Solar Souto Maior Art Gallery: गोव्याचा हरवलेला भूतकाळ इथे जतन केला जातो

Solar Souto Maior हे युनेस्को अंतर्गत नोंदणीकृत जुन्या गोव्यातील सर्वात जुने उरलेले वारसा घर आहे.
Solar Souto Maior Art Gallery
Solar Souto Maior Art GalleryDainik Gomantak

सोलर सौतो मायोर (Solar Souto Maior) हे जुन्या गोव्यातील एक प्रसिद्ध कलादालन (Art Gallery) आहे. तुम्हाला पुरातन कलेची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी जरूर भेट द्या. सोलर सौतो मायोर हे गोव्यातील (Goa) सर्वात जुने उरलेले वारसा घर आहे जे 1580 च्या दशकाच्या सुरुवातीला बांधले गेले होते.

Solar Souto Maior Art Gallery
Hava Maryam Ayesha लेकी अफगाणिस्तानच्या
Solar Souto Maior Art Gallery
Solar Souto Maior Art GalleryDainik Gomantak

या घरामध्ये कलाकृतींचा एक मोठा संग्रह आहे. जो गोव्याचा हरवलेला भूतकाळ परत मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. आर्ट हाऊसची रचना दोन स्तरांवर विस्तारलेली आहे, एक आर्ट गॅलरी आणि दुसरे म्हणजे संग्रहालय दुकान. ही आर्ट गॅलरी कलाकृती आणि 16 व्या शतकातील प्राचीन स्मारकांचा विस्तृत संग्रह जतन करत आहे. दुसरीकडे, संग्रहालय पुरातन वस्तू आणि संग्रहणीय वस्तूमध्ये गुंतलेले आहे.

Solar Souto Maior Art Gallery
कोकणी गीतांचा ‘डॉल्बी’ आधारस्तंभ
Solar Souto Maior Art Gallery
Solar Souto Maior Art GalleryDainik Gomantak

"गोव्याचा हरवलेला भूतकाळ जतन केला जातो"

1580 च्या दशकाच्या सुरुवातीला बांधलेले, सोलर डी साउतो मायोर हे युनेस्को अंतर्गत नोंदणीकृत जुन्या गोव्यातील सर्वात जुने उरलेले वारसा घर आहे. गोव्याचा हरवलेला भूतकाळ परत मिळवण्याच्या एकमेव हेतूने हे घर अजूनही आहे.हे घर आपल्याला भूतकाळातील गोव्याकडे घेऊन जाते.

सोलर साउतो मायोर गोव्यातील कलाकृतींच्या विस्तृत प्रकारामध्ये झूमर किंवा मोठे सजवलेले दिवे, भिंत हँगिंग, संगमरवरी टेबल आणि लाकडी फर्निचर यांचा समावेश आहे.याशिवाय आपण गॅलरीमध्ये कॅलिग्राफिक डिझाइनसह भांडी देखील पाहू शकता. सुंदर आणि कलात्मक प्रत्येक गोष्टीला सोलर डी साउतो मायोर आर्ट गॅलरीमध्ये स्थान मिळाले आहे. पणजी मधून ओल्ड गोवा कडे जातानाच्या मार्गावर हे कलादालन आहे. तुम्हाला जर भूतकाळातील गोवा अनुभवायचा असेल तर अवश्य एकदा या कलादालनास भेट द्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com