Shaheed Diwas 2021 वेश पालटून केली होती अधिकाऱ्यांच्‍या निवासस्थानाकडे कूच

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

भारतमातेसाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

भारतमातेसाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून भारतीयांची मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.  ख्रिस्ताब्द 1928 मध्ये भारतीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून ‘सायमन कमिशन’ नावाचे शिष्टमंडळ भारतात आले. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्यावेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. ‘सायमन परत जा’च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला.(Shaheed Diwas 2021 Martyrs Bhagat Singh Rajguru and Sukhdev were sentenced to death for firing on British officer Sanders)

जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी आक्रमणात लाला लजपतराय जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू  झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतिकारकांना हे सहन झाले नाही. क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलिस ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष पालटून पोलिस अधिकाऱ्यांच्‍या निवासस्थानाकडे गेले. सँडर्स दिसताच सुखदेव याने संकेत केला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्याचा बळी घेतला आणि तेथून पलायन केले.(Shaheed Diwas 2021 Martyrs Bhagat Singh Rajguru and Sukhdev were sentenced to death for firing on British officer Sanders)

इंग्रज, सरकारने तिघांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. तसेच त्यांना पकडून देणाऱ्याला पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही केली; परंतु बरेच दिवस पोलिसांना हुलकावणी देत ते तिन्ही क्रांतिकारक भूमिगत राहिले. पण फितुरीमुळे ते पकडले गेले. 23 मार्च 1931 या दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आले. हसत हसत हे तिन्ही वीर देशभक्तीपर गीत गात आनंदाने फाशीला सामोरे गेले. या देशभक्तांना त्रिवार अभिवादन!

- स्वप्नाली चव्हाण, म्हापसा

संबंधित बातम्या