'जळता गोमंतक' गोवा मुक्ती संग्रामाचे पुनरुज्जीवन

या नाटकात 15 ऑगस्ट 1956 साली पोर्तुगीजांनी स्वातंत्र्यसैनिकांची जी नृशंस हत्या केली त्याची कथा प्रामुख्याने मांडली गेली आहे.
'जळता गोमंतक' गोवा मुक्ती संग्रामाचे पुनरुज्जीवन
सादर आहे... जळता गोमंतक Dainik Gomantak

गोवा मुक्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी जसे जीवापाड प्रयत्न केले त्याचप्रमाणे गोव्याच्या मुक्तिलढ्याला बळ लाभावे म्हणून इतरांनीही वेगवेगळ्या तऱ्हेने प्रयत्न केले. सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांनी पुण्यात संगीत रजनीचे आयोजन केले. बा.भ. बोरकरांनी वर्तमानपत्र चालवले. मुंबईत टी.बी. कुन्हा यांनी गोवा कॉग्रेसची स्थापना केली.

नाटककार कै. सखारामबापू बर्वे यांनी त्यांनी गोव्यात अनुभवलेल्या पोर्तुगीज राजवटीवर आधारून नाटक लिहिले- ‘जळता गोमंतक’. सखारामबापू 1950 ते 1960 या दशकात खूप सक्रिय होते. त्या काळात त्यांनी पोर्तुगीज राजवटीचा जो जाच- जुलूम अनुभवला, मुक्तीच्या संदर्भाने गोव्यात ज्या थरारक घटना घडल्या त्या घटनांना पार्श्वभागी ठेवून त्यांनी हे नाटक लिहिले. गोव्यातील पोर्तुगीजांची पाशवी राजवट व त्याला होत असलेला प्रतिकार आदी परिस्थिती गोव्याबाहेरील जनतेला कळावी आणि मुक्तिलढ्याच्या कार्याला त्यांचे सहकार्य लाभावे हा हेतू बाळगून सखारामबापूनी या नाटकाचे प्रयोग कर्नाटक आणि महाराष्‍ट्राच्या विविध भागांत केले.

सादर आहे... जळता गोमंतक
गोव्यात होणाऱ्या इफ्फीमध्ये गोवेकर कुठे?

या नाटकात 15 ऑगस्ट 1956 साली पोर्तुगीजांनी स्वातंत्र्यसैनिकांची जी नृशंस हत्या केली त्याची कथा प्रामुख्याने मांडली गेली आहे. याच दिवशी गोव्याच्या सीमेवरच्या गावात पत्रादेवीला निःशस्त्र सत्याग्रहींवर पोर्तुगीजांनी गोळीबार केला. त्यात अनेकांना हौतात्म्‍य लाभले. त्याच दिवशी पार्से भगवती देवळाच्या कळसावर तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पन्नालाल यादव या सत्याग्रहीची गोळीबार करून हत्या करण्यात आली. पन्नालाल यादववर अग्निसंस्कार करणाऱ्या केशव च्यारीचे हाल हाल करण्यात आले. हा सारा रक्तरंजित इतिहास ‘जळता गोमंतक’ या नाटकातून सखारामबापूनी प्रभावीपणे मांडला आहे.

गोमंतकीय मुक्तिलढ्याच्या ह्या स्फूर्तीदायक इतिहासाचे पुनर्वलोकन व्हावे आणि तो विद्यार्थी आणि नव्या पिढीकडे पोचावा या हेतूने या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. अभय जोग यांनी या नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग शनिवार 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता साखळीच्या रवींद्र भवनात होणार आहे. त्याचे पुढचे प्रयोग हनुमान नाट्यगृह, म्हापसा (4 डिसेंबर 21 , सायं.7 वा. व रवींद्र भवन कुडचडे) (6 डिसेंबर 21 , सायं. 7 वाजता) येथे होणार आहेत. हे सर्व नाट्यप्रयोग विनामूल्य आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com