‘राइनो’ खूप हिंसक अन्‌ कठोर: वेरोनिका वेल्च
‘राइनो’ खूप हिंसक अन्‌ कठोर: वेरोनिका वेल्च Dainik Gomantak

‘राइनो’ खूप हिंसक अन्‌ कठोर: वेरोनिका वेल्च

हा चित्रपट दाखवतो की जीवन हे आपल्या आवडी-निवडी आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे संयोजन आहे आणि त्या परिस्थितीवर आपले किती नियंत्रण आहे हा नेहमीच प्रश्न असतो.

पणजी: माझा चित्रपट खूप हिंसक आणि कठोर आहे. मला या चित्रपटाद्वारे 1990 च्या दशकातील ‘जंगली’ नंतरच्या युक्रेनमधील जीवन दाखवायचे होते, असे ‘राइनो’ (Rhino) सिनेमाच्‍या टीमचा एक भाग असलेली वेरोनिका वेल्च (Veronica Welch) म्‍हणाली.

सोव्हिएत युनियनच्या पतनाचा विषय अतिशय स्थानिक असल्याने हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना कसा समजेल याची आम्हाला खात्री नव्हती. पण कला लोकांना जोडते. हा चित्रपट दाखवतो की जीवन हे आपल्या आवडी-निवडी आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे संयोजन आहे आणि त्या परिस्थितीवर आपले किती नियंत्रण आहे हा नेहमीच प्रश्न असतो. चित्रपट वास्तववादी असावा अशी माझी इच्छा आहे. हे माझ्या खऱ्या कथेवर आधारित आहे आणि व्यक्तिरेखा एक वेगळं आणि तितकं चांगलं आयुष्य जगत नाही पण त्याच्यासोबत काही घटना घडल्यानंतर तो बदलतो. कथेत रोमान्स आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता हे गुन्हेगारी जग दाखवायचे होते. खरे जग कसे आहे हे आम्‍हांला दाखवायचे होते.

‘राइनो’ खूप हिंसक अन्‌ कठोर: वेरोनिका वेल्च
चित्रपटाच्या उज्ज्वल भविष्याविषयी...

वेरोनिका वेल्च पुढे म्हणाल्या, तरुणांना हे शिकवण्याचा हा एक प्रयत्न आहे, की सोशल मीडियावरील (Social Media) जीवन वास्तविक नाही आणि आपल्याला सभ्य जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. गुन्हेगारी हा तिथे जाण्याचा मार्ग नाही आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतण्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com