मुले परतती शाळेत आणि…
मुले परतती शाळेत आणि…Dainik Gomantak

मुले परतती शाळेत आणि…

रस्त्यावरून शाळेला (School) जाणाऱ्या मुलांची लगबग पाहणे म्हणजे जीवन पुन्हा सामान्य अवस्थेत येण्याचे शुभचिन्ह अनुभवास येण्यासारखे आहे.

सुमारे दीड वर्षानंतर आता सकाळचे ओळखीचे चित्र (Photo) पुन्हा दिसायला लागले आहे. रस्त्यावरून शाळेला (School) जाणाऱ्या मुलांची लगबग पाहणे म्हणजे जीवन पुन्हा सामान्य अवस्थेत येण्याचे शुभचिन्ह अनुभवास येण्यासारखे आहे. (इडा पिडा टळो....) कोविडकाळात (Covid) पालक आणि मुले या दोघांनाही कठीण काळातून जावे लागले. शाळेत (School) मुलांचे परतणे हे स्वागतार्ह पाऊल आहेच पण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जगात अनेक देशातली (country) मुले अजूनही शाळेपासून वंचित आहेत. सुमारे 134 देशांपैकी 105 देशांनी या कोरोना काळात (Corona) आपल्या शाळा (School) बंद ठेवल्या होत्या.

आता जेव्हा आपल्या राज्यातल्या शाळा (School) जेव्हा सुरू होत आहेत, काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक अंतर, शारीरिक स्वच्छता राखणे वगैरेंना पर्याय अजूनही नाही. युनेस्कोच्या (UNESCO) तज्ज्ञानुसार एका प्रदीर्घ अनिष्ट काळानंतर मुलांचे शाळेत (School) परतणे हे पूर्वीसारखे सामान्य आणि सहज असणार नाही. जशी परिस्थिती उद्भवेल त्याप्रमाणे शाळांचे चालू असणे किंवा बंद राहणे हे ठरले जाईल. शाळांनी अगाऊ योजना आखणे आणि विद्यार्थ्यांच्या (Student) स्वास्थ्यासाठी शिक्षक (Teacher) आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षिततादेखील विचारात घेणे हे अनिवार्य बनून जाईल.

युनेस्कोने (UNESCO) शाळांसाठी (school) काही व्यावहारिक उपाय सुचवले आहेत त्यानुसार, शाळांच्या वेळेत बदल करणे आवश्यक असेल, शाळेच्या मधल्या सुट्टीचीही वेगळ्यातऱ्हेने आखणी करावी लागेल. वर्गांचा आकार कमी करून शाळा शिफ्टमध्ये घ्यावी लागेल.. इत्यादी. प्यायचे पाणी आणि इतर स्वास्थ्यविषयक उपाय या अत्यंत महत्त्वाच्या बाबी ठरणार आहेत. हात धुणे. श्वासविषयक शिष्टाचार (विशेषकरून खोकणे किंवा शिंकणे) यात शाळेच्या प्रशासनाला लक्ष घालावे लागेल. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्यादृष्टीने प्रशिक्षित करावे लागेल.

एका विस्कळीत काळानंतर मुले शाळेत जात असल्याने काही प्रश्न पालकांच्या मनात उद्भवणे आणि ह्या प्रश्नांचे त्यानी शाळांकडून निरसन करून घेणे स्वाभाविक आहे. जसे, 1 . विद्यार्थ्यांच्या (Student) सुरक्षेसाठी शाळांनी कुठली पावले उचलली आहेत? 2 . शाळा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला कशी मदत करणार आहे? 3 . आजारी विद्यार्थ्याला एखाद्या कलंकाशी सामना तर नाही करावा लागणार? आणि या साऱ्या प्रश्नांच्या सकारात्मक उत्तरांसाठी पालक-शिक्षक समितीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

कोरोनाकाळाच्या (Corona) कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांनी हर प्रयत्नाने शिक्षणात त्यांना असलेला रस स्पष्ट केला आहे. समर्पित शिक्षक (Teachers) आणि पालकांच्या पाठिंब्याने आणि मदतीने त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले होते. परंतु शाळा उघडल्यानंतर, कोरोना काळात दुर्दैवाने मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी (student) शाळांकडून अतिरिक्त प्रयास करणे गरजेचे राहील. अशा मुलांसाठी शाळांनी योजना आखाव्या लागतील. अनेक शाळा (school) अजून पूर्णवेळ किंवा सर्व इयत्तांसाठी उघडू शकणार नाहीत ही शक्यता लक्षात घेऊन त्यांना शिक्षणाचे नवे ‘मॉडेल’ही बनवावे लागेल.

मुले परतती शाळेत आणि…
अनुभुतीची मांडणी करणारी पटकथा लिहिणे आव्हानात्मक

घरी पालकांनादेखील मुलांना अधिक पाठबळ पुरवावे लागेल. मुले अस्वस्थ बनणार नाहीत आणि त्यांची एकाग्रता ढळणार नाही याची काळजी घ्यावीच लागणार आहे. शाळेच्या आणि शिक्षकांच्या संपर्कात राहून मुलांच्या मानसिक अवस्थेबद्दल(Mental Health) , त्यांना वाटणार्या चिंतांबद्दल पालकांनी जाणून घेणे गरजेचे असेल. पालकांनी हे लक्षात घेणे देखील आवश्यक आहे की त्यांचे मूल, त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तणावाला सामोरे जाणार आहे. मुलांच्या प्रश्नांना आणि भावनांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे असेल. आणि अर्थात, मुलांना हे देखील कळू देणे आवश्यक आहे की अशा वेळी निराश होणे किंवा चिंताग्रस्त होणे हे केवळ ठीक नाही तर सामान्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com