सोशल मिडिया 'आपल्यासाठी' आपण सोशल मिडियासाठी नाही

Social Media: सोशल मिडियाच्या डोळे दीपवणाऱ्या या प्रभावात अनेकजण वाहून गेले आहेत.
Social Media
Social Media Dainik Gomantak

तुम्ही सोशल मिडियावर (Social Media) करीना कपूरला किंवा अक्षय कुमारला फॉलो करता काय? तो किंवा ती काय करत असते हे तुम्ही पुन्हा पुन्हा तपासून पहात असता काय? जर या प्रश्‍नाचे उत्तर ‘होय’ असेल तर तुमच्या नकळतच, या दोघांच्या मदतीने काही उत्पादकांनी आपल्या उत्पादनांचे ‘धंदेवाईक’ जाळे तुमच्या भोवती विणत आणले आहे हे पक्के जाणा आणि तुम्हाला सावध बनण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे याचीही खुणगाठ बांधा.

केवळ करीना किंवा अक्षयच नव्हे तर अशा अनेक ‘सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर’चे जाळे आज सोशल मिडियाच्या माध्यमाने पसरून आहे. या इन्फ्लुएन्सरना फॉलो करणे ही आजच्या काळातली सामान्य बाब बनली आहे. हे प्रभावकर्ते आपल्या फॉलाेअर्सना आपल्यात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून आपले व्यावसायिक मूल्य अधिक उंचावर नेऊन ठेवतात. त्यामुळे ‘फॉलोअर्सवर इन्फ्लुएन्सरचा प्रभाव’ ही फॉलोअर्सच्या कल्याणाच्या बाबतीत एक नकारात्मक गोष्ट ठरण्याचा संभवच अधिक असतो. आपल्या इन्फ्लुएन्सरचे अकाऊंट जेव्हा एखादा फॉलोअर तपासू शकत नाही तेव्हा त्या फॉलोवरच्या मनात हरवल्याची व तुटलेपणाची भावनाही निर्माण होत असते, जी मानसिक स्वास्थ्याच्या (Mental Health) दृष्टीने खूप धोक्याची असते.

आपल्या ‘इन्फ्लुएन्सर’ ना बांधून असण्याचे परिणाम शोधण्यासंबंधी एक सर्वे केला गेला. या सर्वेमधून जे निष्कर्ष हाती आले आहेत ते ‘सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर’ ना फॉलो करण्याच्या काळ्या बाजूवर ठळकपणे प्रकाश टाकतात. या संशोधनातून स्पष्टपणे दिसून आले आहे की ‘ओळख आणि बांधून राहण्या’संबंधीची ही ओढ फॉलोवरच्या समस्यांना कारणीभूत होत असते.

अर्थात अशा समस्यांना बळी पडणारे तुम्ही एकटेच नाही आहात. सोशल मिडियाच्या डोळे दीपवणाऱ्या या प्रभावात अनेकजण वाहून गेले आहेत. सोशल मिडियावरच्या इन्फ्युएन्सरनी अनेक डावपेच त्यासाठी वापरले आहेत आणि स्वतःचा प्रभाव फॉलोवर्सवर कायम ठेवला आहे. इन्स्ट्राग्राम (Instagram) व फेसबुकवर (facebook) ‘लाईव्ह स्‍ट्रीम’ टाकण्याची क्लृप्ती तर ते हमखास वापरतात.

त्यातून होणाऱ्या (Social Media) कमाईचा संदर्भ लक्षात घेता या उद्योगाचे महाकाय स्वरूप लक्षात येणे अवघड नाही. एका संशोधनाद्वारे हे स्पष्ट झालेले आहे की सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा हा उद्योग आहे.

अधिकाधिक पैसा (Money) कमावण्यासंबंधित हा उद्योग असल्यामुळे त्याच्या नकारात्मक बाजूकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता ‘सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर’ आणि त्याच्याशी निगडित असणाऱ्या उत्पादनांच्या उत्पादकांना असेलच असे सांगता येत नाही. किंबहुना बहुधा ती नसतेच हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. हल्लीच निर्माण झालेला ‘गुटखा’ संबंधीचा वाद आणि त्या जाहिरातीत काम करणाऱ्या अभिनेत्यांचा प्रतिवाद हे या बाबतीतले उत्तम उदाहरण आहे.

Social Media
स्त्रियांना आत्मनिर्भर करणारी गोव्याची ‘पॅड वुमन’

अशावेळी सोशल मिडियाच्या (Social Media) वापरकर्त्यांनी स्वतःच सजग राहणे आणि स्वयं-नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. हे करण्याचा मार्ग म्हणजे फोनच्या सेटींगचा उपयोग करून घेणे. त्यावर इन्स्ट्राग्रामवर आपला दैनंदिन वेळ घालवायची मर्यादा आपण सेट करू शकतो किंवा त्या ॲपसाठी ‘टर्निंग ऑफ नोटिफिकेशन’ची योजना करू शकतो.

खरे तर सोशल मिडियावरच्या इन्फ्‍लुएन्सरनादेखील आपल्यामुळे निर्माण होणाऱ्या या समस्यांची जाणीव असायला हवी. आपल्या फॉलोवर्सबरोबर निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यावर त्यांनी लक्ष पुरवायला हवे. पण ‘नफेखोरी’शीच अधिक बांधून राहिलेला हा उद्योग त्यांना तसे करायला देईल काय?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com