

picture
picturedainik gomantak

‘गोवा कला महाविद्यालय’ आणि ‘युवा क्लब ऑफ मळा’ यांच्या सहकार्याने, नावेलकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चित्रकलाप्रेमी मित्रांनी, चित्रकार वामोना नावेलकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने 8 मे रोजी एका विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. याप्रसंगी नावेलकर यांची निवडक चित्रेही स्पर्धेच्या ठिकाणी मांडण्यात येतील.

विषय : गोवा आणि मी

चित्रकला स्पर्धा : 8 मे 2022

वेळ : सकाळी 9 ते 11

स्थळ : गोवा कला महाविद्यालय, अल्तिनो, पणजी

1. गट खुला : वयोमर्यादा नाही. प्रथम पारितोषिक रुपये 25000

2. गट : 8वी ते 10वी. प्रथम पारितोषिक रुपये 10000

3. गट : 5वी ते 7वी. प्रथम पारितोषिक रुपये 5000

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.