‘युवा जोश’ महोत्सवात गोव्यातील विद्यार्थांचा उत्फूर्त प्रतिसाद

पणजी आणि मडगाव तिथल्या लोकांनी परवाच्या दिवशी विद्यार्थ्यांचा आवाज रस्तानाट्यामधून अनुभवला
Goa
GoaDainik Gomantak

पणजी आणि मडगाव तिथल्या लोकांनी परवाच्या दिवशी विद्यार्थ्यांचा आवाज रस्तानाट्यामधून अनुभवला. उसळत्या रक्तात आपले म्हणणे मांडण्याची एक वेगळी धमक असते आणि लोक तो आवाज लक्ष देऊन ऐकतात. ‘दैनिक गोमन्तक’ आणि ‘यंग इन्स्पिरेशन नेटवर्क’ यांच्या सहयोगातून चालू असलेल्या ‘युवा जोश’ या महाविद्यालयीन स्तरावरच्या स्पर्धांची ती सुरुवात होती. स्पर्धेचा भाग असलेल्या रस्तानाट्यातून विद्यार्थी आपल्या विचारांना मुक्तद्वार देत होते. कॉलेजचे इतर संघ त्याचवेळी इतरत्र कुठेतरी ‘लघुपट’ (Short Film) आणि ‘रील मेकिंग’ या दोन स्पर्धांत गुंतलेले होते. कालपर्यंत ते पूर्ण करून त्यांनी आपापली निर्मिती आयोजकांकडे सुपूर्दही केली असेल.

या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. पणजीच्या ‘इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा’ सभागृहात आज सकाळपासून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या कॉलेज संघांमध्ये चुरस लागलेली असेल. वैखरी (वक्तृत्व), था था थैया (नृत्य), अ‍ॅड गुरु (जाहिरात सादरीकरण) लयकारी (गीत गायन) या स्पर्धांमधले सादरीकरण रंगमंचावर जस-जसे आपली वरची पातळी गाठेल, विद्यार्थ्यांच्या आवेशांना अधिक बळ येत जाईल. आपापल्या संघांचे समर्थन करताना, निष्ठेच्या भावनांना अधिकच सामर्थ्य मिळेल. रंगमंचावरील या स्पर्धा चालू असतानाच, इतरत्र चित्रकथा (पोस्टर) आणि चेहरे पे चेहरा (फेस पेंटिंग) या स्पर्धाही चाललेल्या असतील. रंगांची मांडणी कागदावर आणि चेहऱ्यावर होऊन त्यामधूनही विचार आणि कल्पनाशक्तीचे पडसाद उमटतील.

Goa
आयपीएलचा घोडेबाजार! घोड्यांप्रमाणे 'खेळाडूंचा' लिलाव

दिवस संपता संपता निकालाच्या प्रतिक्षेत असणारे चेहरे मात्र अस्सल बनत जातील. जिंकण्या-हरण्याच्या क्षणात प्रत्येकाला दृढपणे उभे राहण्याची आपली क्षमता कळते. इथेही कळेल. जिंकणाऱ्याचा जल्लोष आणि हरणाऱ्याचे स्व-विश्लेषण या दोन्हींचे पारडे खरे तर समान असते. या तराजुतूनच उद्याचे नागरिक बनवण्यासाठी ते ठामपणे सज्ज होतील- भविष्यात त्यांच्यासमोर असणाऱ्या साऱ्या आव्हानांचा वेध घेत!

स्पर्धा फक्त निमित्तमात्र असतात. मात्र त्या जाहीर झाल्यानंतर, संघांचे एकत्र येणे, त्यातले ब्रेनस्टॉर्मिंग, नंतर स्पर्धा चालू असताना तिथला जल्लोष, नवीन कल्पनांची तळपत असणारी चमक, त्याला मिळणारी दाद, तिथली ईर्षा यातून झळकणारे क्षणच खरे असतात. म्हणून ट्रॉफी उंचावणाऱ्या हातांना, खाली राहून टाळ्यांची दाद देणारे हातही अशा क्षणांच्या रंगात माखून जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com