देवते पाव गे ! शांतादुर्गा माता की जय!

शेकडो वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी आरंभलेल्या बाराबाटीच्या काळात या कहाणीचा प्रारंभ आहे
देवते पाव गे ! शांतादुर्गा माता की जय!
देवते पाव गे ! शांतादुर्गा माता की जय!Dainik Gomantak

शेकडो वर्षांची परंपरा असलेला कुंभारजुवेंचा सांगोडोत्सव काळानुसार बदलेलाही आहे. शेकडो वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी आरंभलेल्या बाराबाटीच्या काळात या कहाणीचा प्रारंभ आहे. खोर्ली-तिसवाडी येथील कुमर्समे गावात असलेली श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीची मूर्ती तिथल्याच एका युवकाने सुरक्षित स्थळी नेण्याची जबाबदारी पत्करली. तो ती मूर्ती सुरक्षितपणे माशेल येथे घेऊन आला. माशेलमधल्या देऊळवाड्यावर या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्या ठिकाणी शांतादुर्गा कुंभारजुवेकरणीचं देऊळ मग अशा तऱ्हेने उभे राहिले आणि सर्वांना पूजनीय झाले.

Dainik Gomantak

त्याच दरम्यान कुंभारजुवे येथील प्रसिध्द वाडीये कुटुंबातील लोकांनी अशाच एखाद्या कारणासाठी आपल्या घरातील गणेशमूर्ती माशेल इथल्या या श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरणीच्या देवळात आणून ठेवली. वाडीये कुटुंबाच्या घरात आज देखील गणेशमूर्ती पूजली जात नाही, मात्र दरवर्षी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या देवळात सात दिवस गणपती पूजला जातो. या गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी थाटामाटात अनुपम सांगोडोत्सवाने केले जाते. सनई - चौघड्यांच्या वादनात श्रींची मूर्ती माशेल-तारीवाड्यावर पोहोचल्यानंतर पारंपरिक पध्दतीने सजवलेल्या सांगोडात ठेवली जाते आणि मग श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या सांगोडोत्सवाला ‘देवते पाव गे’, ‘शांतादुर्गा माता की जय’ अशा जयघोषांनी सुरुवात होते.

देवीचा सांगोड प्रथम मार्गस्थ होतो. हा सांगोड दोन होड्यांचा आधार घेऊन केलेला असला तरी त्यावर पन्नास लोक उभे राहू शकतील अशी त्याची भक्कम रचना असते. सांगोडावर गणपतीबरोबर वेताळ, शंकासुर, रिध्दी-सिध्दी ही सांेगे उभी असतात. कुंभारजुवे गांवचेच ग्रामस्थ असलेले सावंत, तारी, फडते या घराण्यातले लोक ही सांेगे सजवतात. देवीच्या सांगोडामागोमाग चित्र-देखाव्यांचे सांगोड प्रस्थान ठेवतात.

Dainik Gomantak

फार पूर्वीच्या काळात नैसर्गिक सामुग्री वापरूनच देखावे तयार करण्यात येत, मात्र वर्तमानकाळात या देखाव्यांमध्ये सद्य काळाचे प्रतिबिंब पडलेले आढळते. त्यात अाधुनिकता आलेली आहे. या सांगोडांवर गावातले सात दिवसांचे गणपतीही विसर्जनासाठी सिध्द होऊन स्थानापन्न होतात.

Dainik Gomantak

हे सारे सांगोड-देखावे गांवचीच तरुण मंडळी तयार करतात. कुंभारजुवे गावातील रामभुवनवाडा, थापणवाडा, सुरूचेंभाट, गोलवाडा, थालपवाडा, ताकवाडा हे सारे विभाग या सांगडोत्सवात आपापले प्रतिनिधित्व करतात. या सांगोडोत्सवाने आता पंचायत पातळीवर स्पर्धेचे रूप धारण केलेय. त्यामुळे आपापला देखावा आकर्षक करण्यासाठी त्यांच्यात चढाओढ असतेच.

Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com