मोक्ष

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

दिवाळीचा सण म्हणजे पंधरा ते तीस दिवसांचा उत्साह. असाच दिवाळीतील तो एक दिवस होता, काव्या घरात अभ्यास करत बसली होती. इतक्यात बाहेरून कुणाचातरी आवाज आला, ‘अभ्याची आई गेली रे.’ हे शब्द कानी पडताच काव्याला धक्काच बसला.

अभ्याच्या आईची प्रकृती आता तिची साथ सोडत होती. आता ती खूपच अशक्त होऊ लागली होती, तिच्या शरीराने उठणे बसणे होत नसे आणि शेवटी तिने अंथरूण धरले. अभ्याला तिची अवस्था बघवत नसे, पण पैशांच्या गरजेपायी त्याला काम सोडण्याचा साधा विचारदेखील नवीन संकटाची चाहुल असल्यासारखा वाटायचा.त्याची आई त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. मानसिक रुग्ण असूनही त्याचा चेहरा पाहून त्याचं मन जाणायची. त्यांचं नातं खूप घट्ट होतं.

शिक्षक - विद्यार्थी, बाप - मुलगी, आई - मुलगा या तिन्ही नात्यांनी समृद्ध असं एका शब्दात सांगता न येणार नातं त्यांचं होतं. पण शेवटी या नात्याला काळाची नजर लागलीच..!दिवाळीचा सण म्हणजे पंधरा ते तीस दिवसांचा उत्साह. असाच दिवाळीतील तो एक दिवस होता, काव्या घरात अभ्यास करत बसली होती. इतक्यात बाहेरून कुणाचातरी आवाज आला, ‘अभ्याची आई गेली रे.’ हे शब्द कानी पडताच काव्याला धक्काच बसला. हा अभ्या म्हणजे अभय काव्याचा एक खूप चांगला मित्र. अभय एक खूप संस्कारी, गुणी मुलगा, गावातील सर्व लोकांच्या मनांवर राज्य करणारा. लोक त्याला प्रेमाने अभ्या अशीच हाक मारायचे. काही वर्षांपूर्वी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अभ्याचा जन्म झाला होता.

तो एका छोट्याशा निसर्गरम्य गावात आपल्या आई आणि आज्जीसोबत राहायचा. त्याची आई मानसिक रुग्ण असल्याने एकही काम तिला धड जमत नसे, या कारणामुळे त्याची आज्जीच त्याची आई बनली. तिने त्याला खूप प्रेमाने वाढविले, त्याला खूप अनमोल संस्कार दिले. असेच दिवस जात होते, पण काळ हा खूप निर्दयी असतो, त्याच्यापुढे  कुणाचं काहीही चालत नाही. खूप  थोड्या वर्षांनीच अभ्याची आज्जी अंतरधान पावली. अभ्यावर त्याच्या आईची व स्वतःची जवाबदारी आली आणि लहान वयात त्याला खूप समजूतदार व जवाबदार व्हावं लागलं. त्याला आता थोडंफार काम जमायला लागलं होतं. शिवाय औषधोपचरांमुळे त्याच्या आईची प्रकृतीही सुधारत होती.

आता अभ्या शाळेला जायला लागला होता. त्याच्या अभ्यासातील गोडीमुळे तो शाळेत प्रथम यायचा, त्याच्या गोड स्वभावामुळे सर्व शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी बनला होता. तो खूप मनमिळाऊ होता आणि आपल्या आपुलकीने भरलेल्या बोलीने सगळ्यांना आपलंसं करायचा. त्याची आई हळुहळू घरातील कामे जसे की जेवण बनविणे, साफसफाई करणे वैगेरे आपल्यापरीने करायला लागली होती. गावात इयत्ता चौथीपर्यंत शाळा असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी अभ्या शहराकडच्या शाळेत जायला लागला. तो पहाटे खूप लवकर उठायचा, स्वयंपाक करून, देवपूजा आटोपून तो शाळेला जायचा. शाळेतून घरी परत आल्यावर धुणी-भांडी करायचा आणि रात्री दिव्याच्या उजेडात आपला अभ्यास पूर्ण करायचा, पण घरच्या अशा परिस्थितीची सावळीसुद्धा त्याने आपल्या अभ्यासावर पडू दिली नाही आणि त्याच्या या जिद्दीमुळे तो दहावीत प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाला.

शाळा शिकता-शिकता तो आपल्या आईची काळजी अगदी आपल्या मुलीसारखी घेत असे. तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणे, तिला वेळेवर औषधं देणे, तिचं जेवण सगळी-सगळी कामे अभ्या आनंदाने करीत असे. दहावीनंतर दोन वर्षे त्याने आयटीआय शिक्षण पूर्ण केले. घरची हालाकीची परिस्थिती आणि वाढत्या खर्चामुळे पुढे शिकण्याची इच्छा सोडून त्याने कामाला जायला सुरवात केली. कामावर जातानादेखील त्याचा दिनक्रम तसाच असायचा. हा, पण संध्याकाळी घरी यायला त्याला उशीर होत असे. ज्यामुळे आईच्या देखरेखीत थोडा खंड पडू लागला. कामावर फक्त त्याचा देह असायचा मन तर घरीच आणि सतत आईच्या विचारात गोंधळलेलं असे. असेच दिवस जात होते, अभ्याच्या आईची प्रकृती आता तिची साथ सोडत होती.

आता ती खूपच अशक्त होऊ लागली होती, तिच्या शरीराने उठणे बसणे होत नसे आणि शेवटी तिने अंथरूण धरले. अभ्याला तिची अवस्था बघवत नसे, पण पैशांच्या गरजेपायी त्याला काम सोडण्याचा साधा विचारदेखील नवीन संकटाची चाहुल असल्यासारखा वाटायचा.त्याची आई त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. मानसिक रुग्ण असूनही त्याचा चेहरा पाहून त्याचं मन जाणायची. त्यांचं नातं खूप घट्ट होतं. शिक्षक - विद्यार्थी, बाप - मुलगी, आई - मुलगा या तिन्ही नात्यांनी समृद्ध असं एका शब्दात सांगता न येणार नातं त्यांचं होतं. पण शेवटी या नात्याला काळाची नजर लागलीच..! आता अभ्याचं कसं होणार? तो स्वतःला आता कसा सावरेल? असे असंख्य प्रश्न अभ्याच्या आजपर्यंतच्या जीवनप्रवासासह काव्याच्या मनात उभे झाले. पण, ‘जन्माला येणाऱ्या देहाला नष्ट हे व्हावच लागतं, त्या नश्वर देहातून आत्म्याला मोक्ष मिळण्यासाठी, त्याचा पुढच्या वाटचालीसाठी. या एकमेव विचाराने काव्याने स्वतःच्या मनाला समजाविले आणि अभ्याच्या आईच्या आत्म्याला शांती लाभो अशी देवाकडे प्रार्थना केली.

संबंधित बातम्या