श्रावणमासी हर्ष मानसी...

मनापासून पवित्र मानल्या गेलेल्या श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. श्रावण म्हटला की, व्रत वैकल्यांचा मास.
श्रावणमासी हर्ष मानसी...
श्रावणमासी हर्ष मानसी...Dainik Gomantak

मनापासून पवित्र मानल्या गेलेल्या श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. श्रावण म्हटला की, व्रत वैकल्यांचा मास. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, नागपंचमी, गोकुळाष्टमी असे सण पाच महिन्यांत येत असल्याने सणांचा मास म्हणून हिंदू धर्मात त्याचे वेगळे महत्व आहे. महिलावर्ग प्रामुख्याने या महिन्यात सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवशी उपवास करतात. अनेक महिला मंगळवार, शुक्रवारी सुद्धा उपवास करतात. रविवार पूजन करतात. गोव्यातील सर्व मंदिरांत श्रावण मासात भक्तिभावाने, भजन- कीर्तनाने वातावरण भारलेले असते. सोमवार, गुरुवार, शनिवार अशा दिवशी तर मंदिरात भक्तमंडळी आवर्जून दर्शनासाठी जातात. बऱ्याच मंदिरात श्रावण मासात या दिवशी देव देवतांच्या मूर्ती नटवल्या, सजवल्या जातात. काही भक्त मंडळी मंदिरात सत्यनारायण व्रताचरणही करतात. (Shravan Masa started from today)

श्रावणमासी हर्ष मानसी...
आयुष्य फुल विक्रीत गेले, महामारी आली आणि गणित फिसकटले

भक्तीरंग दरवळणार!

श्रावण मासात सर्वदिवशी टाळ - मृदंगाचा गजर ऐकायला येतो वातावरणातील सात्विक भाव, भजनाचा निनाद, फुलांची आरास, अगरबत्तींचा सुंगध हे सर्व अनुभवतांना मन प्रसन्न होते. कोरोना महामारीमुळे श्रावण मासातील भक्तीरंग गेल्या वर्षी मुका झाला होता. देवळांतून होणारी भजने, कीर्तने, प्रवचने गायन हे सर्व थांबले होते. मंदिरासमोर देवदर्शनासाठी लागणाऱ्या रांगा, मंदिराबाहेर फुले, नारळ, तेल, ओट्या, अगरबत्ती, केळी विकणाऱ्या महिला दाटीवाटीने बसायच्या, हे चित्र गेल्यावर्षी लुप्त झाले होते.

श्रावणमासी हर्ष मानसी...
मिर्ची लगी तो! डॉ. सुबोध केरकरांचे मिर्चीशी सूत

मयुर नृत्‍य, फुलांचा दरवळ

या मासात शेत हिरवाईने सजली आहेत. अधूनमधून पिसारे फुलवून बागडणारे मोर शेतांमध्ये कुठेतरी दृष्टीस पडतात. आता जाईच्या फुलांचा सुंगध दरवळायला लागला आहे. जायांची विक्री करणाऱ्या बाया दृष्टीस पडू लागल्या आहेत. मात्र, जायांच्या खरेदीसाठी होणारी गर्दी दिसत नाही. कारण जायांच्या वेण्या माळून बाहेर पडणाऱ्या मंदिरात देवदर्शनास जाणाऱ्या सुवासिनी, महिला, कुमारीका घरात अडकून पडल्या आहेत. मंदिरात भक्तांचे जाणे - येणे बंद झाल्याने देवाला जाया वाहणे थांबले आहे. एकूणच कोरोनाच्या सावटाखाली श्रावणमास गुदमरल्यागत होईल, अशीच परिस्थिती आहे. यंदा नाही, तर पुढील वर्षी श्रावणमास हर्षोल्‍हासात घालवू, अशीच अपेक्षा ठेऊया.

हिरवळ दाटे चोहिकडे...

यंदाही काही प्रमाणात शिथिलता असली, तरी मंदिरातील उत्सव, कार्यक्रम मर्यादित भाविकांसह करण्याची मुभा असल्याने जणू एकप्रकारची पर्वणी आहे. श्रावणातील देवदर्शन काही भक्तांना दुर्लभ होणार आहे. मंदिरासमोर फुले, नारळ, ओट्या, तेल, अगरबत्ती, पुष्पहार असे साहित्य विकून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांचा श्रावणमास हा चांगल्या मिळकतीचा महिना. परंतु, गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही हे साहित्य विकून मिळकत मिळणार नाही, या विवंचनेत महिला आहेत. भजन, कीर्तन, गायन असे कार्यक्रम श्रावण मासात बहुतेक मंदिरातून होत असत. त्यामुळे कलाकारांच्या दृष्टीनेही हा महिना महत्वाचा. परंतु, कोरोनामुळे कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने कलाकारही हवालदिल झाले आहेत. ‘श्रावणमासी हर्ष मानसी...’, ही भावना कोरोनाने हिरावून घेतली आहे. हिरवळ मात्र चोहिकडे दाटलेली आहे. सृजनाला मात्र कोरोना बाधा आणू शकलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com