शिवजयंती: डोंगर-दरीत वसणारा मावळा ह्याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

एकीकडे आदिलशहा तर दुसरीकडे मोगल अशा कठीण परिस्थितीत आपला मराठमोळा देश या परकीय अत्याचारांनी घुसमटला होता. अनेक जुलूमांनी ग्रासलेल्या भोळ्या प्रजेची भगवंतालाही दया आली.

एकीकडे आदिलशहा तर दुसरीकडे मोगल अशा कठीण परिस्थितीत आपला मराठमोळा देश या परकीय अत्याचारांनी घुसमटला होता. अनेक जुलूमांनी ग्रासलेल्या भोळ्या प्रजेची भगवंतालाही दया आली आणि ह्या त्रासलेल्या मराठ्यांसाठी शार्दुला सारखी गर्जना करून विदर्भ देशी 19 फेब्रुवारी 1630 साली राजे शिवछत्रपती माता जिजाऊंच्या उरी जन्मले. तो दिवस खरच सुवर्णाक्षरांनी महाराष्ट्राच्या कोपऱ्यान कोपऱ्यात कोरला गेला. डोंगर-दरीत वसणारा प्रत्येक मावळा ह्याच दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत होता. जुलूम आणि अत्याचारी आदिलशाही आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताने शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला. "हे हिंदू राष्ट्र व्हावे, ही श्रींची इच्छा" असे म्हणून निडर अशा शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे अशा अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती आपल्या राजासाठी न डगमगता दिली. असा हा राजा किती थोर असला पाहिजे.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सत्ता आणि वैभव याचा हव्यास न धरता भगवंतांनी ज्या कारणासाठी त्यांची निर्मिती केले ते कार्य म्हणजे स्वराज्याची स्थापना करून दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या मराठी माणसाला आपल्या मायभूमीत स्वतंत्र राहता यावं यासाठी शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य खर्ची केले. जितके शिस्तबद्ध तितकेच ते प्रेमळ होते. त्यांच्या अख्ख्या आयुष्यात मोगलांना त्यांनी सुटकेचा श्वासही घेवू दिला नाही. मोगलांविरूद्धचा त्यांचा संघर्ष फक्त राजनैतिक होता. या संघर्षात त्यांनी कुठल्या मुसलमानी तीर्थक्षेत्रांचे नुकसान केले नाही की त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार केले नाही. ते खरच नीतीशुद्ध होते, हे आपला मराठी माणूस अगदी ठामपणे सांगू शकतो. सोळाव्या शतकात जन्मलेल्या एका शूर राज्याची रणनीती आजही तितकीच उपयोगी आहे. याची प्रचिती आपल्याला 26 फेब्रुवारी 2019 साली भारतीय हवाई दलाने पुलवामात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला दिलेले चोख प्रत्युत्तर होय. भारतीय हवाई दलाने "guerilla tactics" म्हणजेच शिवाजी महाराजांची गनिमी युद्धनीती वापरून दिलेले उत्तर होय. अशा या छत्तीस हत्तींचे बळ असणाऱ्या मोगलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शिस्तप्रिय आणि वाणिज्य तेज असणाऱ्या शिवछत्रपती राजांना, जाणता राजाला माझा मानाचा मुजरा.

-पल्लवी भांडणकर

संबंधित बातम्या