सामर्थ्य जीवनानंदाचे

समृद्धी केरकर
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

बुद्धाने जगातील सारे मोह, स्वार्थ लोभ, अपेक्षा, ह्यापासून ते स्वतःचे सुख समाधान ह्या सगळ्याचा त्याग केला, ते केवळ आपल्या तत्वाशी पूर्णपणे प्रामाणिक होऊन, जगात आपल्या परीने होईल तेवढी शांतता, समाधान आणता यावं म्हणून. !!

समृद्धी केरकर

कधी कधी मनातल्या मनातच वाद निर्माण होतात. आपलं तत्त्व हवं? की माणूस?
अनेकदा आपल्याला हवी असणारी आपली अशी माणसं आणि त्यांचे - आपले विचार वेगवेगळे होतात. वाटाही नकळत दुसरीकडे वळतात. अशा वेळी भीती वाटते, एक काहीतरी सुटून जाईल ह्याची.
मग नेमकं धरावं तरी कशाला? माणसांना की विचाराला?
ऐकलंय… आणि बऱ्याचदा अनुभवलंय सुद्धा,की वेळ बदलल्या वर अगदी जवळची माणसंही आयुष्याच्या अर्ध्यावर साथ सोडून जातात.
पण आपलं तत्व…विचार …तो मात्र शाश्वत राहतो. वेळेसोबत विकसित होतो. आपल्यासोबत इतरांनाही थोडं थोडं घडवतो. आणि काय ठाऊक… कदाचित कुणा दुसऱ्यालाही जगण्याची नवी प्रेरणा देऊ शकतो.
खरतर आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आपल्या जाग्यावर बरोबर आहेत. तसंही काही बरोबर किंवा चूक असं नसतंच ह्या जगात. ठरवणारे असतो आपण. त्यामुळे आपण जशा बघू तशाच गोष्टी दिसतात. पण आपल्यासाठी काय बरोबर आहे ना… हे मात्र आपलं आपल्यालाच निवडायचंय.कधी कधी वाटतं. बुद्धासारख जगता यावं... सदैव शांत…हसतमुख…बाहेरचं जग कितीही हलल, गजबजलं तरी आपल्या आतली शांतता जपता यायला हवी.
बुद्धाने जगातील सारे मोह, स्वार्थ लोभ, अपेक्षा, ह्यापासून ते स्वतःचे सुख समाधान ह्या सगळ्याचा त्याग केला, ते केवळ आपल्या तत्वाशी पूर्णपणे प्रामाणिक होऊन, जगात आपल्या परीने होईल तेवढी शांतता, समाधान आणता यावं म्हणून. !!
ते स्वतः हळवा होते, तरीही काही बंध, नाती, आपली माणसं त्यांना तोडावी लागली. कारण ज्यांच्यासाठी कुणीही नाही अशा जगालाही तो आपलं करायला निघाला होता. जे कदाचित त्याच्या रक्तातील माणसांना पटलं नसावं. पण त्या शांतचित्त संतासारख आता ह्या एवढ्या गजबजलेल्या जगात ही बनता येईल का? आणि जर झालोच , तर आपल्या माणसांना सोडल्याचं समाधान कधी लाभेल का?मनातून किती हळवी तरीही सामर्थ्यवान होती ना ही संतमंडळी! पण एक मात्र नित्य विचार केल्यावर जाणवत… की ही सारी माणसं म्हटल तर अल्प आयुष्यच जगली. छोटंसं आयुष्य पण समाधानाने ती जंगली !
खुप कमी आयुष्य जगली ही माणसं…पण जेवढी कमी जगलीत ना… त्यापेक्षा ही कितीतरीच पटीने मोठा विचार ती ह्या जगामध्ये पेरून गेली. म्हणूनच तर ती आजसुद्धा त्यांच्या विचारां मधून मनामनात जिवंत आहेत.

कुठेतरी ऐकलं होतं,
“ जिंदगी लंबी नही…बडी होनी चाहिये ”.
किती खरं आहे ना…?
एक छोटंसंच आयुष्य, पण अगदी समाधानाने…आपला आनंद, समाधान , आयुष्यात येणाऱ्या इतरांनाही वाटत, हसत खेळत, मनामधली निरागसता जपत, आणि मुख्य म्हणजे आपली माणसं आणि विचार - (तत्व) दोघांमध्ये ही समतोल ठेऊन त्यांना जपत, साधं सोपं अन् सुंदर जगता यायला हवं.
पण मध्ये विचार डोकावतो, खरच आयुष्यभर हे अस खरंच जगता येईल का?जसं वय वाढत जात, तसतसे अनुभव ही वाढतात.हे अनुभव नको असलेलं ही बरच काही शिकवत जाऊ लागतात. छोट्या छोट्या गोष्टी मधून सुद्धा एवढं सहन करायला देतात , की ते आपल्याला कठोर तर नाही ना बनवणार ? असे वाटू लागते.
आणि तेव्हाच आठवतो बुद्ध आणि हे संत .! जग कितीही कठोर बनलं, अन् कठोरतेलाच प्राधान्य देत असलं तरीही स्वतःच्या शांततेचं, मृदुपणाच, सामर्थ्य जाणून तिला कशाचीही तडा न लागू देता जपणारे. कधी कधी वाटतं.की त्यांच्यासारख जगावं.
खरतर , आता काही त्यांच्या एवढं महान जगणं सोपं नाही! पण निदान जगता यावं, म्हटल तर एका सुंदर फुलासारखं तरी…
फुल कधी कठोर होतं? आपल्या अस्तित्वाने दुसऱ्याला कधी ओझं देतं? …नाही.उलट, एका छोट्याशा घटके पुरतच त्याचं जगणं. पण सतत प्रसन्न दरवळ न अन् आपल्या असण्यात दुसऱ्यांच्या ही जीवनात सुगंध पसरवण एवढाच त्याचा हेतू.जणू हेच आहे ते सामर्थ्य ज्याची आज , कठोर , निर्दयी बनत चाललेल्या जगाला खरी गरज आहे.
, वाटतं… Being soft is not weakness. It really takes courage to remain soft in the world where
everyone appreciates loudness.
लहानपणी मी विचार करायचे, काय ही मोठी माणसं ? कधी जास्त हसत नाहीत , खेळत नाहीत, की मनभरून जगत ही नाहीत! नेहमी कसली ना कसली अस्वस्थता…भांडणं, रुसवे, फुगवे, वादविवाद, विचारात मग्न! आणि काही माणसं तर अगदीच कठोर.
पण आता जाणवू लागलंय, की त्यांच्या त्या कठोर ते मागे सुद्धा लपलेल्या काही कहाण्या असतात. ज्या एका फुलासारख्या माणसाचे ही कधी फॉसिल बनवतील ना… काही सांगता येत नाही!
पण मला मात्र, आयुष्याने कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला तरी तसं बनायचं नाहीये.
माझ्या निरागसतेला सदैव कवेत ठेवून , हलक फुलकं , जीवनाचा आनंद घेत अन् आनंद पसरवत जगायचं आहे. आणि ते सामर्थ्य कुठून मिळवावं ह्याच्याच मी शोधात आहे.

 

संबंधित बातम्या