Goan Houses: गोमंतकीय संस्कृतीची अनोखी खूण

कुठलीही गोष्ट व्यावहारिक बनण्यासाठी तिला मागणीही असायला हवी.
Goan houses
Goan housesDainik Gomantak

Goan houses आपले जुने घर मोडकळीस येऊन ध्वस्त होण्याऐवजी अनेक गोमंतकीय त्यांचा जीर्णोद्धार करताना दिसतात. आपला सांस्कृतिक वारसा, ज्याचा ते स्वतःला भाग मानतात तो पुनर्संचयित करणे हा त्यांचा त्यामागचा मुख्य उद्देश असतो.

त्यांचे बालपण त्या जुन्या घराशी निगडित असते. मला असेही लोक ठाऊक आहेत, जे फ्लॅटमध्ये वाढले आहेत पण आपले आई वडील जिथे कधीकाळी वास्तव्यास राहिले होते त्या घरी त्यांना पुन्हा जायचे आहे, आपल्या मुळांशी त्यांना परतायचे आहे.

जुन्या घरांचे पुनरुज्जीवन कसे करावे हे आज आपल्यापुढे आव्हान नाही तर त्यांना पुनरुज्जीवित करणारी सक्षम यंत्रणा तयार करणे हे खरे आव्हान आहे. बांधकामासंबंधी निश्‍चित रितीरिवाज असणाऱ्या एका सांस्कृतिक व्यवस्थेशी त्याचा संबंध आहे.

पारंपारिक ज्ञानाचा तो विस्तृत पट संबंधित प्रतिभावंत कारागिरांना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला गेला पाहिजे आणि या प्रशिक्षित कारागिरांना जुन्या घरांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम भविष्यातही मिळत राहील याची खात्रीही मिळाली पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट व्यावहारिक बनण्यासाठी तिला मागणीही असायला हवी.

Goan houses
Gulmohar: लालजर्द कृष्णचुडा

जुन्या घराचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे आधुनिकतेशी फटकून राहणे नव्हे तर समकालीन सभ्यता, जीवनशैली यांचाही समावेश त्यात करणे असाच होतो. घरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी खूप पैसे लागतात असाही एक गैरसमज आहे.

अर्थात ते स्वस्तही नसते पण वाजवी खर्चात ते निश्‍चित केले जाऊ शकते. मूळ रचनांमध्येच बहुतेकदा उपजत सौंदर्य असते पण ते कळण्यासाठी घरमालक सक्षम असायला हवेत.

जीर्णोद्धार म्हणजे मुळात जसे आहे त्यांत ‘बदल’ घडवून आणणे नव्हे. तसे असेल तर त्याला जीर्णोद्धार नव्हे तर ‘रूपांतर’ म्हणावे लागेल.

Goan houses
Art Gallery: हिपासोएक्स व एकतारा चित्राविष्कार

असमान भिंतीमध्ये देखील एक सौंदर्य असते. प्रत्येक जुन्या घराच्या रचनेत पारंपरिक बॉलरुम असायचा असे नाही. अशावेळी जीर्णोद्धार करताना त्यात बॉलरुमची योजना करणे चुकीचे ठरेल. काही लोक रचनेच्या बाबतीत रोमॅंटिक कल्पना बाळगून असतात.

कारण त्यांनी सिनेमात किंवा मासिकात जुन्या गोमंतकीय घरांच्या वेगळ्या प्रतिमा पाहिलेल्या असतात. अनेकांना अशी घरे पर्यटनसंबंधित प्रकल्पात रूपांतरित करण्याचा सोस असतो.

पण आपण लक्षात घ्यायला हवे की ‘अर्थशास्त्र’ त्याला साथ देईलच असे नाही. मी अशा प्रकल्पांकडे ‘रूपांतर’ म्हणूनच पाहतो आणि त्यासाठी तुमच्याकडे खूप भांडवल असणे जरुरीचे आहे.

अभिजीत साधले, वास्तुविशारद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com