कोरोना संकट आणि ऑनलाइन शिक्षण; विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न

शैक्षणिक संस्थांना आपल्या रचनेमध्ये अनेक बदल करावे लागणार आहेत.
Online Education
Online EducationDainik gomantak

गेल्या दीड वर्षांपासून जगावर कोरोना महामारीचे (Covid 19) संकट ओढावलं असून यामुळे अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण झालीये. महामारीने आर्थिक पातळीवर मोठे परिणाम केलेत. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावलंय. कोरोना महामारीने शैक्षणिक (Education) प्रक्रियेवरही अभूतपूर्व परिणाम केलं असल्याचं आपण पाहू शकतो. विषाणूच्या भीतीने शाळा-कॉलेज बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच बसून ऑनलाईन शिक्षण घेणे अनिवार्य झालं. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना कितपत पचनी पडतंय हा प्रश्न वेगळा, पण अशा प्रकारच्या शिक्षणाशी जुळवून घेण्याचे प्रयत्न विद्यार्थी आणि शिक्षक करत असल्याचं दिसून येतंय. (The online learning that started in the Corona crisis has solved many questions for students)

कोरोना महामारीने शिक्षण प्रक्रियेला वेगळे वळण मिळालंय असं आपण म्हणून शकतो. शैक्षणिक संस्थांना आपल्या रचनेमध्ये अनेक बदल करावे लागणार आहेत. शाळा-कॉलेजमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर शिकवणे आणि ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवणे यात फरक आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिकवणीमध्ये प्रश्न उपस्थित करणे टाळतात असा अनुभव आहे. शिवाय शिक्षक वर्गात जसे मार्गदर्शन करू शकतात तसंच आणि तितक्या प्रभावीपणे ऑनलाइन क्लासमध्ये शक्य आहे का असा प्रश्न पडतो. ऑनलाईन शिक्षण पद्धती ही विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांसाठी नवीन आहे. त्यामुळे यासाठी या दोघांना आणखी वेळ देणे आवश्यक आहे. येत्या काळात ही पद्धती सर्वांच्या अंगवळणी पडेल अशी आशा आहे.

Online Education
Delhi University: 26 जुलैपासून नोंदणी प्रक्रिया होणार सुरू

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाद्वारे पास करण्यात आलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पात्रतेचे योग्य आकलन कितपत होईल याबाबत शंका उपस्थित केली जाते. विद्यार्थी एखाद्या विषयात किती निपूण आहे, हे पाहण्यासाठी परीक्षा असायला हवी. पण, कोरोना संसर्गच्या भीतीमुळे परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय अपवाद म्हणून घेण्यात आला आहे. विद्यार्थी पास झाले असले तरी त्यांच्यासमोर आता एक नवीन समस्या उभी राहिली आहे. कोरोना काळात अनेकांना वर्क फॉर्म होम करण्याची सवलत देण्यात आली होती. पण ज्यांना वर्क फॉर्म होम करणं शक्य नव्हतं अशांना काहीही न करता घरात बसून राहावं लागलं. अनेकांना बेरोजगार व्हावं लागलं. ऑनलाईन पद्धतीने काम असणाऱ्यांना महामारीचा कमी प्रमाणात फटका बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थी अशाच प्रकारच्या शिक्षणाला पसंती देण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com