गोव्याच्या किनारी आदिम जादू

गोव्याच्या (Goa) समुद्रकिनाऱ्यावर आजसुद्धा आदिम जादू जाणवते.
Goa Beach
Goa Beach मयंका हळर्णकर

गोव्याच्या (Goa) काही समुद्रकिनाऱ्यांवर अजूनही तीच आदिम जादू आहे. किनाऱ्यांवर अजूनही गर्दी पक्ष्यांची आहे. समुद्रात टाकलेल्या जाळ्यात, समुद्राच्या खाऱ्या गंधाबरोबर मानवी घामाचा तोच खारा गंध अजून मिसळलेला आहे.

समुद्रातून इंच इंच बाहेर निघणारे जाळे उलगडताना त्याला निरखणाऱ्या मानवी डोळ्यांत उत्कंठाही तीच आहे. या साऱ्या पिढीजात मानवी व्यवहाराला साक्ष असणाऱ्या अफाट विस्तारित आकाशात उमलून आलेली लालीही तीच आदिम आहे.

Goa Beach
गोव्यातील सांगीतिक घटनांचा पुष्पगुच्छ

गोव्यातील (Goa) बोगमाळो या समुद्र किनाऱ्यावरच्या (Beach) आदिम मानवी व्यवहाराचा वर्तमानकालीन क्षण आपल्या कॅमेऱ्यात (Camera) बंदिस्त केला आहे मयंका हळर्णकर या हौशी छायाचित्रकार्तीने. ती हौशी छायाचित्रकार असली तरी मयंकाची छायाचित्रे तिच्यापाशी असलेल्या व्यावसायिक कौशल्याचीच साक्ष देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com