कलकत्ता येथील नाट्यमहोत्सवात ‘स्पाईन’

‘संतोषपूर अनुचिन्तन’ आणि ‘स्पर्श नाट्य रंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात अभिव्यक्ती- पणजी निर्मित ‘स्पाइन’ या नाटकाला आमंत्रित केले गेले आहे.
कलकत्ता येथील नाट्यमहोत्सवात ‘स्पाईन’
goaDainik Gomantak

संतोषपूर अनुचिन्तन’ या कलकत्ता येथील युवा रंगकर्मींच्या संस्थेतर्फे कलकत्ता येथील तपन थिएटर येथे 6 मे ते 8 मे दरम्यान ‘हृदय मंच’ या राष्ट्रीय हिंदी नाट्य महोत्सवाचे आयोजन होत आहे. ‘संतोषपूर अनुचिन्तन’ आणि ‘स्पर्श नाट्य रंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात अभिव्यक्ती- पणजी निर्मित ‘स्पाइन’ या नाटकाला आमंत्रित केले गेले आहे. याच महोत्सवात गोव्यातील रंगकर्मी अनघा देशपांडे यांना त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी ‘उषा गांगुली स्मृती पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात, दिनांक 6 मे रोजी सदर पुरस्काराचे वितरण केले जाईल. कोची, केरळ येथील लोकधर्मी, डॉ. चंद्रहासन या सोहळ्याचे प्रमुख़ पाहुणे आहेत.

या महोत्सवात अभिव्यक्ती- पणजी- गोवा, अभिनव थिएटर- आसाम, स्पर्श नाट्यरंग- नवी दिल्ली, शॅडो थिएटर-मध्य प्रदेश आणि संतोषपूर अनुचिंतन- पश्चिम बंगाल या पाच राज्यांतील संस्थांच्या नाटकांचा समावेश आहे.

दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 5 वाजता, अभिव्यक्ती – पणजी चे कलाकार स्त्रियांच्या कण्यावर आधारित ‘स्पाइन’ हे हिंदी नाटक सदर करतील. दिग्दर्शिका अनघा देशपांडे यांनी या नाटकात, पाठीच्या कण्याचे महत्त्व सांगण्यासाठी प्रभावी घटनांची मालिका तसेच सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला आहे. नाटकाचा आधार म्हणून महाराष्ट्रातील मिरज येथील डॉ. गिरीश दातार यांच्या जीवनानुभवांचा, त्यांना उपचार करतेवेळी जाणवणाऱ्या समस्यांचा तसेच काही विशिष्ट रुग्णांच्या केसेसचा वापर केला आहे. ‘नाटक’ या प्रभावी माध्यमाद्वारे स्त्रियांच्या कण्याच्या आरोग्यासंबंधी जनजागृती करण्याचा अभिव्यक्तीचा हा एक प्रयत्न आहे.

संकल्पना, दिग्दर्शन : अनघा देशपांडे

संहिता : शांभवी देशपांडे, अंतरा भिडे, अनघा देशपांडे

गीते : अंतरा भिडे

रंगसामुग्री : अरुणकुमार मलिक

संगीत प्रोग्रामिंग : मुकेश घाटवळ

बंधरचना : प्रेरणा पालेकर

प्रकाशयोजना : अविनाश च्यारी

ध्वनिरचना आणि संगीत दिग्दर्शन : डॉ. साईश देशपांडे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.