करोनाची भीती वाटते? प्राणायाम करा !

vidhya Rane
बुधवार, 29 जुलै 2020

करोनासाठी ज्या ज्या म्हणून काही उपचार पद्धती किंवा उपचार सांगितले जातात, त्याचे पालन करण्याकडे सुजाण नागरिकांचा कल आहे. उपायांमध्ये गरम पाणी पिणे, वाफ घेणे, वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझर वापरणे वगैरे दक्षता घेतली जात आहे.

 

विद्या राणे

आपली श्वसन यंत्रणा कमकुवत करण्याचे काम करतो. तूर्तास या आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्राणायामाची खूप मदत होते. कित्येक सेंटरमध्ये रुग्णांकडून प्राणायामाचा सराव करून घेतला जात आहे. प्राणायामामुळे आपली श्वसन यंत्रणा आणि फुप्फुसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. योगतज्ञांच्या माहितीनुसार प्राणायामामुळे आपली फुप्फुसे निरोगी राहतात.

सध्या जगभरात करोनाव्हायरसने थैमान घातले आहे. आपण मार्च महिन्यापासून ही महामारी झेलत आहोत. लॉकडाऊन पाठोपाठ लॉकडाऊन झाले. त्यानंतर काही निर्बंध शिथिल करून अनलॉक सीरिज सुरू झाली. पेशंटची संख्या वाढू लागल्यावर पुन्हा लॉकडाऊन. असा खेळ सगळीकडे सुरू आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने सामाजिक संसर्ग झाल्याचा दावा केला असला तरी केंद्र सरकारने तो फेटाळला आहे.
करोनासाठी ज्या ज्या म्हणून काही उपचार पद्धती किंवा उपचार सांगितले जातात, त्याचे पालन करण्याकडे सुजाण नागरिकांचा कल आहे. उपायांमध्ये गरम पाणी पिणे, वाफ घेणे, वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझर वापरणे वगैरे दक्षता घेतली जात आहे. लहानथोर  सगळ्यांच्या मनात या कोरोनाने भीती निर्माण केली आहे. हा आजार म्हणजे सर्दी ताप याचाच मोठा भाऊ असे म्हणायला हरकत नाही. परंतु त्यावर अधिकृत लस उपलब्ध झालेली नाही, म्हणून त्याची अधिक भीती. हा आजार आपल्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. आपली श्वसन यंत्रणा कमकुवत करण्याचे काम करतो. तूर्तास या आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्राणायामाची खूप मदत होते. कित्येक सेंटरमध्ये रुग्णांकडून प्राणायामाचा सराव करून घेतला जात आहे. प्राणायामामुळे आपली श्वसन यंत्रणा आणि फुप्फुसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. योगतज्ञांच्या माहितीनुसार प्राणायामामुळे आपली फुप्फुसे निरोगी राहतात.
प्राणायामामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते व श्वसनाचे विकार दूर होतात. त्यामुळे सध्याच्या या महामारीच्या काळात सर्वांनी प्राणायाम करणे खूप गरजेचे आहे. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. पण आपली श्वसनयंत्रणा मजबूत करण्यासाठी मुख्य तीन प्राणायाम आहेत. ते पुढीलप्रमाणे -
१. भस्त्रिका ः
या प्राणायामामुळे श्वसनयंत्रणा खूप चांगली होते. पद्मासन, सिद्धासन किंवा सुखासनात (मांडी घालून) बसणे. अडीच सेकंद श्वास घेणे आणि आणि अडीच सेकंदात श्वास बाहेर सोडणे, अशाप्रकारे न थांबता बारा मिनिटे भस्त्रिका प्राणायाम करावे. एका वेळेला भस्त्रिका प्राणायाम पाच मिनिटे करायला पाहिजे. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे यामुळे   श्वसनप्रक्रिया खूप चांगली होते.
२. कपालभाती ः
आपली श्वसनप्रक्रिया तंदुरुस्त करण्यासाठी दुसरे प्राणायाम आहे कपालभाती. कपालभातीमुळे फुप्फुसाची क्षमता सुधारण्यास मदत मिळते. श्वसन यंत्रणेत अडथळा निर्माण करणारा कफ देखील कमी होतो. श्वसनाची प्रक्रिया सुरळीत सुरू होते. कपालभातीमध्ये एका सेकंदात एक वेळा श्वास नाकाद्वारे बाहेर सोडणे आणी सहजपणे आत घेणे असे न थांबता एका मिनिटात साठ वेळा आणि पाच मिनिटात ३०० वेळा कपालभाती प्राणायाम करावे.
३. अनुलोम विलोम ः
सर्दी, दमा, खोकला हे सर्व आजार या प्राणायामामुळे दूर होतात. शरीर अधिक शांत आणि शक्तिशाली बनते. मनावरील तणाव कमी होतो. अनुलोम-विलोम प्राणायामामध्ये उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि बंद केलेल्या उजव्या नाकपुडीतून सोडणे. परत डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडणे, असे न थांबता पाच मिनिटे करत राहावे.
अशी ही तीन प्राणायाम दररोज केल्याने श्वसन यंत्रणा मजबूत बनेल. म्हणूनच कोरोनाच्य महामारीला तोंड देण्यासाठी प्राणायाम करो!

 

 

संबंधित बातम्या