What's App Blog: 'खंडग्रास' व्हॉटस् ॲप!

What's App Blog: ग्रहणाच्या वेधकाळात ग्रहण लागल्यामुळे अनेकांना देव पाण्यात बुडवावे की मोबाईल, असा प्रश्न पडला.
What's App Blog
What's App BlogDainik Gomantak

What's App Blog: काय म्हणताय ? अर्थात व्हॉटस् ॲप या आभासी चावडीला खंडग्रास ग्रहणाच्या वेधकाळात ग्रहण लागल्यामुळे अनेकांना देव पाण्यात बुडवावे की मोबाईल, असा प्रश्न पडला. मोबाईल बुडवणे परवडणारे नाही. याचे कारण ही संदेशवहन यंत्रणा आणि यंत्र हे आबालवृद्धांचा जीव का प्राण. अनेकांच्या अस्तित्वाला पूरक तर कित्येकांसाठी प्राणवायू असलेले व्हॉटस् ॲप ऐन साणासुदीच्या काळात बंद पडल्याने त्यांचा श्वास कोंडला गेला.

जीव जातो का काय, असे त्यांना वाटू लागले. विश्वचषक स्पर्धेत भारताने तगडा खेळ करत पाकवर अविश्वसनीय असा मिळवलेला विजय, भारतीय वंशाचे सावळे ऋषी सुनक गोऱ्यांच्या देशावर राज्य करायला निघाल्याने देशाभिमानाने छाती 56 इंचांची झाली असताना आणि कित्येक वर्षांनी दिवाळीत आलेले सूर्यग्रहण अशा विषयांच्या पर्वणी काळात व्हॉटस् ॲपची गिरणी सुरू असताना अचानक त्यात खंड पडल्याने त्यावर व्यस्त असणाऱ्यांना सैरभैर झाल्यासारखे वाटणे साहजिक आहे.

What's App Blog
Goa Blog: गोव्याच्या नावाला बट्टा..!

ही संदेशवहन यंत्रणा निव्वळ संदेश देणारी राहिलेली नसून आपल्या विचारांना पोषक अशी झिंग आणणारी माहिती चुकटीसरशी देणारे ‘विद्यापीठ’ झाले आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या घटनांऐवजी येणारे संदेश अधिक विश्वासार्ह, अधिक ‘आपले’ वाटायला लागले आहेत.

येणाऱ्या संदेशांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक संदेश हे खोडसाळ आणि तथ्यांशी तडजोड करणारे असतात हे ठाऊक असूनही आयती माहिती मिळते म्हणून त्यावर आंधळा विश्वास ठेवणारे काही कमी नाहीत. तर असे संदेश अनेकांपर्यंत प्रक्षेपित करण्याची जबाबदारी नियंत्याने आपल्या शिरावर दिली आहे असे मानून ते भक्तिभावाने अग्रेषित करणारे महाभाग गटा-गटांत अनुभवता येतात. त्यांचा तास दोन तास जो छळ झाला त्यास तोड नाही.

What's App Blog
Goa: ...यामुळेच होत आहेत जमीन घोटाळे!

दुपारी साधारणपणे बारापासून संदेशवहनात अडथळे निर्माण होऊ लागले आणि त्यानंतर साराच संवाद ठप्प झाला. मोठ्या धुमधडाक्यात झालेल्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडिओ जागच्या जागी थांबल्याने वापरकर्त्यांना जणू आयुष्यच थिजल्याचा भास झाला. कारण आभारी जगात दादा बनून वावरणे अनेकांचे व्यसन आहे. या साऱ्यांची व्हॉटस् ॲपने खऱ्या अर्थाने तीन तासांची परीक्षा घेतली.

याआधी अशाप्रकारचा मोठा व्यत्यय मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातच आला होता. पण त्यावेळी एवढा गहजब माजला नव्हता. हा व्यत्यय येताच जगभरात पर्यायांची मोठ्या प्रमाणावर शोधाशोध सुरू झाली. या ‘ग्रहण’ काळात शोधाशोध थोडीथोडकी नव्हे तर चोवीसशे पटीने वाढल्याचे एक मोजमाप पुढे आले आहे. संदेशवहन होत नसल्याने अनेकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि ट्विटरचा आधार शोधला.

What's App Blog
Blog: ब्रिटनमध्ये हुजुरांची हातघाई!

ऐनवेळी आल्यामुळे त्यांची तेथे विशेषतः ट्विटरवर भरपूर टिंगलटवाळी झाली. या टिंगलटवाळीची व्यंग्येही मग दिवसभर फिरली. खुद्द झुकरबर्ग तारांच्या जंजाळापुढे डोक्यावर हात ठेवून उभा असल्याचे चित्र विशेषत्वाने फिरले. ऐन महत्त्वाच्या वेळी विद्युत पुरवठा ज्याप्रमाणे खंडित होतो तसेच काहीसे व्हॉटस् ॲपचे होत असल्याचे मत उद्वेगाने व्यक्त झाले.

कुठल्याशा तांत्रिक बिघाडाने ठप्प झालेले संदेशवहनाचे सत्र असेच कुठल्याशा तांत्रिक दुरुस्तीने पूर्ववत झाले. कंपनीने त्याचा खुलासा न केल्यामुळे नेमके काय झाले होते, हे कुणालाही समजणार नाही. आता त्यात कुणाल रसही नाही. परंतु, तीन तासांची ही परीक्षा नापास ठरवून गेली हे अनेकांच्या गावीही नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com