Salaman - Shah Rukh : शाहरुखसाठी सलमान नेहमीच ठरला आहे लकी..या चित्रपटांनी हे सिद्ध केलंय

शाहरुखचा पठाण सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, यात शाहरुखसोबत सलमानचाही मोठा वाटा आहे.
Salman -Shah Rukh
Salman -Shah Rukh Dainik Gomantak

Salaman - Shah Rukh : मनोरंजन क्षेत्रात आजच्या घडीला सगळ्यात जास्त चर्चा जर कुठल्या चित्रपटाची असेल तर ती शाहरुखच्या पठाणची आहे.. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण हा चित्रपट सध्या जोरात सुरू आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जवळपास 350 कोटींची कमाई केली आहे. 

शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचेही कौतुक होत आहे. चित्रपटाच्या सर्व चर्चेमध्ये एक सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव म्हणजे सलमान खान. सलमान खानने पठाणमध्येही कॅमिओ केला आहे. काही मिनिटांच्या हजेरीत सलमानने गर्दी लुटली आहे. थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या लोकांनी सलमानच्या (Salaman Khan) कॅमिओचे कौतुक केले आहे.

सलमान खान आणि शाहरुख खान यांचे चित्रपटांमध्ये एकमेकांसोबतचे नाते खूप जुनं आणि घट्ट आहे. दोघांची मैत्री बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दोघेही जवळपास 30 वर्षांपासून चांगले मित्र आहेत. दोघांच्या मैत्रीने चांगले आणि वाईट दिवसही पाहिले आहेत. सोशल मीडियावरही लोकांचे मत आहे की, सलमान खानही शाहरुख खानसाठी शुभेच्छासारखा आहे. 

यापूर्वीही अनेकदा सलमान पडद्यावर येताच शाहरुखच्या चित्रपटाची दिशा बदलली आहे. दोघांनी आता 7 वेळा एकत्र चित्रपटातून चाहत्यांना खुश केले आहे .

शाहरुख आणि सलमान खानचा करण-अर्जुन हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटापासून दोघांची मैत्री सुरू झाली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 27 वर्षे झाली आहेत. या चित्रपटापासून सुरू झालेली मैत्री बॉलिवूडमध्ये एक उदाहरण बनली आहे.

 मात्र, दोघांच्या मैत्रीत अनेक ट्विस्ट आणि टर्नही पाहायला मिळाले. यानंतर आज तीन दशकांनंतरही पठाणच्या रिलीजवर दोघांमधील प्रेम पाहायला मिळत आहे. 

सलमान खानने आतापर्यंत जवळपास 27 चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहे. याआधी १९९८ मध्ये रिलीज झालेल्या 'कुछ कुछ होता है'मध्ये सलमान खानने छोटी भूमिका केली होती. या चित्रपटात सलमान खानने अमन मेहराची भूमिका साकारली होती.

 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यानंतर 2007 मध्ये आलेल्या ओम शांती ओम या चित्रपटात सलमान खानने शाहरुखसोबतची आपली मैत्री घट्ट असल्याचे सिद्ध केलं होतं.

Salman -Shah Rukh
Football legend Pele Passed Away : मृत्यूशी झुंज अपयशी; जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पेले काळाच्या पडद्याआड

आतापर्यंत शाहरुख आणि सलमानने 7 वेळा चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यापैकी कुछ कुछ होता है, ओम शांती ओम, पठाण, करण अर्जुन, हर दिल जो प्यार करेगा, चोरी चोरी चुपके चुपके, हम तुम्हारे सनम आणि झिरो हे 7 चित्रपट आहेत. 

यापैकी झिरो वगळता 6 चित्रपट हिट झाले आहेत. थोडक्यात शाहरुख आणि सलमान दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच शाहरुखसाठी सलमान नेहमी लकी ठरला आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com