
'सकाळ सोशल फाउंडेशन'च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी'सोशल फॉर अॅक्शन'हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्थां आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी'सोशल फॉर अॅक्शन'क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला असून, 'सोशल फॉर अॅक्शन'या अभियानांतर्गत महाराष्ट्रात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दर रविवारी दिली जाते.
'सोशल फॉर अॅक्शन' या अभियानांतर्गत आतापर्यंत दहा स्वयंसेवी संस्थांचे अभियान यशस्वीपणे राबवून पूर्ण करण्यात आले असून, स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांसाठी क्राउड फंडिंगद्वारे जमा झालेला निधी त्या-त्या संस्थांना वर्ग केला आहे. त्यातील काही संस्थांचा थोडक्यात आढावा. (Social For Action initiative by Sakal Media Group)
देवता लाईफ फाउंडेशन
12 वर्षांखालील कर्करोगाने ग्रस्त मुले औषधे आणि उपचारांकरीता दत्तक घेऊन अशा मुलांना कर्करोग मुक्त करण्यासाठी प्रत्यत्नशील असलेल्या नागपूर येथील 'देवता लाईफ फाउंडेशन'या संस्थेची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी संस्थेने दत्तक घेतलेल्या कर्करोगग्रस्त बारा मुलांच्या उपचारांकरीता मदतीसाठी 'सोशल फॉर अॅक्शन' अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मिळालेला निधी संस्थेला वर्ग करण्यात आला आहे.
हेल्पर्स ऑफ द हँडीकॅप
दिव्यांगांना समाजात सन्मानपूर्वक जीवन जगता आले पाहिजे, यासाठी त्यांना सक्षम केले पाहिजे तसेच त्यांचे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, वैवाहिक सर्वांगीण पुनर्वसन करण्यासाठी त्यांना जीवनावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या उद्देशाने प्रेरित होऊन, अपंगांच्या आणि दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी गेली 37 वर्षे अखंडितपणे कार्य करणाऱ्या कोल्हापूर मधील 'हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड' या संस्थेची माहिती प्रसिद्ध करून, अनेक गुणवंत दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व संस्थेला भौतिक साधनांसाठी, संगणक कक्षासाठी, इतर उपकरणांसाठी' सोशल फॉर अॅक्शन' अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मिळालेला निधी त्या संस्थेला संगणक साहित्यासाठी वर्ग करण्यात आला आहे.
यशोधन ट्रस्ट
सातारा रोडवरील वाई येथील अनाथ आणि मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या 'यशोधन ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेबद्दल समाजभान सदरात माहिती प्रसिद्ध केली होती. निराधार-बेघर आणि मनोरुग्णांच्या आरोग्य तपासणी आणि औषध-उपचारांच्या वार्षिक खर्चासाठी आणि नवीन आश्रम इमारत बांधकामाकरीता 'यशोधन ट्रस्ट'संस्थेच्या मदतीसाठी'सोशल फॉर अॅक्शन'अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच,मिळालेला निधी संस्थेला वर्ग करण्यात आला आहे.आश्रमाच्या नवीन इमारतीचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे.संस्थेत सातत्याने नवीन निराधार-बेघर व मनोरुग्णांची भरती होत असते त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी,औषध-उपचारांसाठी व जेवण आणि इतर सुविधांच्या वार्षिक खर्चासाठी संस्थेला मदतीची कायम गरज आहे.
प्रार्थना फाउंडेशन
सोलापूर जिल्ह्यातील मोरवंची येथे गरीब कमी उत्पन्न गटातील तसेच निराधार, बेघर आणि भिक्षेकरी मुलांसाठी 'प्रार्थना फाउंडेशन' च्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'वंचितांची शाळा-एक पाऊल प्रगतीकडे' प्रकल्प चालविणाऱ्या अनंतअम्मा कृष्णय्यानं आणि प्रसाद मोहिते या तरुण दाम्पत्याविषयी समाजभान सदरात माहिती प्रसिद्ध केली होती. 'वंचितांची शाळा-एक पऊल प्रगतकडे'या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावरची बेघर आणि निराधार 300 मुलं-मुली आणि वृद्धांसाठी 'प्रार्थना बालग्राम' हा निवासी प्रकल्पाच्या इमारत बांधकामासाठी 'प्रार्थना फाउंडेशन' संस्थेच्या मदतीसाठी 'सोशल फॉर अॅक्शन' अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये पुण्यातील प्रवीण मसालेवाले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून सीएसआर अंतर्गत बहुमूल्य मदत करण्यात आली होती. तसेच, मिळालेला निधी संस्थेला वर्ग करण्यात आला आहे. 'सोशल फॉर अॅक्शन' अभियानाच्या आणि अनेक देणगीदारांच्या माध्यमातून 'प्रार्थना बालग्राम' प्रकल्पाच्या वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून वृध्दाश्रमाचे बांधकाम सुरु आहे. याकरिता संस्थेला मदतीची गरज आहे.
माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका या आदिवासीबहुल परिसरात महिला सशक्तीकरण, रोजगाराभिमुख कौशल्याधिष्टित प्रशिक्षण आणि महिला व कुटुंबाचे राहणीमान उंचाविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या 'माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान' या स्वयंसेवी संस्थेच्या 'उषा शिलाई स्कूल' उपक्रमाची माहिती प्रसिद्ध करून, साक्री परिसर आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरजू महिलांना टेलरिंग व शिलाईचे प्रशिक्षण देण्याकरीता व महिलांना स्वतःचा टेलरिंग व शिलाईचा व्यवसाय सुरु करून देण्यासाठी 'माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान' या संस्थेला शिलाई मशीन व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सकाळ सोशल फाउंडेशन मार्फत मदतीचे आवाहन करण्यात आले होते.आवाहनास रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड यांनी प्रतिसाद देऊन संस्थेला उषा कंपनीचे 10 शिलाई मशीन व 1 पिको फॉल मशीन अशा अकरा मशीन भेट दिल्या आहेत.
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका या दुष्काळग्रस्त परिसरात परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ.संजीवनी केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी एकत्र येऊन महिलांची महिला व तिच्या कुटुंबाच्या विकासासाठी'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान'ही संस्था व एक चळवळ सुरु केली.संस्थेअंतर्गत ग्रामीण भागातील कमी उत्पन्न गटातील मुलांसाठी उत्कर्ष विद्यालय चालविण्यात येते ही शाळा दहावी पर्यंत असून,शाळेतील विद्यार्थी संख्या एक हजार हून अधिक आहे.शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृहाची पुरेशी सोय नव्हती,त्यामुळे 'सोशल फॉरअॅक्शन'च्या माध्यमातून संस्थेचे अभियान राबविण्यात आले.या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून,पुण्यातील देसाई ब्रदर्स लिमिटेड यांच्या सीएसआर निधीतून स्वच्छतागृहाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
माहेर
निराधार मुलांसाठी व मानसिक विकलांग महिलांसाठी आधार ठरलेल्या'माहेर'या संस्थेत संस्थेकडून लिंग,जात,पंथ किंवा धर्म कोणताही असो,महाराष्ट्राबरोबर भारतातील ग्रामीण,शहरी व झोपड्पट्टी भागातील हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला,मुले त्याचबरोबर निराधार मुले- मुली व मानसिक विकलांग महिला यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून,मानसिक आधार देण्याबरोबरच शिक्षण व व्यवसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व त्यांना समाजात अभिमानाने जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न केले जातात.माहेर संस्थेत ४० मुलांचे एक घर असते.आणि या चाळीस मुलांच्या शैक्षिणक शुल्क,शैक्षणिक साहित्य,कपडे व इतर साहित्य,आरोग्य आणि अन्नधान्य यावरील वार्षीक खर्चासाठी'सोशल फॉरअॅक्शन'च्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते.या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यामध्ये पुण्यातील चाकण परिसरातील न्युमन अँड ईस्सार इंजिनिअरिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत बहुमूल्य मदत केली होती.तसेच,मिळालेला निधी संस्थेला वर्ग करण्यात आला आहे.संस्थेत सातत्याने नवीन निराधार- बेघर मुलांची व मानसिक विकलांग महिलांची भरती होत असते त्यांच्या वार्षिक खर्चासाठी संस्थेला मदतीची कायम गरज आहे.
शाळांसाठी'अॅक्ट फॉर एज्युकेशन'
शाळांमध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे किंवा चांगल्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे प्रामुख्याने मुलींची मोठी गैरसोय होते.शाळांमध्ये चांगले स्वच्छतागृहे असणे गरजेचे आहे.त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून,विद्यार्थ्यांनी डिजिटल साक्षर होणे आवश्यक आहे.हे ओळखून'सोशल फॉर अॅक्शन'या अभियानांतर्गत स्वच्छतागृह उभारणी,डिजिटल ई-लर्निंग सुविधा अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून, देण्यासाठी लोकसहभागाच्या व सामूहिक मदतीच्या(क्राउड फंडींगच्या)माध्यमातून 'अॅक्ट फॉर एज्युकेशन'उपक्रम हाती घेण्यात आला होता.या उपक्रमांतर्गत भोर तालुक्यातील तांभाड येथील जि.प.प्राथमिक शाळेत व वेल्हे तालुक्यातील सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.तसेच,पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना ई-लर्निग सेटअप उपल्बध करून दिला आहे.दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे व ई- लर्निंग सेट- अप उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून,या उपक्रमासाठी मदतीची गरज आहे.
शैक्षणिक व जीवनावश्यक साहित्याचे वाटप
समाजातील भटक्या विमुक्त व स्थलांतरीत कुटुंबातील विद्यार्थ्यांना व निराश्रीत व सामाजिक स्नेहापासून दुर्लक्षित राहिलेल्या मुलांना सामाजिक विकासाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत कार्यशील असणाऱ्या व भटक्या जाती -जमातीतील मुलांच्या संस्कारक्षम सर्वांगीण विकासाचे व पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या'केअरिंग हॅन्डस्'या संस्थेतील 43 मुलांना 'सोशल फॉरअॅक्शन' च्या अभियानाच्या माध्यमातून शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.तसेच,निराधार,बेघर,एकल पालक असलेल्या,बाल कल्याण समिती मार्फत व पोलिसांमार्फत दाखल केलेल्या वंचित व दुर्लक्षित मुलींसाठी निवासी प्रकल्प चालविणाऱ्या पुण्यातील'सेंट क्रिस्पिन्स होम'या संस्थेतील 49 मुलांना शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.याचबरोबर ग्रामीण भागातील मुलांना अशा एकूण 320 विद्यार्थ्यांना उपक्रमांतर्गत साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमासाठी पुण्यातीलश्री मुकुंद भवन ट्रस्ट व लोहिया प्रतिष्ठान या संस्थांनी बहुमूल्य मदत केली होती.
'सोशल फॉर अॅक्शन'या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर विविध स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमाची माहिती प्रसिद्ध केली जाते.समाजातील दानशूर व्यक्ती,माहिती -तंत्रज्ञान कंपन्या,औद्योगिक कंपन्या,विविध सेवा संस्था,सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिकhttps://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन,विविध सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात.या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व 80 जी हे प्राप्तिकरात 50 टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.
महाराष्ट्रात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आपल्या सामाजिक उपक्रमाची माहिती https://socialforaction.com/ यावेबसाईट वर एनजीओ फंडरेझिंग या सेक्शन मध्ये जाऊन,स्वयंसेवी संस्थांसाठी असणारा फॉर्म भरून आपल्या संस्थेसाठी ऑनलाईन क्राउड फंडींगसाठी फंडरेझिंग अभियान सुरू करू शकता.स्वयंसेवी संस्थेसाठी नोंदणी प्रमाणपत्र, 80- जी प्रमाणपत्र व 12 ए प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:- 8605017366
शाळांसाठी'अॅक्ट फॉर एज्युकेशन'उपक्रमांतर्गत शाळांमध्ये ई- लर्निंग सेट-अप
ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करताना.
अधिक माहितीसाठी संपर्क :
वेबसाईट : https://socialforaction.com/
https://www.instagram.com/socialforaction/
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.