गोव्याच्या जनतेच्या मनावर राज्य करणारे मुस्लीम समाजातील पहिले मंत्री

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 10 मे 2021

गोवा राज्याचे ते पहिले मुस्लिम नेते होते. त्यांनी पणजी येथे बॉम्बे हायकोर्टाची स्थापना करण्यात आणि वेर्णा, काणकोण आणि कुंकळ्ळी येथे औद्योगिक वसाहती उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

गोवा विधानसभेचे माजी सभापती तसेच मुरगावचे माजी आमदार शेख हसन हरूण(Sheikh Hassan Harun) यांचे वय 85 वर्ष होते. मागील आठवड्यात 6 मे रोजी त्यांचे पणजीतील(Panaji) टोंक करंझाळे येथील द्वारका इमारतीतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. गोवा राज्याचे ते पहिले मुस्लिम नेते(First Muslim Leader) होते. त्यांनी पणजी येथे बॉम्बे हायकोर्टाची स्थापना(Goa Court) करण्यात आणि वेर्णा(Verna), काणकोण(Canacona) आणि कुंकळ्ळी(Cuncolim) येथे औद्योगिक वसाहती उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.(Sheikh Hassan Harun was the first Muslim minister of the state of Goa)

विधानसभेत मुरगाव मतदारसंघातून शेख हसन हरूण हे पाचवेळा निवडून आले होते. त्यांनी गोवा मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री व सभापती अशी अनेक पदे भूषवली होती. 1991 ते 1915 पर्यंत ते सभापती होते. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे गोमंतकीय त्यांना उत्कृष्ट सभापती म्हणून ओळखत होते. त्यांच्या अगोदर गोव्यात मुस्लिम बांधवामधील कोणीच मंत्री झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या समाजातील ते पहिलेच मंत्री होते.

छत्रपती शिवाजी महाराज गोव्यासह कोकणाची टेहळणी हनुमंत गडावरून करायचे 

17 मार्च 1937 रोजी  जन्मलेले माजी मंत्री शेख हसन हरूण यांनी कला शाखेची पदवी घेऊन पुढे वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांनी वकिली पदवी घेतल्यानंतर वास्को न्यायालयात वकिली पेशा सुरू केला होता. त्याच दरम्यान त्यांची प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पदी निवड होऊन त्यांची बदली दमण येथे झाली होती. त्यानंतर त्यांची फोंडा येथे बदली झाली. 1977 साली काँग्रेस तिकिटावर त्यांनी मुरगाव मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढविली व ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही.

1977 ते 1994 आणि 1999 ते 2002 पर्यंत ते गोवा विधानसभेचे सदस्य होते. 2000 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री होते. 2002 साली त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला होता. 
माजी मंत्री शेख हसन हरूण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना डॉक्टरांनी उपचार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांनी इस्पितळात जाणे टाळले होते. करंझाळे येथील फ्लॅटमध्ये ते मोठ्या मुलांच्या कुटुंबासमवेत राहत होते. त्यांच्या सहचरिणी झरिना यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते.

Yograj Naik: गोव्यातील वेस्टर्न संगीतकारांना घेऊन फ्यूजन कार्यक्रम केले 

स्व. शेख हसन हरूण यांनी राजकीय आणि सामाजीक क्षेत्रात भरपूर योगदान दिले आहे. एक मंत्री म्हणून त्यांनी उद्योग, कायदा आणि आरोग्य या सारखी महत्त्‍वाची खाती सांभाळलेली आहे. गोवा त्यांच्या निधनाने एका उत्कृष्ट राजकारण्याला मुकला. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून येणे कठीण आहे.

संबंधित बातम्या